मित्रांना नुकतेच विधानसभेच्या 288 जागांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात मतदान पार पडले. या वेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुथवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षा या वेळेस मतदान वाढल्याने अधिकच चुरस निर्माण झाली होती. एका आकडेवारीनुसार 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या महाराज सरासरी 65.11 टक्के मतदान झाले आहे. तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने हा आकडा किंचित वाढण्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे, अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात मतदान झालेले 5 जिल्हे कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..
◆ हिंगोली : 2024 महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यांची यादी हिंगोली या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो. या ठिकाणी कळमनुरी, हिंगोली आणि वसमत असे एकूण 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. हिंगोली जिल्ह्याचे एकूण 71.70 टक्के मतदान आहे.
◆ सांगली : 2024 महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेला जिल्ह्यांमध्ये सांगली या जिल्ह्यात चौथा क्रमांक लागतो. ज्या ठिकाणी इस्लामपूर, खानापूर, जत आणि तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस- कडेगाव, मिरज आणि सांगली असे एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात एकूण 71.79 टक्के मतदान झाले आहे.
◆ जालना : 2024 महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये जालना या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. ज्या ठिकाणी घनसांगवी, परतूर, बदनापूर, भोकरदन आणि जालना असे एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. जालना जिल्ह्यातील या पाच विधानसभा मतदारसंघात एकूण 72.30 टक्के मतदान पार पडले आहे.
◆ गडचिरोली : 2024 महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. या ठिकाणी आरमोरी, अहेरी आणि गडचिरोली असे एकूण तीन विधान सभा मतदार संघ आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 73. 68 टक्के मतदान झाले आहे.
◆ कोल्हापूर : 2024 महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. ज्या ठिकाणी इचलकरंजी, करवीर, कागल, कोल्हापूर-उत्तर, कोल्हापूर-दक्षिण, चंदगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले असे एकूण दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान झालेल्या मतदारसंघापैकी पाच पैकी दोन विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यामधील असा आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर करवीर 84.79 टक्के आणि चौथ्या क्रमांकावर कागल 81.72% हे विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील या दहा विधानसभा मतदारसंघात एकूण 76.25 टक्के मतदान झाले आहे.
आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान झालेले पाच जिल्हे कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. महाराष्ट्रातला तुमचा जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ कोणता आहे? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..