दर महिन्याला तुमचा पगार कुठे-कुठे करत होतो? घरातलं सामान, वेगवेगळी बिले, शाळा-कॉलेजची फी, महिन्याचा बस, बस पास, सगळ्यात मोठा हिस्सा असतो घर भाडे किंवा गृहकर्ज. आपल्यापैकी अनेकजण आहे ज्यांना घर किंवा होम लोन करायचे आहे. मात्र, त्यावरील व्याज, इनकम टॅक्स, बाकी सगळं गणित या गोष्टीची अनेक लोकांना किचकट वाटत असतात. चला तर मग आज आपण गृहकर्ज विषयी सोप्या शब्दांमध्ये माहिती घेऊया..
होम लोन म्हणजे काय? तर घर विकत घेण्यासाठी बँकेकडून देण्यात येणारा कर्ज. तुम्ही किती रकमेपर्यंत कर्ज घेण्यासाठी पात्र आहात? यासाठी बँक एक आकडा सांगते. याला म्हणतात संक्शन रक्कम. हे म्हणजे तुम्हाला मिळू शकणारे जास्तीत जास्त कर्ज, त्यातील तुम्ही जितके कर्ज घेता तिला मुद्दल रक्कम म्हणले जाते. हे कर्ज घेणारी व्यक्ती परतफेड करताना मुळ रक्कमेसोबतच त्यावरचे व्याज देखील भरत असते. यालाच दर महिन्याचा हप्ता याला म्हणतात.
यामध्ये प्रामुख्याने हे गृहकर्ज तुम्ही किती कालावधीसाठी आणि किती टक्के व्याजदरात घेताय यावरून तुमचा महिन्याचा हप्ता ठरविला जातो. कारण तुम्ही हजार रुपयांचा हप्ता भरत असाल तर त्यातली पाचशे कर्जाची रक्कम आणि पाचशे व्याजाचे असं साधं सरळ गणित नसतं. तुमचे हप्ते सुरू होतात तेव्हा त्यातला मोठा हिस्सा हा व्याजाचा असतो आणि लहान भाग मुद्दलीचा असतो. जसजसा काळ उलटून जातो तसतसे व्याजाची रक्कम कमी होते आणि मुद्दलाची रक्कम वाढते, कारण व्याज हे मूळ मुद्दलावर आकारले जाते.
समजा, तुम्ही तुम्ही 50 लाखांच्या गृहकर्ज 9 टक्के व्याज दराने 10 वर्षांच्या काळासाठी घेतलं. तर तुम्हाला एकूण व्याज 26 लाख करावे लागतील. पण हेच कर्ज तुम्ही जर 15 वर्षांसाठी घेतलं तर व्याजाची रक्कम होईल 41 लाख रुपये आणि 20 वर्षांसाठी इतकच कर्ज घेतलं तर त्याची रक्कम मुद्दलीपेक्षा जास्त असेल ती म्हणजे 58 लाख, म्हणूनच कर्ज घेताना गणित करून पाहणं दरमहा हप्ता किती येईल? हे तपासा महत्त्वाचा आहे आणि यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बँकांच्या वेबसाईटवरचा होम लोन कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकता.
कालावधी मोठा असेल तर त्याचा हप्ता थोडा कमी येतो. तर मला जेपणारा होतो पण असं केल्याने व्याजाखातर भरपूर रक्कम द्यावी लागते. मग असा भरमसाठ व्याज भरावे लागू नये, यासाठी पर्याय म्हणजे दरवर्षी पगार वाढल्यावर हप्त्याची रक्कम देखील वाढवायची. म्हणजे तुम्ही कर्जाचा हप्ता 5 वर्षे वाढवला तर तुमचं वीस वर्षांचा कर्ज बारा वर्षात फेडू शकाल. हा हप्ता दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढला तर हेच कर्ज दहा वर्षात संपेल. वर्षाच्या बार हप्त्याबरोबर एखादं एक हप्ता भरला तरी देखील याचा फायदा होतो.
तसेच जर तुमच्या हातामध्ये इतर कोणते अधिकचे पैसे असतील, तर कर्जाचा काही भाग प्रि पेमेंट केल्याने देखील तुमची मुद्दलाची रक्कम कमी होईल. गृहकर्ज घेताना या काही ठराविक गोष्टी लक्षांत घेणं आवश्यक आहे. अनेक वित्त संस्था गृह कर्ज देत असतात त्यांच्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात. त्यांच्यासाठी होम लोन हे त्यांच्या प्रॉडक्ट आहे आणि तुम्ही ग्राहक आहात.
त्यामुळे तुम्हाला कोण चांगली ऑफर देतात? सगळीकडे चौकशी करून पहा. कर्जाचा व्याजदर थोडाबहुत कमी करण्यासाठी तुम्ही थोडी घासाघीस करु शकता. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला विशेष काही ऑफर देते का? ते तपासून पहा. गृहकर्ज घेणाऱ्या महिलांना अनेक बँका कमी व्याजदराने कर्ज देतात आणि महिलांच्या नावावर अशा घर घेतल्यावर महाराष्ट्रात एक टक्के स्टॅम्प ड्युटी कमी आहे. गृहकर्ज घेण्यासाठी बँक प्रोसेसिंग फी किती आकारत असते, हे तपासून घ्या.
अनेकदा बँक लोन सोबतच इन्शुरन्स देखील देतात आणि त्याचा हप्ता देखील याचबरोबर जोडला जातो. त्यावेळी या गोष्टीकडे लक्ष द्या. ठरलेल्या कालावधीच्या आधी कर्ज फेडलं तर काही बँका प्रि पेमेंट फी आकारत असतात. तुमची बँक असं काही करते का? हे तपासून पहा. कर्ज घेताना तुमचा व्याजदर फिक्स आहे की फ्लोटिंग कॉम्बिनेशन ते ठरवा आणि फ्लोटिंग व्याजदर असेल तर वेळोवेळी होत असलेल्या बदलांचा तुम्हाला देखील फायदा भेटला नाही याकडे लक्ष ठेवा.
जर तुम्ही एकत्र गृहकर्ज घेतलं तर नवरा-बायको मिळून होम लोन घेतलं तर तुम्ही चार लाखांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. शिवाय ATC साठी तुम्हाला कर्जाच्या हप्ते परतफेडीचा फायदा देखील होतो.