मुख्यमंत्री फेलोशीप योजना || यासाठी कोण अर्ज करू शकतो, पात्रता, ऑनलाईन फॉर्म प्रक्रिया कशी राहील?|| संपूर्ण माहिती !

Infomative News Political

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र गव्हर्मेंट ने आता पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. या योजने अंतर्गत तरुणांना मोठी संधी आहे. 75,000 रुपये पगार हा महिन्याला तुम्हाला मिळणार आहे. यासाठी नक्की कोण अर्ज करू शकतो, पात्रता काय आहे, प्रक्रिया कशी राहील संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि तसेच ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा हे सुद्धा पाहणार आहोत.

मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल की मुख्यमंत्री फेलोशिप योजना म्हणजेच मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा नक्की काय आहे, यामध्ये आम्हाला काय फायदा? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर याचे उत्तर असं आहे की जे सरकारी अधिकारी असतात, त्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत तुम्हाला काम करायची मोठी संधी आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला महिन्याला 75,000 रुपये पगार सुद्धा मिळणार आहे.

फक्त हे परमनंट नाहीये, काही कालावधीसाठी तुम्हाला सरकार सोबत काम करण्याची संधी असते, यालाच फेलोशिप योजना असे म्हणतात. आता या कार्यक्रमांतर्गत तुम्ही कोण कोण अर्ज करू शकता, पात्रता नक्की काय आहे, ऑनलाइन अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती पाहूयात. तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या वेबसाईट वरती यायचे आहे – mahades.maharashtra.gov.in त्यानंतर तुम्हाला इथे चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्रॅम दिसेल.

शेवटची तारीख ही 2 मार्च 2023 देण्यात आलेले आहे. यासाठी अप्लाय कसं करायचं तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मराठी लँग्वेज करायची आहे. म्हणजे सगळी माहिती आपल्याला सोपी होईल. आता कार्यक्रमाविषयी हा ऑप्शन दिसेल, कार्यक्रमाविषयी वरती क्लिक करा. इथे आल्यानंतर पात्रता दिलेली आहे.

कोण कोण पात्र आहे, अर्ज कोण करू शकतो. तर पहिला पॉईंट आहे ज्या मध्ये तुमचं वय आहे ते 21 ते 26 याच दरम्यान असणं गरजेचं आहे तरच अर्ज करू शकता. म्हणजे जन्मतारीख 3 मार्च 1997 पासून 3 मार्च 2002 यांच्या दरम्यान ज्यांची जन्मतारीख आहे ते इथे अर्ज करू शकतात. दुसरा पॉईंट ज्यामध्ये तुमची किमान पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे गरजेचे आहे. 60 टक्के गुण सुद्धा असणं गरजेचं आहे.

इथे जास्त शिक्षण जर तुमचं असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे त्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. पण कमीत कमी ग्रॅज्युएशन 60 टक्के गुण पाहिजेत. तिसरा पॉईंट आहे एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायच आहे. त्यानंतर जी काही इंटर्नशिप झाली असेल अप्रेंटिसशीप झाली असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता.

चौथा पॉईंट मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक राहणार आहे. हिंदी व इंग्रजीचे नॉलेज सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि कम्प्युटर नॉलेज आणि इंटरनेटचं नॉलेज हे सुद्धा पाहिजे. ही झाली पात्रता. वेबसाईट वर जाऊन तुम्ही हे सगळं वाचून घ्या, तसेच तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील त्याची सुद्धा उत्तरे देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे ते पाहू शकता.

निवड प्रक्रिया कशी आहे ते पाहूया. निवड प्रक्रिया वरती तुम्ही क्लिक करून येथे पाहू शकता, टप्पा एक टप्पा दोन त्यानंतर कशा पद्धतीने परीक्षा वगैरे राहील, कोणत्या सब्जेक्ट चे किती मार्क्स राहतील आणि अंतिम निवड ही कशी होईल ही सगळी माहिती दिलेली आहे. एकदा निवड प्रक्रिया या ऑप्शन मध्ये जाऊन सगळी माहिती पाहून घ्या.

आता लाभ काय काय मिळणार आहेत ते पाहूया. तर यामध्ये तुम्हाला सक्षम अधिकाऱ्या सारखा दर्जा भेटेल. तसेच तात्पुरते तुम्हाला ओळखपत्र व ईमेल आयडी सुद्धा येथे देण्यात येणार आहे. तसेच दर महिन्याला 70,000 रुपये आणि तसेच खर्चासाठी व प्रवास वगैरे असेल त्यासाठी दर महिना 5,000 असे एकूण 75,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे.

तसेच फेलोशिपच्या कार्यक्रमात एकूण आठ दिवसाची तुम्हाला रजा मिळणार आहे. फेलोशिपच्या कार्यकाळासाठी विभागाचे संरक्षण विमा म्हणजे विमा सुद्धा तुमचा उतरवण्यात येणार आहे. येथे अटी शर्ती सुद्धा दिलेले आहेत हे सुद्धा पहा व एकदा संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतर अर्ज करा.

आता मुख्य पृष्ठावरती यायच इथे Apply now बटन दिसेल, Apply now या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही Apply now वर क्लिक केल्या नंतर वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये अर्ज भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा हे दाखवण्यात येईल. आता कागदपत्रे तुम्हाला समोर ठेवायची आहेत. कागदपत्रे अपलोड करायचे नाहीत. कागदपत्रे तुम्हाला नंतर लागणार आहेत.

आता इथे काय आहे दहावी, बारावी, पदविका, जे ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच्या गुणपत्रिका लागतील, अनुभवाचे प्रमाणपत्र लागेल, त्यानंतर फोटो व सिग्नेचर आणि पत्त्याचा पुरावा हे सगळे कागदपत्रे लागतील. आता नवीन खाते तयार करा या ऑप्शन वरती क्लिक करायचे, त्यानंतर दुसऱ्या वेबसाईट वरती येणार आहात, इथे तुम्हाला आता हा फॉर्म भरायचा आहे.

न्यू कँडिडेट रजिस्ट्रेशन आहे ते इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे सुद्धा इथे तुम्हाला दिलेला आहे. टर्म अँड कंडिशन सगळ्या एक्सेप्ट करायचे आहे आणि क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचे. आता न्यू कॅंडिडेट फॉर्म हा ओपन होईल, हा संपूर्ण फॉर्म इंग्लिश मध्ये भरायचा. सगळी माहिती भरल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं तुम्हाला पुढे मेसेज दिसेल आणि तुम्हाला मोबाईल वरती मेसेज येईल. ओके करायचे.

ओके केल्यानंतर आता पुढचा फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा प्रोफाइल भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे आहे. प्रोफाइल स्टेटस पाहू शकता इनकंप्लीट आहे. आता प्रोफाइल स्टेटस वरती क्लिक करायच आहे. इथे आपल्याला आता सगळी माहिती भरायची आहे. पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, अकॅडमी डिटेल्स, वर्क एक्स्पिरियन्स आणि प्रेफरन्स अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती भरायची आहे. सगळी माहिती एकदम व्यवस्थित भरा काही चुकू देऊ नका. नेक्स्ट केल्यानंतर आता पर्सनल डिटेल कंप्लिट झालेले आहेत.

आता आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहेत. ज्यामध्ये तुम्हाला परमनंट पत्ता विचारेल, तुमचा जो काही परमनंट अड्रेस आहे तो इथे सिलेक्ट करायचा. महाराष्ट्र राज्य, त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा, त्यानंतर कोणत्या तालुक्यामध्ये राहता तो तालुका, त्यानंतर तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव येथे टाईप करा, त्यानंतर तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावचा ऍड्रेस तो एरिया किंवा लँडमार्क, शेजारील खून, त्यानंतर पिन कोड अशा पद्धतीने माहिती टाकायचे.

त्यानंतर करंट ऍड्रेस जो काही असेल तो टाका. जर सेम असेल तर येस करा नसेल तर नो करून तुम्ही इथे माहिती टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स झालेले आहेत, आता अकॅडमी डिटेल भरायचे आहेत. म्हणजे दहावी, बारावी, ग्रॅज्युएशनची माहिती तुम्हाला भरायची आहे. पहिल्यांदा दहावी स्टॅंडर्ड सिलेक्ट करायचं. टेन स्टैंडर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड टाकायचा. त्यानंतर सीट नंबर टाका आणि कधी तुम्ही पास झाला ते मार्कशीट वरती पहा व ते इयर येथे टाका.

त्यानंतर कोणता महिना ते टाकायचे आहे आणि किती पर्सेंट पडले हे टाकायचे आणि सेव्ह डिटेल्स वरती क्लिक करायचे. त्यानंतर आता बारावी ची माहिती भरायची. त्यानंतर ग्रॅज्युएशनची माहिती भरायची. पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर तसे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर आता वर्क एक्सपेरीएन्स टाकायचे आहे.

तुम्ही फुल टाइम जॉब केला असेल तर फुल टाइम जॉब सिलेक्ट करा, जर तुम्ही इंटरशिप केली असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. एक वर्ष कमीत कमी पाहिजे. त्यानंतर नेचर ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही फुल टाइम जॉब केलेला आहे तर त्या ऑर्गनायझेशन चे नाव टाकायचे आहे. कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही काम केलं त्या कंपनीचं नाव, तसेच ती कंपनी पब्लिक सेक्टर आहे का प्रायव्हेट सेक्टर का आदर सेक्टर आहे ते टाकायचे.

कधी तुम्ही त्या कंपनीमध्ये जॉईन झाला ती तारीख टाकायची आहे आणि टील डेट म्हणजे आत्तापर्यंत जर तुम्ही काम करत असाल तर आजची तारीख तुम्ही टाकू शकता. त्यानंतर सेव्ह डिटेल्स वरती क्लिक करायचं. जर तुमचं एक्स्ट्रा काय असेल तर किंवा तुम्ही सेल्फ एम्प्लॉय असेल किंवा काही तर ते तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला याचे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे.

आता शेवटची स्टेप राहते प्रेफरन्स द्यायचे. तुम्हाला कुठे जॉब पाहिजे हे विचारले जाईल. पहिलं जिल्हास्तरीय का स्टेट लेवल जॉब पाहिजे, म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये का पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठे जॉब पाहिजे ते टाकायचे. आता सेव डिटेल्स वरती क्लिक करा. आता ॲडिशनल मध्ये या प्रोग्राम बद्दल माहिती तुम्हाला कुठून मिळाली ते टाकायचे आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे.

नेक्स्ट केल्या नंतर तुम्ही जो काही आता फॉर्म फिलअप केलेला आहे ती सगळी माहिती आलेली आहे ती एकदा चेक करून घ्या. सगळी बरोबर असेल तरच I Accept वरती क्लिक करून सेव अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला पेमेंट करण्यासाठी विचारेल. आपली पहिली स्टेप कम्प्लीट झाली आता 500 रुपये पेमेंट करायचे आहे. प्रोसिड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचे आहे.

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, QR कोड वगैरे कशाने पेमेंट करायचं असेल तर पेमेंट करू शकता आणि हा फॉर्म सबमिट करायचा. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटच्या स्लिप ची प्रिंट सुद्धा इथे तुम्ही काढू शकता. पेमेंट स्टेटस सुद्धा इथे कम्प्लीट यायला पाहिजे आणि प्रोफाइल स्टेटस सुद्धा कंप्लीट यायला पाहिजे. तर हे दोन्ही कम्प्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा हा फॉर्म सबमिट झालेला आहे. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *