महाराष्ट्रातील सर्वाधिक गाव असणारे 10 जिल्हे कोणते? जाणून घ्या!!

Infomative

आपले महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आणि तालुक्यांचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 44 हजार गावे आणि 378 शहरी केंद्रे आहेत. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे तर आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक गाव असणारे 10 जिल्हे कोणते? ते पाहणार आहोत.

1. यवतमाळ : महाराष्ट्रातील सर्वाधिक गावे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा पहिला क्रमांक येतो. यवतमाळ जिल्ह्याचा एकूण क्षेत्रफळ हे 13,584 चौरस किलोमीटर इतके आहे. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आणि 2155 गावे आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 189 नावे आहेत.

2. अमरावती : महाराष्ट्रातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्ह्याचा दुसरा क्रमांक येतो. अमरावती जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 12,235 चौरस किलोमीटर इतके आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आणि 2009 गावे आहेत. अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा सर्वाधिक म्हणजेच 194 गावे आहे.

3. रायगड : महाराष्ट्रातील सर्वाधिक गावे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रायगड या जिल्ह्यात तिसरा क्रमांक येतो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 7148 चौरस किलोमीटर इतके आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आणि 1951 गावे आहेत. जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यामध्ये सर्वाधिक 216 गावे आहेत.

4. नाशिक : महाराष्ट्रातील सर्वाधिक गावे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. नाशिक या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 15,350 चौरस किलोमीटर इतके आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आणि 1149 गावे आहेत. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यामध्ये सर्वाधिक 191 गावे आहेत.

5. पुणे: महाराष्ट्रातील सर्वाधिक गावे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुणे या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो. पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 15, 643 चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आणि 1,912 गावे आहेत. पुणे जिल्ह्याच्या बोर तालुक्यामध्ये सर्वाधिक 196 गावे आहेत.

6. नागपूर : महाराष्ट्रातील सर्वाधिक गावे असणाऱ्या जिल्ह्यामध्ये नागपूर या जिल्ह्याचा सहावा क्रमांक लागतो. नागपूर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 9,797 चौरस किलोमीटर आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आणि 1900 गावे आहेत. नागपूर जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यांमध्ये सर्वाधिक 193 गावे आहेत.

7. चंद्रपूर : महाराष्ट्रातील सर्वाधिक गावे असणारे जिल्ह्यामध्ये चंद्रपूर या जिल्ह्याचा 7वा क्रमांक लागतो. चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे दहा10,490 किलोमीटर इतकं आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आणि 1815 गावे आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यांमध्ये सर्वाधिक 219 नावे आहेत.

8. सातारा : महाराष्ट्रातील सर्वाधिक गावे असणाऱ्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याचा आठवा क्रमांक लागतो. सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 10,480 चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आणि 1767 गावे आहेत. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यामध्ये सर्वाधिक 344 गावी आहे.

9. गडचिरोली : महाराष्ट्रातील सर्वाधिक गावे असणाऱ्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्याचा नववा क्रमांक लागतो. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 14,412 चौरस किलोमीटर इतके आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके आणि 1681 गावे आहेत.

10. नांदेड : महाराष्ट्रातील गावे असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचा दहावा क्रमांक लागतो. 10,422 चौरस किलोमीटर इतकी क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आणि 1620 गावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *