नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
आजकाल बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर, जिकडे-तिकडे मिलियन, बिलियन असे शब्द ऐकण्यास मिळत आहेत. जसे की टी-सिरिज च्या युटूब चॅनलचे सब्स्क्रायबर 100 मिलियन पेक्षा जास्त, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांची संपत्ती 100 बिलियन पेक्षा जास्त. हे शब्द ऐकायला तर खूप छान वाटतात पण यांचा अर्थ नेमका किती हे मात्र लवकर लक्षात येत नाही.
आजच्या या माहितीशिर लेखात आपण मिलियन म्हणजे नेमके किती? बिलियन म्हणजे नेमके किती? आणि ट्रिलियन म्हणजे नेमके किती? हे सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
आपल्या देशात संख्या दर्शविण्यासाठी हजार, लाख, कोटी आणि अब्ज हे शब्द वापरले जातात. शाळेमध्ये देखील गणिताच्या तासात आपण हेच शब्द शिकलो आहेत. अशा परिस्थितीत मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन मधील आकडे पाहून आपण काही वेळा गोंधळून जातो.
या गोंधळाचे कारण म्हणजे देश आणि परदेशातील युनिट वेगळे आहेत. मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन ( ज्यांना अनुक्रमे M, B आणि T असेही ओळखले जाते ) ही आंतरराष्ट्रीय एकके आहेत. हे शब्द प्रामुख्याने इंग्रजी भाषेत वापरली जातात. जर तुम्हीही या गोष्टींबद्दल गोंधळलेले असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
मिलियन म्हणजे किती? : सोशल मीडियावर, जसे की Facebook, Instagram, YouTube यावर पेज लाईक्स, फॉलोवर्स, सब्स्क्रायब्रर यांची संख्या 1M, 2M अश्या स्वरुपात आपण पाहिली असेलच. हे M म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून मिलियन ( Million ) असते. 1 Million म्हणजे 10 लाख. त्यामुळे आता तुम्हाला एखाद्या फेसबुक पेजवर 5 Million लाईक्स असा आकडा दिसला तर समजून जा की 50 लाख लोकांनी ते पेज लाईक केले आहे.
Million या शब्दाचा वापर पैशांच्या व्यवहारात देखील होतो. अश्या वेळी मात्र आपली गल्लत होऊ शकते. जर 1 मिलियन डॉलर्सचे रूपांतर भारतीय रुपयांमद्धे करायचे असेल, तर मात्र डॉलर आणि रुपया यामधील असलेला फरक लक्षात घ्यावा लागेल. जसे की, आज घडीला 1 dollar = 82.67 rupees आहे. त्यामुळे 1 Million डॉलर्स म्हणजे आज घडीला जवळपास 8 कोटी रुपये होतात.
बिलियन म्हणजे किती? : काही दिवसांपूर्वी तुम्ही बातम्यांमध्ये पाहिले असेल की भारतीय बिझनेसमॅन गौतम आदाणी यांची संपत्ती 150 बिलियनच्या पुढे. अनेकवेळा एखाद्या श्रीमंत व्यक्तिला संबोधताना देखील बिलियन या शब्दाचा वापर केला जातो. जसे की, बिलिनियर इलोन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले. बिलियन ही मिलियन नंतरची सर्वात मोठी संख्या.
आता जाणून घेऊ की 1 बिलियन म्हणजे नक्की किती? तर, 1 बिलियन आपल्याला समजेल अश्या भाषेत सांगायचे झाले तर 100 करोड. काही लोकांचा असा गैरसमज होतो की 1 Million म्हणजे जसे 10 लाख, तसे 1 billion म्हणजे 10 करोड असावे, परंतु तसे नाही.
ट्रिलियन म्हणजे किती? : ट्रिलियन ही सर्वात मोठी संख्या आहे. ही संख्या सोशल मीडियावरील फॉलोवर्स किंवा एखाद्या व्यक्तीच्या श्रीमंतीपेक्षा कित्येक पटीने मोठे आहे. एखाद्या श्रीमंत देशाची श्रीमंती मोजण्यासाठी trillion चा वापर केला जातो. भारताचा GDP हा 3.46 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे.
आता समजून घेऊ की 1 ट्रिलियन म्हणजे नक्की किती? तर, 1 ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी. एक ट्रिलियन मध्ये बारा शून्य असतात, एवढी ही मोठी संख्या असते. आपण शाळेत शिकलेले एकक, दशक, शतक यामध्ये सांगायचे झाले तर 1 ट्रिलियन म्हणजे 1 पद्म.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.