टीव्हीवर किंवा फॅशन शोमध्ये मॉडेल्स रॅम्प वॉक करताना कधीही हसत नाहीत हे तुमच्या लक्षात आले आहे का? हसणे सोडा, चेहर्यावर साधं एक्सप्रेशन सुद्धा नसतं त्यांच्या. इतकं सुंदर आणि परफेक्ट होऊनही ती मॉडेल आनंदी नाही असं वाटतं. ब्रँड जितका मोठा असेल त्यांच्या मॉडेल देखील तितक्याच जास्त भावनाहीन वाटतात. तुम्ही टीव्हीवर किंवा खरच कधी फॅशन शो पाहिला असेल तर त्यात एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. सुंदर कपडे घालून रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्स कधीच हसत नाहीत.
बरेच लोक असा अंदाज लावतात की ते त्यांच्या कामात खूश नाहीत, म्हणून ते कधीही हसत नाहीत. या सर्व केवळ अफवा आहेत. यामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे त्यांना उदास चेहरा करावा लागतो. वास्तविक, मॉडेल्सच्या भावनाशून्य चेहऱ्यांमागे काही सुविचारित कारणे आहेत. त्याची कारणे काय आहेत, ते समजून घेऊया.

एक गंभीर चेहरा आत्मविश्वास दर्शवतो :
कोणतेही एक्सप्रेशन न देणे हे वाटतं तितकं सोपं नाही. शेकडो लोकांच्या नजरा जेंव्हा आपल्याकडे असतात तेंव्हा आपल्यामधील आत्मविश्वास त्या लोकांना दिसणे गरजेचे आहे, आणि गंभीर चेहरा हा आपल्यामधील आत्मविश्वास दाखवतो. तुम्ही कधी जुन्या काळातील राजा-राणी किंवा महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचे चित्र पाहिले आहेत का? त्या चित्रांमद्धे ते व्यक्ती कधीही हसताना दिसणार नाहीत, त्यांचे चेहरे नेहमी गंभीर असे. लोकांना आपल्यामधील आत्मविश्वास दाखवणे हे त्यामागचे कारण असे.
चेहर्यावर कोणताही भाव नसण्याचे खरे कारण :
आता आम्ही तुम्हाला मॉडेल्सच्या भावहीन चेहर्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण काय आहे ते सांगू. रॅम्पवर चालताना मॉडेल्सचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांकडे सर्वांच्या नजरा टिकून राहिल्या पाहिजे. सुंदर मॉडेलच्या चेहर्यावर छान असे एक्सप्रेशन दिसल्यास पाहणार्यांचे डोळे कपड्यांकडे नाही तर त्या मॉडेलच्या चेहर्यावर स्थिरावतील, नाही का?
रॅम्पवरील मॉडेलचा लूक प्रायोगिक आहे. कधी-कधी ती विचित्र कपड्यांमध्ये रॅम्पवरही जाते. अशा परिस्थितीत, जर ती मॉडेल हसायला लागली तर ते विचित्र देखील दिसू शकते. अश्याने त्या फॅशन शो मधील सर्व दर्शक देखील हसू शकतात, आणि यामुळे तो कॉमेडी शो आहे की काय असे चित्र दिसू लागेल. या गोष्टी एखाद्या ब्रॅंड साठी न परवडणार्या आहेत. त्यामुळे मॉडेल जितकी गंभीर होऊन आपले काम करते, तेवढ्याच गंभीरतेने दर्शक देखील तो फॅशन शो पाहतात.

हसणारा चेहरा दर्शवितो की त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यात रस आहे किंवा तुम्ही बोलण्यास योग्य आहात असे वाटते. आवेगपूर्ण मॉडेल्स हे दर्शविते की ते इतर लोकांपेक्षा वरचे आहेत आणि त्यांना त्यांच्यात रस नाही. देहबोली अशी आहे की ते तुमच्यापेक्षा चांगले आहेत. त्यांनी परिधान केलेले कपडे इतरत्र कुठेही नसतात त्यामुळे त्या मॉडेल्स इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. रॅम्पवर कोणत्याही भावना चेहऱ्यावर येऊ न देण्याचा हाही एक हेतू आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.