जगात अशा ठिकाणांची कमतरता नाही जिथे सर्व काही समान नाही. जगभरात असे अनेक देश आहेत, जे त्यांच्या खास गुणांमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. दिवसभराच्या व्यस्ततेनंतर शांत झोप घेणे प्रत्येकालाच आवडते आणि अशा स्थितीत रात्री आठ ते नऊ तासांची झोपही कमी वाटू लागते. पण तुम्हाला माहित आहे का की जगात अशी एक जागा आहे, जिथे फक्त चाळीस मिनिटे रात्र असते. वाचून विश्वास बसत नाही न? पण हे सत्य आहे. आज आपण या विशेष लेखामद्धे अश्या ठिकाणाबद्दल माहिती घेणार आहोत जिथे फक्त 40 मिनिटे अंधार असतो.
खरे तर वर्षातील काही महिन्यांत असे दुर्मिळ दृश्य येथे पाहायला मिळते. हे शहर खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. चला तर मग जाणून घेऊया या शहराबद्दल.
हे कोणते शहर आहे? :
हे शहर नॉर्वे देशातील हेमरफेस्ट असे आहे. येथे सूर्य रात्री 12:43 वाजता मावळतो आणि अवघ्या चाळीस मिनिटांच्या अंतराने उगवतो आणि रात्री दीडच्या सुमारास पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. इथे हा प्रकार एक-दोन दिवस होत नाही, तर तब्बल अडीच महिने फक्त 40 मिनिटांची रात्र पाहावयास मिळते. म्हणूनच या देशाला ‘कंट्री ऑफ मिडनाईट सन’ असेही म्हणतात. मे ते जुलै महिन्याच्या दरम्यान सुमारे 76 दिवस येथे सूर्य मावळत नाही. नॉर्वे आर्क्टिक सर्कलमध्ये येतो.
पूर्वेला नॉर्वेची सीमा स्वीडनशी आहे, तर उत्तरेला या देशाची सीमा फिनलंड आणि रशियाच्या सीमेला लागून आहे. नॉर्वे केवळ यामुळेच प्रसिद्ध नाही, तर त्याच्या सुंदर मैदानांसाठी जगभर ओळखले जाते, येथील सौंदर्य जगप्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. येथील लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहेत आणि त्यांना निरोगी खाणे आवडते.
काय आहे कारण :
सूर्य अवकाशात स्थिर आहे आणि पृथ्वी आपल्या कक्षेत ३६५ दिवसांत एक परिक्रमा पूर्ण करते. तसेच, पृथ्वी चोवीस तासांत आपल्या अक्षावर एक चक्कर पूर्ण करते. पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा केल्यामुळे दिवस आणि रात्र होतात हे आपणास माहीत आहे. सोबतच आपल्याला हे देखील माहीत आहे की, दिवस आणि रात्रीचा कालावधी नेहमीच समान नसतो. कधी दिवस मोठे आणि रात्र लहान, तर कधी दिवस लहान आणि रात्री मोठी असते.
वास्तविक हे पृथ्वीच्या अक्षाच्या झुकण्यामुळे होते. जेव्हा पृथ्वी फिरते, एक उत्तरेला आणि दुसरा दक्षिणेला, असे दोन बिंदू तयार होतात, जे एका सरळ रेषेने जोडून अक्ष बनवतात. पृथ्वी ही 66 अंशाच्या कोनात फिरते, त्यामुळे तिचा अक्ष सरळ ऐवजी तेवीस अंशांनी झुकलेला आहे. या 23 अंशांनी झुकल्यामुळेच दिवस आणि रात्र लहान-मोठे होतात. पृथ्वीच्या या झुकण्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीच्या सर्व भागांवर समान पसरत नाही. त्यामुळे दिवस आणि रात्रीच्या वेळेत फरक येतो.
नॉर्वेमध्ये मध्यरात्रीच्या सूर्याची स्थिती देखील 21 जूनच्या सूर्यासारखीच आहे. यावेळी, पृथ्वीचा 66 अंश उत्तर अक्षांश ते 90 अंश उत्तर अक्षांशापर्यंतचा संपूर्ण भाग सूर्यप्रकाशात राहतो. म्हणजे इथे दिवस मोठा आणि रात्र लहान होते. याच कारणामुळे नॉर्वेमध्ये ही विचित्र घटना घडते.
जर तुम्हाला नॉर्वेला भेट देण्याची संधी मिळाली तर मे ते जुलै या कालावधीत जा आणि ही अनोखी घटना अनुभवा. तसे, उत्तर ध्रुवाजवळील जवळपास सर्वच देशांमध्ये तुम्हाला अशा अनोख्या घटना पाहायला मिळतील.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.