महाराष्ट्रात काही भागात अवकाळी पडतोय, तर काही ठिकाणी अति उष्णतेने अंतर्वस्त्रना घाम फुटला आहे. मात्र, दरम्यान या सगळ्या वरचा एकच उपाय दिसतो तो म्हणजे दारू. कारण अवकाळी असो।किंवा पावसाळ्याचे दिवस या काळात अनेक लोकांचा रम किंवा व्हिस्कीचा मूड होऊ शकतो.
तसेच जगात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक मोसमासाठी दारूची कॅटगिरी करून ठेवलेली आहे. मात्र, यासगळ्यात सर्वांना एकच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे गोव्यात दारू इतकी स्वस्त कशी? भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गोवा मात्र भारताचा भाग नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष गोव्यात पोर्तुगिजांची राजवट होती.
गोवा मुक्ती संग्रामाच्या लढ्यानंतर 1961 साली गोवा राज्याच भारतात विलीनीकरण झालं. मात्र, गोव्यातुन पोर्तुगीज गेले खरं मात्र त्यांनी मागे सोडून गेले ते म्हणजे एक सुंदर शहर ज्याला आपण आज ओल्ड गोवा म्हणून ओळखतो. गोव्यात अनेक इतिहास कालीन इमारती आणि किल्ले तर होतेच,
मात्र पोर्तुगीजांनी 1510 ते 1961 या 450 वर्षांपेक्षा जास्त काळ गोव्यावर राज्य केले. या इतक्या प्रदीर्घ कालखंडात मुळात व्यापारासाठी आलेले पौतुंगीजांनी गोव्याला अनेक गोष्टी दिल्या.
यामध्येच पोर्तुगीजांनी त्याच्या देशात तयार केलेली वाइन गोव्यात विकण्यास सुरुवात केली आणि अनेक वर्ष मुरवलेली वाइन गोव्याच्या लोकांमध्येच काय तर तिथल्या संस्कृती रुजली ती कायमची.
तसेच पुढे मात्र, पोर्तुगीज गेल्यावर या वाईनची जागा व्हिस्की, रम, बियर यासारखे मद्यानी घेतली. तसेच याशिवाय गोव्यात पोर्तुगीजानी बंगले, सरकारी कार्यालय बनवली, यांची स्वतःची अशी एक वेगळीच आर्किटेक्चरल स्टाईल होती. त्यामुळे या इमारती उठून दिसत. या इमारतीबरोबरच पोर्तुगीजांनी खाद्य संस्कृतीत सुध्दा बदल केला.
यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे युरोपियन अन्न त्यांनी गोव्यात आणले. याचबरोबर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी वाइन बरोबर शांत-निवांत लाईफ एन्जॉय करायची सवय सुध्दा पोर्तुगीजांनी गोव्याला लावली. साल 1987 गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. नवीन राज्य तयार झालं.
खरं, मात्र ते इतकं लहान की त्यात फक्त दोनच जिल्ह्याचा समावेश होता. आता राज्य चालविण्यासाठी लागणारा पुरेसा महसूल मिळणार नव्हता. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं होतं की, गोवा एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकतात आणि काहीच झालं तसंच. त्यानुसार रणनिती आखली गेली आणि गोव्याच्या उदारमतवादी संस्कृतीच मार्केटिंग केलं गेलं.
गोव्याकडे पर्यटकांचा ओढा आपसूकच होता पण तो अजूनच वाढला. तसेच याच दरम्यान दारूची मागणी अनपेक्षितरित्या वाढताना दिसली. भारतीय पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकांच्या पसंतीस गोवा उतरलं होतं. दारूची मागणी लक्षात घेत राज्य सरकारने अतिरिक्त भर कमी करून दारू स्वस्त करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पासून गोव्यात दारु स्वस्त झाली.
मात्र, यासुद्धा एक गंमत आहे. गोवा सरकारने दारू स्वस्त केली खरी मात्र अन्न आणि बाकीच्या सुविधांचा कर वाढवला. त्यामुळे गोव्यात इतर मनोरंजनाच्या गोष्टीही महागाई कारण त्यावर अधिकचा कर आहे. याशिवाय गोव्यात जर तुम्हाला प्रायव्हेट गाडी घेऊन जायचं असेल तरीही तुम्हाला कर भरावा लागतो,
अशा प्रकारे सरकारने दारू स्वस्त गेली आणि स्वतःला महसूल वाढवला. याचबरोबर, दिवदमान, चंदीगड सारख्या केंद्रशासित प्रदेशात दारू स्वस्त असण्याचे कारण सुद्धा पोर्तुगीज, डच या सारख्या युरोपिय सत्तांचा राज्य होतं हेही कारण आहेच. याशिवाय केंद्रशासित राज्य असल्याने तिथे इतर राज्यांचा कोणत्याच कर लागत नाही, फक्त केंद्राचा कर लागतो. त्यामुळे तिथे दारू स्वस्त मिळते.