जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात अशी होते फसवणूक

Agriculture Infomative Law

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो अगदी काल-परवाची गोष्ट आहे. औरंगाबाद मध्ये एक वृद्ध शेतकरी आजोबा भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या वावराची चार वेळेस खरेदी झाली आणि आता त्याच एकाच वावराची पाचव्यांदा खरेदी होण्यासाठीच जाहीर प्रकटन सुद्धा आले आहे. त्यावेळेस मनात विचार आला की एकाच जमिनीची चार-पाच वेळा खरेदी कशी काय होऊ शकते? याचा अर्थ तिथे काहीतरी पाणी मुरत होते.

तर आज आपण शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये फसवणूक कशी होते? ही फसवणूक करण्याचे पाच मार्ग कोणते? आणि या फसणुकी पासून बचाव करण्यासाठीचे मार्ग कोणते? त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जमिनीच्या व्यवहारात फ्रॉड होण्याचा पहिला मार्ग म्हणजे बनावट कागदपत्र, बोगस कागदपत्र आणि खोट्या व्यक्ती. म्हणजे व्यवहार करताना अनेकदा बोगस कागदपत्र सादर केले जातात आणि खोट्या व्यक्तींना उभे केले जाते. त्यामुळे मग ज्यावेळेस प्रत्यक्षात जमिनीचा व्यवहार होतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जमिनीचा मूळ मालक हा वेगळा असतो आणि व्यवहार करणारा हा वेगळाच असतो.

या वेळेस आपली फसणूक झालेली असते. जमिनीच्या व्यवहारांमध्ये फ्रॉड होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे एकच जमिनीचा भूखंड अनेकांना विकणे. ज्यावेळेस आपण एखादी जमीन खरेदी करतो त्यावेळेस जमिनीचा खरेदीखत रजिस्टर केला जातो आणि मग सातबारा उतारावर नोंद केली जाते. आता यामध्ये बदल होण्यासाठी दोन ते तीन महिने सहज लागतात. पण या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत जमिनीचा मूळ मालक ती जमीन रजिस्टर खरेदीखत वापरून इतरांना विकू शकतो. अशा वेळेस आपली सरळ सरळ फसवणूक होते.

आता पाहूया फ्रॉड करण्याची तिसरी पद्धत ती म्हणजे ईसार एका व्यक्तीकडून घ्यायचा आणि विक्री मात्र दुसऱ्याच्या व्यक्तीला करायचे. जमीन खरेदी करताना इसार म्हणून काही रक्कम आधी देऊन नंतर पूर्ण पैसे द्यायचे आणि जमिनीचा व्यवहार पूर्ण करायचा अशी पद्धत असते. थोडक्यात काय आडवांस रक्कम देऊन पूर्ण पैसे दिल्यानंतर व्यवहार पूर्ण करायचा.

मात्र अनेकदा एखाद्या व्यक्तीने इसार दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या व्यक्तीने जास्त पैशांची ऑफर दिली तर मूळ मालक दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार रजिस्टर खरेदी खत द्वारे पूर्ण करून टाकतो. यामध्ये इसार दिलेल्या व्यक्तीची फसवणूक होते. मग अशा वेळेस काय करायचं एखाद्या व्यक्तीने जर काही ईसार दिला असेल तर त्या इसाराच्या पावतीवर निश्चिंत न राहता लवकरात लवकर खरेदी खत रजिस्टर करण्याचा प्रयत्न करायचा. जेणेकरून आपली फसवणूक टळेल.

फ्रॉड करण्याचा चौथा मार्ग म्हणजे गहाण जमिनीची विक्री. म्हणजेच काय तर एखादा शेतकरी असेल किंवा जमिनीचा मूळ मालक असेल तो त्याच शेत गहाण ठेवून जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतो. आणि ते कर्ज किंवा त्या कर्जाचा बोजा सातबारा उतारावर नोंद होण्यापूर्वीच त्या जमिनीची विक्री करत असेल तर या वेळेस ग्राहकाची फसवणूक होते. त्यावेळेस मग जमिनीचा व्यवहार करताना त्या जमिनीवर त्या सातबारावर काही बोजा चढवला आहे की नाही, त्याच्यावर कर्ज आहे की नाही हे आपण तपासून पाहिल पाहिजे.

फ्रॉड करण्याचा पाचवा मार्ग म्हणजे वारसांचे हक्क. ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो त्याचा मृत्यू होतो त्यावेळी सातबारा उताऱ्यावर त्याच्या मुलांची नाव लावलेले आपण पाहतो. बऱ्याचदा मुलींची किंवा इतर वारसांची नावे त्या उताऱ्यावर दिसत नाहीत. अशा वेळेस जर का तुम्ही अशी जमीन खरेदी करत असाल तर ती जमीन खरेदी करूनही तुम्हाला काही उपयोग होत नाही.

कारण हे इतर वारस असतात किंवा मुली असतात त्यांनी खरेदी विरोधात जर कोर्टात धाव घेतली तर मात्र हे प्रकरण बरेच वर्ष चालू शकत. अशी जमीन विकत घेताना तुम्ही त्या गावातील विश्वासू लोकांशी संपर्क साधला पाहिजे. त्या गावातल्या तलाठ्याशी संपर्क साधून सातबारा उतारा अपडेटेड आहे की नाही, योग्य आहे की नाही ते तपासले पाहिजे.

आपण फ्रॉड करण्याचे पाच मार्ग पाहिले. पण जर का तुमची अशी फसवणूक झाली असेल तर तुम्ही तक्रार कुठे करू शकता हे पाहूया. अशा प्रकरणात फसवणूक झाली असल्यास व्यक्ती आपल्या अर्जासह जमिनीचे कागदपत्र तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन तक्रार नोंदवू शकतात. त्या कागदपत्रांच्या आधारे त्याचा पुढील तपास करता येतो. याशिवाय जर आर्थिक फसवणुक असेल तर त्याची पोलिसात तक्रार करता येते. पोलीस त्याबाबतची पुढील कारवाई करतात.

अश्या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? जमिनीची खरेदी करण्यापूर्वी जर का आपली फसवणुक टाळायची असेल तर त्यासाठीच्या काही सोप्या ट्रिक आहेत त्या अवलंबून पहा. सगळ्यात पहिले काय करायचं तर ज्या गावात आपल्याला जमीन खरेदी करायचे आहे त्या गावातील जमिनीचा किंवा शेताचा अपडेटेड सातबारा उतारा, 8अ आणि जमिनीचा नकाशा बघायचा.

आता सातबारा उताऱ्यावर नेमक्या कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत त्या म्हणजे सातबारा उताऱ्यावर विक्री करणाऱ्या व्यक्तीचेच नाव आहे का ते पाहावे. त्यावर मयत किंवा जुना मालक यांची नावे असल्यास ती काढून घेणं आवश्यक असतं. दुसर म्हणजे जमिनीवर कोणत्याही बँक किंवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री तसेच न्यायालयीन खटला चालू असल्यास संदर्भ तपासून पहावा.

तिसरं म्हणजे शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग, रस्ता इत्यादी नसल्याची खात्री करावी किंवा याची उताऱ्यावर नोंद आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यानंतर सातबारा उताऱ्यावर भुधरणा पद्धती समोर नेमकं काय नोंदवले ते पाहायचे. जर का तिथे भोगवटादार वर्ग 1 अशी नोंद असेल असेल तर त्याचा अर्थ तोच मालक जमिनीचा असतो.

तो शेतकरी त्या जमिनीचा मालक असतो. त्या जमिनीच्या खरेदी विक्रीवर शासनाचे निर्बंध न. पण जर का भोगवटादार वर्ग २ असे नमूद केले असेल तर शासनाच्या परवानगीशिवाय त्या जमिनीचे हस्तांतरण केल जात नाही. शेवटी आपल्याला ज्या गटातील शेत जमीन खरेदी करायची आहे त्या गटाचा नकाशा पाहणे गरजेचे असते. त्यामुळे काय होते तर आपल्याला जमिनीची हद्द कळते, चतुर सीमा कळते.

याचा अर्थ आपण जी जमीन खरेदी करणार आहोत त्या जमिनीच्या चारी बाजूला कोणते गट नंबर आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत हे सुद्धा स्पष्ट होतं. तर मित्रांनो शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये कसे फ्रॉड होतात व त्यापासून आपण कसे वाचले जाऊ शकतो याबद्दलची माहिती आपण पाहिली.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *