पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रात काही भागात जोरदार पाऊस सुरू होतो, तर काही भागात शेतकरी ढगाकडे पाहत पावसाची प्रतीक्षा करतात. महाराष्ट्रसाहित भारताचे अर्थचक्र पावसावर अवलंबून आहे, त्यामुळे पावसाबद्दच्या बातम्या देखील 24 तास सुरू होतात. ज्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे त्या भागातील धरणात पाण्याची आवक सुरू होते आणि अश्यातच धरणात मुबलक पाणीसाठा झाल्यास धरणाचे दरवाजे उघडून पाणी पुढे सोडले जाते. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर इतक्या ‘क्यूसेक’ने पाणी सोडले जात आहे असे बातम्यात सांगितले जाते. तर, धरणातील पाणीसाठा किती आहे हे सांगण्यासाठी ‘टीएमसी’ हे एकक वापरले जाते.
आपण बातमी वाचताना, पाहताना किंवा रोजच्या जीवनात आपापसात बोलताना देखील क्युसेक, टीएमसी हे शब्द वापरतो, पण 1 टीएमसी म्हणजे नेमका किती पाणीसाठा याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते. चला तर मग आजच्या या लेखामद्धे आपण पाण्याचे हेच गणित समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
एक टीएमसी म्हणजे किती पाणी? : एक फुट लांब, एक फुट रुंद आणि एक फुट उंच या आकाराचे एक भांडे घेतल्यास त्या भांड्यामध्ये साठवलेले पाणी हे 1 घनफुट इतके पाणी असते. आपल्याला समजेल अश्या भाषेत सांगायचे झाले तर त्या भांड्यात 28.31 लीटर इतके पाणी साठवता येते. म्हणजेच 1 घनफुट पाणी म्हणजे 28.31 लिटर्स इतके पाणी. जवळपास 2 बादल्या इतके हे पाणी असते.
आपण 1 घन फुट पाणी म्हणजे नेमके किती पाणी हे पाहिले. आता 1 दसलक्ष घनफुट ( 10,00,000 घनफुट ) म्हणजे 1 एमसीएफटी इतके पाणी होते. आणि 1,000 दसलक्ष घनफुट म्हणजे 1 टीएमसी इतका पाणीसाठा होतो. आता यामध्ये किती बादल्या पाणी बसेल याचे गणित करून तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्या.
धरणातील पाणीसाठी मोजण्यासाठी टीएमसी हे एकक वापरले जाते. महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता ही 105 टीमसी इतकी आहे, म्हणजेच 105 अब्ज घनफुट इतके पाणी कोयना धरणात साठवले जाऊ शकते. तसेच मराठवड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण, पैठण या धरणाची साठवण क्षमता ही 102 टीमसी इतकी आहे.
एक क्युसेक म्हणजे किती? : आपणा सर्वांना माहीत आहे की धरणात आपल्या साठवण क्षमते इतके पाणी जमा झाल्यानंतरही धरणात येणार्या पाण्याची आवक सुरूच असेल तर धरणाचे दरवाजे उघडले जातात, आणि नदीपात्रामद्धे पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो. धरणातून सोडल्या जाणार्या पाण्याचे मोजमाप करण्यासाठी वापरले जाणारे एकक म्हणजे ‘क्युसेक’. क्युसेक हा शब्द क्युब ( म्हणजेच घन ) आणि सेकंद यांच्या एकत्रीकरणाने बनला आहे.
एक क्युसेक पाणी म्हणजेच एक घनफुट प्रती सेकंद इतके पाणी. आता आपण वरती 1 घनफुट म्हणजे किती पाणी हे पाहिले आहे. त्यावरून आपल्याला समजेल अश्या भाषेत सांगायचे झाले तर, 1 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग म्हणजे 1 सेकंद मध्ये 28.31 लिटर्स इतक्या पाण्याचा विसर्ग असतो. समजा एखाद्या धरणातून 1000 क्युसेक या क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू असेल तर, प्रत्येक सेकंदाला त्या धरणातून ( 1000 * 28.31 ) 28,310 लिटर्स इतके पाणी नदीपात्रात सोडले जात असते.
एक क्युमेक म्हणजे किती? : क्युसेक मध्ये होणारे मोजमाप हे घनफुट मध्ये केले जाते, तर क्युमेक मध्ये होणारे मोजमाप हे घन मीटर्स मध्ये केले जाते. एक क्युमेक पाणी म्हणजेच एक घनमीटर प्रती सेकंद इतके पाणी नदीपात्रात सोडले जाते.
तर वाचकांनो, क्युसेक म्हणजे काय आणि टीएमसी म्हणजे काय हे तुम्हाला नक्कीच समजले असेल. मी आशा करतो कि तुम्हाला क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय? | Cusec and TMC meaning in Marathi हा लेख आवडला असेल. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक छान कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा.