आपल्या हिस्स्यात आलेली वडीलोपार्जित संपत्ती इतरांना विकण्यापूर्वी भाऊ-बहिणीला विकत घेण्याबाबत विचारणे गरजेचे आहे का?

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

आपणास कायद्याबद्द्ल थोडीफार माहिती असेल किंवा तुम्ही आमचे इतर लेख वाचलेले असतील तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच माहीत असेल ती म्हणजे प्रॉपर्टी 2 प्रकारची असते. एक म्हणजे स्वकष्टार्जित प्रॉपर्टी ( स्वतः विकत घेतलेली प्रॉपर्टी ) आणि दुसरी म्हणजे वडीलोपार्जित प्रॉपर्टी ( आजोबा-पंजोबा यांच्याकडून वारस हक्काने मिळालेली प्रॉपर्टी ). प्रॉपर्टी जर स्वतः विकत घेतलेली असेल तर त्या प्रॉपर्टी बद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला इतर कोणाची देखील परवानगी घेण्याची कायद्याने आवश्यकता नाही हे तुम्हास माहीत असेलच. परंतु वडीलोपार्जित प्रॉपर्टी बद्दल तसे नसते. वडीलोपार्जित प्रॉपर्टी बद्दल बरेच नियम आणि कडे आहेत जे पाळणे आवश्यक असते.

आजच्या या लेखात आपण वडीलोपार्जित जमिनीबद्दलचा असाच एक कायदा पाहणार आहोत जो बर्‍याच लोकांना माहीत नसेल. हा कायदा आपल्या हिस्स्यात आलेल्या वडीलोपार्जित प्रॉपर्टीच्या विक्री संबंधी काही महत्वाच्या अटी घालून देतो. त्या अटींचे पालन न केल्यास आपण अडचणीत येऊ शकतो. या कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने बाबू राम Vs संतोख सिंग, 2019 या केस मध्ये सुनावणी करत एक महत्वाचा निर्णय देखील दिलेला आहे. याबाबत आजच्या या कायदेविषयक लेखात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि महत्वाचा वाटल्यास शेअर करा.

आपण आजू-बाजूला घडत असलेल्या गोष्टींमद्धे किंवा आपल्या स्वतःच्या घरात असे पाहतो की वडीलोपार्जित प्रॉपर्टीची वरासदारांमद्धे वाटणी झाल्यानंतर ते आपआपली प्रॉपर्टी सांभाळतात. आता त्या वारसांपैकी एखाद्याला त्याची हिस्स्यात आलेली प्रॉपर्टी विक्री करण्याची आवश्यकता भासली तर तो/ती  आपली प्रॉपर्टी विक्री काढतो. त्या प्रोपार्टीची मनासारखी किंमत मिळाल्यानंतर तो ती प्रॉपर्टी बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला विक्री करतो. स्वतःच्या हिस्स्यातील जमीन विक्री करत असल्याने तो व्यक्ती आपल्या भाऊ-बहिणीला किंवा त्या संपूर्ण वडीलोपार्जित जमिनीमध्ये असलेल्या इतर वारसांना तुम्ही प्रॉपर्टी विकत घेणार का? असे न विचारता प्रॉपर्टी विक्री करून टाकतो. पण त्याचे असे करणे कायद्याला धरून आहे का? तर याचे उत्तर आपल्याला मिळते Hindu Succession Act च्या section 22 मध्ये.

आता आपण बाबू राम विरुद्ध संतोख सिंग या केस बद्दल थोडक्यात माहिती घेऊ. या प्रकरणात A आणि B हे 2 भाऊ होते. त्यांना त्यांची वडीलोपार्जित शेट जमीन वाटून मिळाली होती. त्या वाटणीद्वारे आपल्या हिस्स्यात आलेली जमीन B ने C या व्यक्तीला विकली. B ने जमिनीची विक्री करण्यापूर्वी आपला भाऊ A यास जमीन विकत घेणार का? याबादल विचारणा केली नव्हती. त्यामुळे A या व्यक्तीने दिवाणी न्यायालयात B आणि जमीन विक्री घेतलेला व्यक्ति C यांच्याविरुद्ध दावा दाखल केला, आणि मागणी केली की सदरील जमिनीचा विक्री व्यावहार कायदेशीर नसल्यामुळे रद्द करण्यात यावा. दिवाणी न्यायालयाने A विरुद्ध निकाल दिला.

आपल्या विरुद्ध निकाल गेल्यामुळे A या व्यक्तीने जिल्हा कोर्टात अपील केली आणि दिवाणी न्यायालयाचा निकाल बदलून शेत जमिनीचा विक्री व्यावहार रद्द करण्याची मागणी केली. जिल्हा न्यायालयाने ही मागणी मान्य करत निकाल B आणि C यांच्याविरुद्ध दिला. या निकलाविरूद्ध शेतजमीन खरेदी करणारा C हा व्यक्ती उच्च न्यायालयात गेला तिथेही निकाल त्याच्या विरुद्ध गेला. पुढे C हा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात गेला, तिथे सर्वोच्च न्यायालयाने हिंदू सक्सेशन कायद्यातील कलम 22 नुसार हा विक्री व्यवहार कायदेशीर नसल्याचे संगितले.

सर्वोच्च न्यायालयाने पुढे हे देखील संगितले की, वडीलोपार्जित मिळालेल्या कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये ( शेतजमीन, खुला प्लॉट, घर ई. ) पहिला हक्क हा त्या प्रॉपर्टी मधील इतर वरासदारांचा असल्यामुळे प्रॉपर्टी विक्री करते वेळी प्रथम इतर वरासदारांना प्रॉपर्टी खरेदी करण्यास इच्छुक आहेत का असे विचारणे कायद्याने आवश्यक आहे. अश्याप्रकारे B याने आपला भाऊ A यास खरेदी बाबत विचारणा न केल्यामुळे सदर विक्री व्यवहार हा कायदेशीर नसल्याचे सांगत तो रद्द केला.

आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळू. आपल्या हिस्स्यात आलेली वडीलोपार्जित संपत्ती इतरांना विकण्यापूर्वी भाऊ-बहिणीला विकत घेण्याबाबत विचारणे गरजेचे आहे का? तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि Hindu Succession Act च्या कलम 22 नुसार आपल्या हिस्स्यात आलेली वडीलोपार्जित संपत्ती इतरांना विकण्यापूर्वी भाऊ-बहिणीला किंवा इतर वारसदारांना विकत घेण्याबाबत विचारणे गरजेचे आहे हे स्पष्ट होते.

आता तुम्ही म्हणाल जर आपला भाऊ किंवा बहीण प्रॉपर्टी विकत घेण्यास इच्छुक असेल परंतु या कायद्याचा आधार घेत आपली पिळवणूक करण्यासाठी प्रोपार्टीची किंमत कमी करून मागत असेल तर काय करावे? याबाबतची सविस्तर माहिती कायद्यात दिलेली आहे. ती माहिती आपण पुढील लेखात समजून घेऊ. आजच्या लेखात दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *