गुगल मॅप काम कसं करत? ते किती सुरक्षित मानले जाऊ शकते?

Infomative

आपल्या अंगवळणी पडलेल्या टेक्नॉलॉजी पैकी हे एक उत्तम उदाहरण गुगल मॅप होय. बरेलीमध्ये मध्ये अक्सिडेंट किंवा मॅप्स पाहत गेल्यामुळे दलदलीत सापडलेल्या ऑस्ट्रेलियातले टुरिस्ट असो, टेक्नॉलॉजीला असणारे मर्यादा वेळोवेळी समोर येतात. मग चला तर जाणून घेऊ की, गुगल मॅप काम कसं करत? आणि ते कधी-कधी दगा का देत?

फेब्रुवारी 2005 मध्ये गूगल मॅप्स अमेरिकेत पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आलं. या अँपसाठी लागणारी टेक्नॉलॉजी गुगलने स्वतः विकसित करायला घेतले होते, पण यावरच काम करत असलेल्या कंपनी टेकओव्हर केल्यानंतर त्यांना पाठबळ मिळालं. ऑक्टोबर 2004 मध्ये ही कंपनी व्हेअर टू टेक ही कंपनी विकत घेतली. त्यानंतर रिअल टाइम ट्राफिक मॉनिटरिंग करणारी आणि उपग्रह छायाचित्रांद्वारे वर्चुअल मॉडेल तयार करणारी की की होल् ही कंपनी ताब्यात घेतली.

याचा की होल्वर आजचा गुगल अर्थ आधारित आहेत. पण याच्या काही गोष्टींचा वापर गुगल मॅप साठी केला जातो. उपग्रह छायाचित्र आणि आकाशातुन काढण्यात आलेल्या छायाचित्रांच्या मदतीने एक चूक नकाशा तयार केला जातो. यामध्ये अधिक भर घातली जाते ती स्ट्रीट विव्हद्वारे. यासाठी सुरुवातीच्या जेव्हा 2007 मध्ये हे सुविधा लॉन्च करण्यात आलं तेव्हा गुगलने इतर वाहनांवर 360° डिग्री फोटो कॅमेरे लावले आणि या वाहनांनी सगळ्या रस्त्यांचे फोटो काढले. नंतर जगभरात हीच गोष्ट करण्यात आली होती.

अगदी वाळवंटामध्ये उंटावर देखील त्यांनी कॅमेरे लावले होते. सुरुवातीला उपग्रह छायाचित्रांच्या पहिल्या प्रक्रियेवर ही माहितीची पुढची लावली जाते. 2011 केलेली गुगलने केलेली एक अनोखी गोष्ट म्हणजे त्यांनी लोकांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यांनी तयार केलेल्या नकाशांमध्ये लोकांना भरता येत होती, त्यामुळे गुगलला जगातील अनेक जागांची आणि रस्त्यांची नावं अँपमध्ये अपडेट करता आली आणि तिथूनच आपची लोकप्रियता आणि वापर झपाट्याने वाढला.

जीपीएसच्या मदतीने तुमच्या लोकेशननुसारचे रियल टाइम अपडेट हा तुम्हाला देत असतो. फोटोग्रम्मेत्री या शब्दाचा अर्थ होतो फोटोंचा वापर करून प्रत्यक्षात या वस्तू, इमारती किंवा पुतळे तसेच डोंगरा सारख्या नैसर्गिक गोष्टींचा मोजमाप करणे. या टेक्नॉलॉजीचा वापर गुगल मॅपमध्ये केला जातो आणि आपल्याला 3d गोष्टी दिसू शकतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांनी मिळवलेली जिससॉ पझल सारखी एकत्र जोडली जाते.

सध्याच्या घडीला जेव्हा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला किती वेळ लागेल हे तपासता तेव्हा आधी पासून असणाऱ्या या सगळ्या माहितीच्या सोबत इतर देखील काही गोष्टींचा आधार घेतला जातो, म्हणजे या वेळेत यापूर्वी प्रवास करणाऱ्या व्यक्तीने या विषयी काही माहिती लिहिलेली आहे का ? किंवा यापूर्वीच्या नोंदीनुसार आठवड्यातल्या ठराविक यावेळी इथं किती ट्राफिकची नोंद झाली होती ही माहिती गुगलकडे असते, शिवाय गुगलने अनेक देशातल्या ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम सोबत देखील रिअल टाइम अपडेटसाठी हात मिळवणी केलेली आहे.

तसेच लोकांकडून माहिती मिळवणं हा ट्रॅफिकची माहिती मिळवण्यासाठीचा भूगोल चा मोठा स्रोत आहे. तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुम्ही गुगल मॅप्स वापरताना जीपीएस लोकेशन ऑन केले असल्यास दोन वेळी काही डेटा तुमच्या नावाशिवाय पाठवला जातो. वाहन किती भरभर हलतात किंवा किती काळ थांबलेली आहेत हे गुगलला समजते. या सगळ्या माहितीच्या आधारे AI मशीन लर्निंगच्या मदतीने गुगल मॅप तुमच्या आमच्या प्रवासाला किती वेळ लागेल? याचा अंदाज मांडत. तुम्ही प्रवासात जसजसे पुढे जातात त्यानुसार हा अंदाज बांधला जातो.

असं अनेकदा होते की,अनेकदा होतं की आपण गुगल मॅप्सने सांगितलं म्हणून एका गल्लीत शिरतो पण तो रस्ता बंद असतो. असं का होतं? तर स्थानिक गोष्टी बारीक-सारीक अपडेटसाठी गुगल युजर्स वरती अवलंबून असतात, त्यामुळे जोपर्यंत एखादा रस्त्याच्या या बदलाविषयी सुरू झालेल्या कामाविषयी नाव वरती नोंद करत नाही, तोवर गुगलला हे समजत नाही. अनेकदा उपग्रहाच्या आधारे काही गोष्टींचा आरेखन केलं जातं, म्हणजे दोन जागा यांना जोडणारा एखादा ब्रिज आहे तो सुरू आहे पण त्या ब्रीजवर फक्त कारना परवानगी आहे.

दुचाकी किंवा रिक्षांना परवानगी नाही, याची गुगलकडे नसते. त्यामुळे तो तपशील तुम्हाला मिळत नाही.भारतासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव भारतामध्ये गुगलच्या स्ट्रीट विव्ह कारवरती बंदी घालण्यात आली होती. 2022 अशाप्रकारे स्ट्रीट विव्ह कारचा वापर करून रस्त्यांचे तपशीलवार नकाशे म्हणजे मॅपिंग करायची परवानगी गुगलला देण्यात आली, म्हणूनच भारतातल्या सगळ्या जागांचा अजून गुगलकडं तपशीलवार मॅपिंग झालेलं नाही.

तसेच व्यक्तीगत मुद्द्यावर गुगलवर आजवर अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. तुम्ही कधी कुठे गेला होता? तिकडे किती वेळा होतात? हे गुगल लक्षात ठेवत. अनेकदा तुम्हाला या जागांबद्दल विचारत असत. तसेच इतरही काही डेटा गोळा होत असतो, पण हा सगळा डेटा गुगल कडे जाऊ नये, म्हणून हा ऑप्शन्स बंद करण्याचा पर्याय असतो. गुगल कडे येणाऱ्या माहितीवर याचा देखील परिणाम होत असतो. गुगलने आजपर्यंत 220 देशाचे आणि प्रदेशांचा मॅपिंग केलेलं असलं तरी इंटरेस्टिंग म्हणजे चीन, कॅरॅमिया, कुबा, उत्तर कोरिया, सीरिया, वियतनाम आणि रशिया-युक्रेन या ठिकाणी गुगल मॅप वरती बंदी घातली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *