महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण दहा आमदार कोणते? जाणून घ्या!!

Infomative

मित्रांनो गेल्या महिन्यातच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली, त्यामध्ये महायुती सरकारने महाविजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवली आहे. महाराष्ट्रामध्ये आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे असायला हवे, हे तर तुम्हाला माहितीच असेल. परंतु यंदा महाराष्ट्रातील 288 आमदारांना पैकी अनेक तरुण आमदार विधानसभेत पोहचले आहेत. अशातच आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..

◆ योगेश दादा कदम : 2024 विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये योगेश दादा कदम यांचा 10 वा क्रमांक लागतो. जे दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदेगट पक्षाचे आमदार आहे. यांचे संपूर्ण नाव योगेश दादा रामदास कदम असे आहे. त्यांचे वडील रामदास कदम रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदान विधानसभेचे सदस्य होते. योगेश दादा कदम यांची जन्म तारीख 18 फेब्रुवारी 1986 असून ते सध्या 38 वर्षांची आहेत.

◆ विलास भुमरे : महाराष्ट्रातील तरुण आमदारांच्या यादीमध्ये विलास भुमरे यांचा नववा क्रमांक लागतो. ते पैठण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट पक्षाचे आमदार आहेत. यांचे संपूर्ण नाव विलास संदिपान भुमरे असे आहे, त्यांचे वडील संदीपान भुमरे हे सध्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघातील खासदार आहेत. विलास भुमरे यांचे वय सध्या 38 वर्षे इतकी आहे.

◆ स्नेहा दुबे : महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये स्नेहा दुबे यांचा आठवा क्रमांक लागतो. या वसई विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. यांचे संपूर्ण नाव स्नेहा प्रेमराव दुबे पंडित असे आहे. तशीच व्यवसायिक आहेत. स्नेहा दुबे यांची वय सध्या आहे नंबर 38 वर्षे आहे.

◆ बाबासाहेब देशमुख : 2024 च्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये बाबासाहेब देशमुख यांचा सातवा क्रमांक लागतो. जे सांगोला विधानसभा मतदारसंघातील भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे आमदार आहेत. यांचे संपूर्ण नाव डॉक्टर बाबासाहेबां आणासाहेब देशमुख असे आहे. भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रातील उमेदवार बाबासाहेब देशमुख यांचे वय 37 वर्षे आहे.

◆ आदित्य ठाकरे : विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचा सहावा क्रमांक लागतो. हे मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना संस्थापक श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांची जन्मतारीख 3 जून 1990 असून ते सध्या 34 वर्षाचे आहेत.

◆ श्रीजया चव्हाण : महाराष्ट्र तरुण आमदारांमध्ये श्रीजया चव्हाण यांचा पाचवा क्रमांक लागतो. ज्या नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या त्या कन्या आहेत. त्यांचे जन्मसाल 1992 असून सध्या 32 वर्षाच्या आहे.

◆वरूण सरर्देसाई : 2024 चा विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांमध्ये वरूण सरर्देसाई यांचा चौथा क्रमांक लागतो. हे मुंबईतील वांद्रे ईस्ट विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गट शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. यांचे संपूर्ण नाव वरूण सतीश सरदेसाई असे आहे. जे प्रसिद्धी व्यवसायिक आणि राजकारणी आहेत. त्यांचे जन्मस्थान 1992 असून ते सध्या 32 वर्षाची आहे.

◆ राघवेंद्र पाटील : महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांचे यादीमध्ये राघवेंद्र पाटील यांचा तिसरा क्रमांक लागतो. जे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. यांचे संपूर्ण नाव राघवेंद्र मनोहर पाटील असे आहे. त्यांच्या शैक्षणिक रेकॉर्डच्या दृष्टीने ते पदवीधर व्यवसायिक आहेत आणि सध्या त्यांचे वय 31 वर्षे आहे.

◆ करण देवताळे : महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये करण देवताळे यांचा दुसरा क्रमांक लागतो. जे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. यांचे संपूर्ण करण संजय देवताळे असे आहे. सध्या यांचे वय 29 वर्षे इतकी आहे.

◆ रोहित पाटील : 2024 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांची यादीमध्ये रोहित पाटील यांचा क्रमांक लागतो. जे सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. यांचे संपूर्ण नाव रोहित सुमन आर आर आबा पाटील असे आहे. माजी मंत्री आर आर पाटील यांचे पुत्र आहेत. ते महाराष्ट्र बरोबर देशातील सर्वात तरुण आमदार आहे. यांचे वय सध्या फक्त 25 वर्षांची आहे.

तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात आमदार कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. महाराष्ट्रातील तुमचा आवडता तरुण आमदार कोणता आहे? ते आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *