मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आपल्या एका वाचकाचा कोर्टात दिवाणी दावा सुरू आहे, त्या दाव्यासंबंधी वाचकाने आपल्याला एक प्रश्न विचारला आहे. ”प्रतिवादिस दोन वेळा दाव्याचे समन्स पाठवले असून, त्याने ते समन्स घेतलेले नाही. अश्या परिस्थिती मध्ये एकतर्फी आदेश करून घेता येईल का?” मित्रांनो, या प्रश्नाचे सविस्तर उत्तर अनेक वाचकांसाठी उपयोगी ठरेल या उद्देशाने हा लेख लिहण्यात येत आहे. हा लेख शेवटपर्यंत वाचा.
मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे दावा कोणताही असो प्रतिवादिस कोर्टाने समन्स काढल्याशिवाय आणि प्रतिवादीचे म्हणणे एकूण घेल्यशिवाय कोर्ट त्या प्रकरणात न्यायदानाचे कामकाज करीत नाही. त्यामुळे जर प्रतिवादिस एखाद्या दाव्याच्या समन्सची बजावणी झाली नाही तर त्या केससाठी कितीही उशीर होवो, कोर्ट त्या प्रकरणात अंतिम निर्णय देत नाही.
प्रतिवादिस समन्सच्या बजावणीचे अनेक प्रकार आहेत. बेलीफ द्वारे समन्सची बजावणी, रजिस्टर्ड पोस्टद्वारे समन्सची बजावणी, डखवून बजावणी, पेपर पब्लिकेशन इत्यादी बजावणीचे प्रकार आपण यापूर्वीच आपल्या एका लेखात सविस्तरपणे जाणून घेतलेले आहेत. त्यामुळे, जर प्रतिवादिस दाव्याच्या समन्सची बजावणीच झालेली नसेल तर सर्वप्रथम आपणास ती बजावणी कशी केली जाईल यावर लक्षकेंद्रीत करणे आवश्यक असते.
आता आपण आपल्या आजच्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळूया. आता समजा प्रतिवादीला समन्सची बजावणी झाली, तर पुढे 2 शक्यता असतात. पहिली शक्यता म्हणजे समन्सवर देण्यात आलेल्या तारखेस प्रतिवादी हजर राहतो किंवा दुसरी शक्यता म्हणजे समन्स प्राप्त झाल्यानंतर देखील प्रतिवादी कोर्टात हजर राहत नाही.
प्रतिवादी कोर्टात हजर झाल्यानंतर आपले म्हणणे दाखल करण्यासाठी प्रतिवादी कोर्टाकडून अधिकचा वेळ मागून घेऊ शकतो. समन्स प्राप्त झालेल्या तारखेपासून जास्तीत जास्त 90 दिवसांपर्यंतचा वेळ प्रतिवादिस देण्यात येऊ शकतो. त्यानंतर देखील प्रतिवादीने आपले म्हणणे दाखल केले नाही तर No W.S. ची ऑर्डर करून प्रकरणात पुढील कामकाज केले जाते.
आता, जर प्रतिवादीस समन्स प्राप्त झाल्यानंतरही कोर्टाने दिलेल्या तारखेस प्रतिवादी हजर झाला नाही तर कोर्ट त्या प्रतिवादीस पुन्हा समन्स काढत नाही. प्रतिवादी हजर न झाल्यास वादीद्वारे एकतर्फी दावा चालवण्याचा अर्ज करून त्यावर कोर्टाचा आदेश घेतला जातो. अश्या पद्धतीने प्रतिवादी विरुद्ध एकतर्फी प्रकरण चालवण्याचा आदेश कोर्टातर्फे दिला जातो.
एकंदरीत, प्रतिवादीस समन्सची बजावणी झालेली नसेल तर कोर्टाद्वारे पुन्हा पुन्हा समन्स काढून प्रतिवादीला त्याच्या विरुद्ध सुरू असलेल्या दाव्याची कल्पना देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, प्रतिवादिस एकदा समन्स प्राप्त झाले, तसा रिपोर्ट कोर्टसमोर दाखल झाल्यानंतर कोर्ट पुन्हा कधीच त्या प्रतिवादिस समन्स काढत नाही. प्रतिवादी हजर न झाल्यास त्याच्याविरुद्ध एकतर्फी प्रकरण चालवून आदेश दिला जातो.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.