मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
मागील 2 वर्ष कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच कठीण होता. यामध्ये बरेच व्यक्ती दगावले. यापैकी कित्येक व्यक्ती हे कुटुंब प्रमुख, कमावते व्यक्ती होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना झालेला त्रास आपण सर्वांनी बातम्या द्वारे पाहिला असेलच. कमावत्या व्यक्तीच्या किंवा कुटुंब प्रमुख असलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला होणारा आणखी एक त्रास म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर असलेले बँकेतील पैसे, गुंतवणूक किंवा प्रॉपर्टीवर कायदेशीर रित्या ताबा मिळवणे. त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र कोणते? याबद्दल आजच्या या लेखात आपण जाणून घेऊ.
एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांसाठी सर्वात महत्वाचे प्रमाणपत्र ठरते ते म्हणजे ‘वारस दाखला’. हा वारस दाखला दिवाणी न्यायालयामध्ये किचकट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपणास मिळतो. भारतीय न्यायव्यावस्थेवरील कामाचा बोजा पाहता 2 ते 3 महिन्यांचा कालावधी यासाठी लागतो. ‘वारस दाखला’ हा आपल्या बोली भाषेतील शब्द आहे. कायद्याच्या भाषेत हा वारस दाखला 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे Succession Certificate आणि दूसरा म्हणजे Heirship Certificate. या दोन्ही प्रमनपत्रांना वारस दाखलाच म्हणतात, हे दोन्ही प्रमाणपत्र अगदीच समान असतात, परंतु फक्त एका छोट्याश्या फरकामुळे ते वेगळे ठरतात. तो फरक नेमका काय आहे हे आपण या कायदे विषयक लेखात पाहणार आहोत.
Succession Certificate : एखादा कमावता व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या पश्च्यात त्याच्या नावावर असलेले बँक खाते, बँक लॉकर, एखादी गुंतवणूक त्याच्या वारसदारांना मिळवायची असल्यास बँकेद्वारे ठरावीक कागदपत्र जमा करण्यास संगितले जाते. यामध्ये एक नाव असे असते जे आपल्यापैकी बहुतांश लोकांनी यापूर्वी कधीही ऐकलेले नसते. बरोबर ओळखलं, सक्सेशन सर्टिफिकेट. तर, एखाद्या मयत व्यक्तीच्या नावे असलेली जंगम मालमत्ता म्हणजेच Movable Property वर त्याच्या वारसदारांना पजेशन मिळवायचे असेल तर सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये अर्ज करून हे सक्सेशन सर्टिफिकेट मिळवता येते.
Heirship Certificate : जेंव्हा एखाद्या मयत व्यक्तीच्या स्थावर मालमत्ता म्हणजेच Immovable Property संबंधी हक्क प्रस्थापित करायचा असतो तेंव्हा हेयरशिप सर्टिफिकेटची आवश्यकता असते. जसे की, शेत जमीन, घर किंवा खुला प्लॉट यासंबधी कमांकरीत हेयरशिप सर्टिफिकेटची आवश्यकता भासते. तसेच, मयत व्यक्ती हा शासकीय कर्मचारी असेल तर त्याच्या पश्च्यात पेंशन अथवा इतर काही शासकीय बाबींसाठी कायदेशीर वारस प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यास तेंव्हा हेयरशिप सर्टिफिकेट देण्यात येते.
एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा अमित हा कुटुंब प्रमुख व कमावता व्यक्ती अपघातामद्धे निधन पावला. त्याच्या पश्च्यात त्याची बायको, एक मुलगा आणि वयस्कर आई आहेत. अमित हा नौकरी करीत असल्याने त्याच्या बँक खात्यात काही रक्कम होती, तसेच त्याने काही रक्कम F.D. करून ठेवली होती. निधन झाल्यानंतर काही काळानंतर अमितचा मुलगा मृत्यू प्रमाणपत्र घेऊन बँकेत गेला आणि वडिलांच्या खात्याबाबत चौकशी केली. परंतु बँक अधिकार्याने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. अश्या परिस्थितीमध्ये अमितच्या वारसानी सक्सेशन सर्टिफिकेट साठी अर्ज करणे आवश्यक असते.
तर हा होता सक्सेशन आणि हेयरशिप सर्टिफिकेट मधील मुख्य फरक. हा फरक वगळता या दोन्ही सर्टिफिकेट मध्ये अर्जाची पद्धत, कोर्टाची प्रक्रिया, लागणारा वेळ यामध्येही तितकासा फरक नाही आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी एखाद्या मयत व्यक्तीचे कायदेशीर वारसदार ओळखण्यासाठी अशा वारस दाखल्यांची आवश्यकता भासते. यासाठीचा खर्च देखील अत्यंत कमी आहे.
Sir,
If deputed executor do not submitted will in court and taking long time and avoiding to submitted will. And asking money to submit will in court. What will next step for succession or heirship. certificate.L