मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
लग्नानंतर काही वाद निर्माण झाले, घटस्फोट हवा असेल, पोटगी बद्दल काही वाद असेल, मुलांच्या कस्टडीचा वाद असेल तर आपणास माहीत आहे यासाठी कोर्टाच्या पायर्या चढाव्या लागतात. आपल्यापैकी काही लोकांनी त्या चढल्याही असतील, परंतु चित्रपटात दाखवतात तसे कोर्टात लग्न झालेले आपण कधी पाहिले नसेल. याचे कारण म्हणजे नावाप्रमाणे कोर्ट मॅरेज हे कोर्टात होत नाही.
आपल्यापैकी अनेकांचा असा समाज असतो की कोर्ट मॅरेज हे कोर्टात न्यायाधीशांच्या समोर वधू-वराने त्यांच्या साक्षीदारांसोबत सह्या करून होते. परंतु हा समज चुकीचा आहे. कोर्ट मॅरेजचे कायदेशीर नाव हे ‘रजिस्टर्ड मॅरेज’ असे आहे. चुकीच्या संकल्पनेतून रजिस्टर्ड मॅरेजला कोर्ट मॅरेज म्हंटले जाते आणि आज देखील बरेच लोक यालाच सत्य समजतात.
भारतात सामान्यतः लग्नाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आपल्या चाली-रीती, रूढी-परंपरा नुसार होणारे लग्न आणि दुसरे म्हणजे रजिस्टर्ड मॅरेज. आता ‘रजिस्टर्ड’ या शब्दावरून आपणास हे लग्न कोणत्या कार्यालयात संपन्न होतात याबद्दल कल्पना आलीच असेल. आपले दस्त ज्या रजीस्ट्री ऑफिस मध्ये रजिस्टर होतात त्याच कार्यालयामध्ये या रजिस्टर मॅरेजची देखील नोंदणी होत असे.
बरोबर वाचलं तुम्ही. ‘नोंदणी होत असे’. परंतु सध्याच्या बदलेल्या नियमांनुसार आता रजिस्टर्ड मॅरेजची नोंदणी ही रजीस्ट्री होत नाही. त्यासाठी स्वतंत्र कार्यालयाची स्थापना आता करण्यात आलेली आहे. हे विवाह नोंदणी कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत. म्हणजे आता रजीस्ट्री ऑफिसचा सुद्धा रजिस्टर्ड मॅरेजशी काहीही संबंध राहिलेला नाही.
इथे आपण एक गोष्ट लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. रजिस्टर्ड मॅरेज हे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या विवाह नोंदणी कार्यालयामध्ये संपन्न होते, परंतु रूढी-परंपरे नुसार झालेल्या लग्नाची नोंदणी करवायची असेल तर त्यासाठीचे अधिकार हे स्थानिक कार्यालयांना ( जसे : ग्राम पंचायत, नगर पालिका ) दिलेले आहेत. म्हणजेच विधिवत झालेल्या लग्णांची नोंदणी ही महानगर पालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत कार्यालयात होते.
चला तर मग आजच्या या लेखामुळे अनेक लोकांच्या मनात ‘कोर्ट मॅरेज’ बद्दल असलेला गैरसमज नक्कीच दूर झाला असेल. आजचा हा कायदेविषयक लेख आपणास कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आपल्या मनात असेच काही कायदे विषयक प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हाला विचारू शकता. हा लेख आपणास माहितीशिर वाटला असेल तर शेअर करून इतरांना माहिती देऊ शकता.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.