कॅन्सर म्हणजे शरीरामध्ये पेशींमध्ये बदल होतात आणि त्यांची अनियमित वाढ होते या वाढीमध्ये शरीराला नियंत्रण राखता येत नाही आणि या विकृत पेशी झपाट्याने पसरतात. ज्या अवयवामध्ये या पेशी पसरत असतात त्याचं नाव कॅन्सरला दिला जातो, म्हणजे स्तनांचा कर्करोग किंवा फुप्फुसाचा कर्करोग असं म्हटलं जातं.
तर काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन काही दावे केले गेले. त्यामध्ये ते म्हणाले की, कॅन्सर सर्करेवरती बळावतो किंवा वाढतो. साखर, मैदा कर्बोदके याचा वापर त्यांनी पूर्ण बंद केला. तसेच खाण्यात मोठा कॅप ठेवला तर कॅन्सरच्या पेशी स्वतः मरतात. तसेच लिंबूपाणी, कच्ची हळद, लसूण, कडूनिंबाची पानं, तुळशीचे पानं, कडू आंबट फळ, मसाले, वेगळे रस यांचे सेवन केल्याने कॅन्सर बरा झाला असे त्यांनी म्हटले आहे.
तर सिंधू याच्या दाव्यात काही तथ्य आहे का? तर नाही. कारण टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 262 आजी-माजी ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर तज्ञांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. नवज्योत सिंह सिंद्धू यांनी केलेल्या विधानांना पाठबळ देणारे ठोस पुरावे नाहीत. यातल्या काही वस्तूंविषयी संशोधन करण्यात येत असलं तरी हे पदार्थ कॅन्सर विरोधी असल्याचे सुचवणारा कोणताही क्लिनिकल डेटा सध्या उपलब्ध नाही, अशा मान्यता न मिळालेल्या उपायांसाठी लोकांनी उप पुढे ढकलू नये असे आवाहन आम्ही करतो. कॅन्सरची लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा शक्यतो कॅन्सर तज्ञांचा सल्ला घ्या.
तर कॅन्सर बरा होऊ शकतो का? तर लवकर वेळ निदान झाल तर सर्जरी, थेरपी आणि किमोथेरपी यांच्या मदतीने कॅन्सर बरा होऊ शकतो, असा टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. म्हणून स्थनात गाठ आढळून आली किंवा इतर कोणती लक्षणे आहेत असं तुम्हाला किंवा तुमच्या डॉक्टरांना वाटत असेल तर योग्य चाचण्यांद्वारे त्याचं निदान करून घेणे महत्त्वाचे आहे. जर वेळेत निदान झालं नाही तर कॅन्सरच्या पेशी शरीराच्या एका अवयातुन शरीरभर धोका असतो आणि असं झालं तर त्यावर उपचार करणं कॅन्सरच्या पेशी मारणं कठीण होतं.
सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन आणि त्यानंतर इम्यूनोथेरपी असे चार टप्प्यांमध्ये कॅन्सर कॅन्सरचे उपचार सुरू होतात. तसेच असताना रुग्णाचा आहार महत्त्वाचा असतो कारण त्याने रुग्णांची तब्येत सुधारायला रिकवरी व्हायला मदत होते. मात्र, फक्त डाएट केल्यामुळे कॅन्सर बरा होऊ शकत नाही.
तसेच इंटर्मित्तेंत फास्तींगमध्ये दिवसांमध्ये आहाराच्या दरम्यान मोठा कालावधी ठेवला जातो आणि दिवसातून ठराविक वेळात अन्न सेवन केले जातात, असं केल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळेल का? याविषयी शंका निर्माण होऊ शकते. शिवाय कॅन्सरचे उपचार सुरू असताना त्याचा परिणाम शरीराच्या रोगी पेशीसोबत निरोगी पेशींवर देखील होत असतो, अशा वेळी शरीराला पोषक आहाराशी त्यासाठी वेगवेगळ्या पोषणतत्वांची घटकांची गरज असते.
त्यामुळे किटो, डायट करताना शरीराला मिळणारे पोषण पुरेसा आहे का? हे तपासणे महत्त्वाचे ठरतात, म्हणून कॅन्सर रुग्णांसाठीचा आहार हा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या कॅन्सर तज्ञांना त्यांच्यासोबतच्या न्यूट्रिशनना विचारून ठरविण्यात यावा, असे म्हणतात. तसेच कॅन्सर वरती उपचार पद्धती ही अतिशय गुंतागुंतीचे असल्याचे सांगितले जाते. कारण ताप आल, औषध घेतले असे इतकं सोपं नसतं. जर ताप सारखा चढत असेल तर त्यामध्ये अनेक कारण असू शकतात.
मात्र, त्यापेक्षा जास्त प्रकार कॅन्सरमध्ये आहेत आणि त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णाचे शरीर, रोग किती आहे, त्याचं गांभीर्य काय आहे? रुग्णांची मनस्थिती, शरीर उपचारांना किती प्रतिसाद देत आहे? या सगळ्या गोष्टींवर ती औषधोपचारांची परिणामकारक ठरत असते. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्यानेच ट्रीटमेंट थांबवून इंटरनेट वरती भरोसा ठेवला प्रचंड धोक्याचे ठरेल. कोणत्या आजारामध्ये इंटरनेट वरती पाहून औषध घेऊ नका, असा सल्ला डॉक्टर देत असतात.