एकत्रीकरण योजना म्हणजे नक्की काय? जाणून घ्या एकत्रीकरण योजनेचे कामकाज कश्याप्रकारे होते?

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

आपला देश कृषीप्रधान देश असल्याने सर्वांची उपजीविका ही शेतीवर आणि शेतीशी संलग्न असणारे व्यवसायांवर अवलंबून असते, त्यामुळे जसे एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन होत चाललेले आहे त्याप्रमाणे उपलब्ध भूखंडाचे वाटप होता होता त्याचे अतिशय लहान लहान तुकड्यांमद्धे रूपांतर होऊ लागले आहे.

एकच जमीन मालकाच्या शेतीचे असे लहान लहान तुकडे विभागले जाऊन जमिनीची मशागत करून त्यातून उत्पन्न घेणे अशक्य वाटू लागले आणि यामुळे या कायद्याची आवश्यकता वाटू लागली. कायद्याची गरज भासू लागली त्याप्रमाणे प्रयत्न देखील सुरू झाले आणि जसे प्रयत्न सुरू झाले त्याप्रमाणे काही विरोध तर कधी संमती अखेर हा कायदा सर्वप्रथम मुंबई प्रांतात दिनांक 8 एप्रिल 1948 रोजी लागू करण्यात आला.

कोल्हापूर संस्थानांमध्ये हा कायदा 1 मार्च 1949 रोजी लागू करण्यात आला. विदर्भ व मराठवाडा भागात हा कायदा 1 एप्रिल 1959 रोजी पासून लागू करण्यात आला. परंतु एकत्रीकरण योजना म्हणजे नक्की काय हे अद्यापही बर्‍याच लोकांना माहीत नाही, आजच्या या लेखात आपण यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

जमिनीचे एकत्रीकरण करण्याआधी या कायद्याचे कलम 3 अन्वये ज्या गावांमध्ये एकत्रीकरणाची करण्याचे आहे त्या गावास राजपत्रात स्थानिक क्षेत्र घोषित केले जाते. त्यानंतर प्रमाणभूत क्षेत्र ठरवले जाते आणि कलम 15 अन्वये आधिसुचना ( म्हणजे G.R. ) तयार केला जातो, तो GR प्रसिद्ध केला जातो.

पुढे एकत्रीकरण अधिकारी शेत-पुस्तक आणि गावचा नकाशा असे कागदपत्र तयार करतात. त्यानंतर 100 खातेदारास एक आणि ग्रामपंचायती मधील सदस्यांपैकी एक अशा प्रतिनिधी स्वरूपाच्या एका ग्राम-समितीची नेमणूक केली जाते, आणि याच प्रतिनिधी मधून एका चेअरमनची निवड केली जाते. ग्राम-समिती स्थापन केल्यानंतर एकत्रीकरण भूमापक गावी प्रत्यक्ष जागेवर शेतीची पाहणी करून शेत पुस्तकातील नोंदी प्रत्यक्ष जागेवरील वहीवाटी प्रमाणे आहेत किंवा नाही याची खात्री करतात.

तसेच जर पोटहिस्से पडलेले असतील तर त्याची देखील मोजणी करून घेतात आणि फाळणी बारा मध्ये याच्या नोंदी घेऊन रेकॉर्ड अद्ययावत करतात. अश्या प्रकारे एकत्रीकरणाच्या कामाला सुरूवात केली जाते.

एकत्रीकरण योजनेमध्ये खातेदर्‍यांच्या विखुरलेल्या जामीनिंची एकत्र बांधणी करून एकत्र गट बांधणी केली जाते. गट बांधणी करताना संबंधित खातेदारांची संमती घेऊन त्यांचा जबाब देखील नोंदवला जातो. पुढे पंचनामा करून त्यावर खातेदार आणि पंचांच्या सह्या-अंगठे घेतले जातात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खातेदारांना जमिनीचा ताबा देण्यात येतो.

ही झाली एकत्रीकरण योजना म्हणजे काय आणि एकत्रीकरण योजनेचे कामकाज कश्याप्रकारे केले जाते याबद्दलची सविस्तर माहिती. आता एकत्रीकरण योजनेदारम्यान अनेक नवनवीन शब्द एकण्यास मिळतात त्यापैकि एक म्हणजे फाळणी बारा. तर हा फळणी बारा म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. एकत्रीकरण योजना लागू होऊन नवीन रेकॉर्ड बनवण्यापूर्वीच्या ज्या काही नोंदी असतात, त्या नोंदी ज्या पुस्तिकेत नोंद करून घेतात त्याला फाळणी बारा असे म्हणतात. यामध्ये पूर्वीचे खाते क्रमांक, मालकाचे नाव, पूर्वीचा सर्वे नंबर, पूर्वीचे क्षेत्र इत्यादि अश्या नोंदी असतात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *