नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
कुळाच्या जमिनीचा मालकी हक्क मिळायला विक्री करता येणे सुद्धा शक्य झालेले आहे. काय आहे माहिती लेखांमध्ये. मित्रांनो मयत झालेल्या त्याच्या वारसाच्या नोंदी नसल्याने त्यांना त्या संबंधित यांच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी त्या जमिनीचा फक्त कब्जा संबंधितांचा असायचा.
मात्र ती जमीन विक्री करता येत नसे, आता मात्र तर अशा वारसाच्या नोंदी कब्जेदार हक्क अंतर्गत होणार असल्याने त्यांना कायदेशीर मालकी हक्क मिळणार आहे. तसेच महसूल नजराणा रक्कम शासनाकडे भरल्यानंतर त्या जमिनींची विक्री सुद्धा आता येणार आहे. येत्या आठवड्याभरात अशा प्रकारच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

राज्यात ई-फेरफार प्रणाली सुरु झाल्यानंतर इतर हक्कांमध्ये कुळ्याच्या वारसांच्या नोंदी नव्हत्या अशा प्रकारच्या नोंदी करण्यात त्यांची कोणतीही तरतूद ई-फेरफार प्रणालीमध्ये नव्हती. जमाबंदी आयुक्त यांनी राज्य सरकारला एक प्रस्ताव पाठवला असून त्या प्रस्तावात कब्जेदार सदरीच्या नोंदी वारसा नोंद घेण्यास करण्याबाबतची मुभा देण्यात यावी असे मत मांडलेले आहे.
कूळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील तरतुदी पाहिल्यानंतर त्यामध्ये यासाठी वारसा प्रकरणाची स्वतंत्र नोंद कशी करावी याचा उल्लेख करण्यात आल्याचे दिसून येत नाही किंवा तुम्ही बंधनकारक असल्याचे सुद्धा नमूद नाही. यामुळे त्याच्या वारसाच्या नोंदी आता थेट करता येणार आहे. मित्रांनो यामुळे आता लाभ कसा मिळणार हे पाहुयात.
कुळाच्या वारस नोंदीनंतर आता जमिनीबाबतचे सर्वच लाभ मिळू शकणार आहे. जसे की, जमीन आता कायदेशीर ताब्यात मिळेल. त्या नंतर त्या जमिनीवर बोजा चढविता येणार असून, कर्ज घेता येईल. त्याच्या जमिनीचा वारसा म्हणून नोंद झालेल्या ना ती जमीन विकायची असेल तर थेट विकता येणार मात्र नाही.

विक्री करण्याकरिता सर्वप्रथम 7/12 उताऱ्यावर नोंद झाल्यानंतर कायद्यामध्ये एक कलम 43 नुसार वारसाला मालक होता येईल. त्यानंतर जमिनीच्या आकाराच्या 40 पट महसूल नजराना करून त्या जमिनीची विक्री करता येईल.
एकंदरीत काय तर ज्या व्यक्तीच्या नावावर कुळाची जमीन होती, ती व्यक्ती वारल्यानंतर त्याच्या नावाने आता त्याच्या वारसांना त्या जमिनीबाबत कोणताही व्यवहार करता येत नव्हता. वारस नोंद थांबलेली होती, आता अशा प्रकरणात वारस नोंदणी होणार आहे..
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.