जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत वडिलांच्या मिळकतीमध्ये मुलाला किंवा मुलीला हिस्सा मागता येत नाही?

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

आजच्या काळात प्रॉपर्टी हा सर्वांसाठीच एक जिवा-भावाचा प्रश्न आहे. प्रॉपर्टी साठी भावा-भावा मध्ये, भावा-बहिणीमद्धे, चुलते-पुतण्यामध्ये होणारे वाद आपण आपल्या आजू-बाजूला नक्कीच पाहिले असतील. तुम्हाला हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की काही वेळा चक्क वडील आणि मुलामद्धे, वडील आणि मुलीमद्धे देखील प्रॉपर्टी संबंधाने असे वाद पहण्यास मिळतात.

आजच्या लेखात आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की वडिलांच्या मिळकतीमध्ये मुलगा आणि मुलीचा खरच किती हक्क असतो? वडिलांच्या मिळकतीमध्ये मुला-मुलीचा हक्क नेमका कधी पासून सुरू होतो? वडील आपली मिळकत फक्त मुलाच्या किंवा मुलीच्या नावे करू शकतात का? हा लेख संपूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला कोण-कोणत्या परिस्थितीत वडिलांच्या मिळकतीमध्ये मुलाला किंवा मुलीला हिस्सा मागता येत नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर देखील मिळेल.

1) एखाद्या व्यक्तीने स्वकष्टाने एखादी प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीची स्वकष्टर्जित प्रॉपर्टी समजली जाते. कायद्यातील विविध तरतुदी आणि मननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकलांद्वारे हे स्पष्ट झालेले आहे की एखादा व्यक्ती त्याच्या स्वकष्टर्जित प्रॉपर्टी संबंधी कोणताही निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, तो व्यक्ती ती प्रॉपर्टी विकू शकतो, तो व्यक्ती ती प्रॉपर्टी बक्षीस पत्राने किंवा इतर प्रकारे हस्तांतरित देखील करू शकतो.

वरील मुद्दयात सांगितल्याप्रमाणे स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचा मालक तो जीवंत असताना त्याच्या प्रॉपर्टी बद्दल हवा तो निर्णय घेऊ शकतो. हा निर्णय घेण्यासाठी त्याला त्याच्या मुलाची किंवा मुलीची परवानगी घेण्याची कायद्याने कोणतीही आवश्यकता नाही. तसेच, वडील जीवंत असताना मुलगा किंवा मुलगी अश्या प्रॉपर्टी मध्ये कोणत्याही प्रकारचा हिस्सा मागू शकत नाहीत.

2) आपण मुद्दा क्र. 1 मध्ये जे उदाहरण पाहिले त्यालाच पुढे घेऊन जाऊ. समजा एखाद्या व्यक्तीने स्वकष्टार्जित प्रॉपर्टी संबंधी एक रजिस्टर्ड मृत्यूपत्र करून ठेवले. मृत्युपत्रामद्धे त्या व्यक्तीने त्याची संपूर्ण स्वकष्टार्जित प्रॉपर्टी त्याच्या मुलीच्या नावे केली, तर मुलाचे काय? तर मित्रांनो, मृत्यूपत्र जर कायदेशीर पद्धतीने झालेले असेल तर त्या प्रॉपर्टी मध्ये मुलगा कोणत्याही प्रकारचा हिस्सा मागू शकत नाही. मुलाने कोर्टात दावा जारी दाखल केला तरीही त्याला हे सिद्ध करावे लागेल की ते मृत्यूपत्र चुकीचे आहे. यामुळेच असे सांगण्यात येते की मृत्यूपत्र नेहमी रजिस्टर्ड असावे, जेणेकरून भविष्यात ते कोर्टात कागदोपत्री पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल.

वरील मुद्दा क्र. 2 मध्ये आपण पाहिले की, वडिलांच्या मृत्यू नंतर देखील मुलाला त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागता येणार नाही. याच ठिकाणी वडिलांनी मृत्यूपत्राएवजी आपल्या हयातीत बक्षीस पत्राने प्रॉपर्टीचे हस्तांतरण केलेले असेल तरी देखील मुलाला त्यामध्ये हिस्सा मागता येणार नाही.

3) आपण मुद्दा क्र. 1 आणि 2 मध्ये अश्या काही परिस्थिति पाहिल्या ज्यामधे मुलाला किंवा मुलीला किंवा दोघांनाही आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार नाही. आता आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की वडिलांच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टी मध्ये मुलाचा आणि मुलीचा हिस्सा केंव्हा तय्यार होतो? तर मित्रांनो, वडिलांचा आपल्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टी बाबत कोणतेही मृत्यूपत्र न करता मृत्यू झाला तर पुढे त्यांच्या कायदेशीर वरसांचा त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क सुरू होतो. हे कायदेशीर वारस म्हणजे त्या व्यक्तीची आई, बायको आणि मुले-मुली.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *