महेश मांजरेकर यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी. छोट्या पडद्यावर जाणवणार त्यांची उणीव.

Entertainment

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी 4’ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉसचे तीनही सीजन अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. पण आता चौथ्या सिजन कोण होस्ट करणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. त्यामुळे सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी चौथा सिझन लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

बिग बॉस या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येणार आहे. गेल्या वर्षी बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन संपला. बिग बॉस मराठीचे तीनही सीजन हिट झाल्यानंतर आता लवकरच बिग बॉस मराठीचा चौथा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणारे आहे. नुकताच बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बिग बॉसचे तीनही सीजन अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. पण आता चौथ्या सिजन कोण होस्ट करणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

आता तुम्ही विचार कराल की, कोण करणार म्हणजे आम्हाला नक्की काय म्हणायचंय?. प्रत्येक सिजन प्रमाणे महेश मांजरेकरच हा शो होस्ट करणार ना… तर तसं अजिबातचं नाहिये. गेले तीन सिजन महेश मांजरेकर यांनी होस्ट केल्यानंतर यंदाचं सिजन महेश मांजरेकर होस्ट करणार नसल्याची सध्या चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत याचा खुलासा खुद्द महेश मांजरेकरांनी स्वतः केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, “माझं बिग बॉससोबत 3 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तीन सिजन होस्ट केल्यानंतर आता माझं बिग बॉससोबतचं तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. पण मला बिग बॉसने पुन्हा बोलावलं तर मला पुन्हा एकदा बिग बॉस होस्ट करायला नक्की आवडेल.” असं महेश मांजरेकर म्हणालेत. महेश मांजरेकराचं हे स्टेटमेंट ऐकून बिग बॉस मराठीच्या फॅन्समध्ये निराशा पाहायला मिळतेय.

यासोबतच चौथा सिजन जर महेश मांजरेकर होस्ट करणार नाहित तर कोण अभिनेता ही सिजन होस्ट करेल याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलयं. तसेच बिग बॉस मराठीचा चौथा सीजन येणार म्हटल्यावलर चाहत्यांमध्ये मात्र उत्सुकतेच वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *