सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चेत असलेलं नाव म्हणजे संभाजी राज छत्रपती. राज्यसभेची निवडणूक उमेदवार संघटनेची घोषणा आणि सगळ्याच मुद्यावरून वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळतात. मग यामध्ये संभाजीराजे असो किंवा छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे वंशज अनेक वेळा बातम्यांच्या केंद्रस्थानी असतात.
उदयनराजे सातारा गादीचे वंशज आणि संभाजी राजे कोल्हापूर गादीचे वंशज. यामध्ये उदयनराजे आपले नावापुढे श्रीमंत छत्रपती लावतात तर संभाजीराजे छत्रपती युवराज असं नाव लावतात. दुसरी गोष्ट म्हणजे उदयनराजे भोसले यातील भोसले हे नाव आपल्याला ऐकायला मिळत. संभाजीराजे भोसले असं नाव कधीच ऐकायला मिळत नाही.
छत्रपती आणि भोसले या दोन आडनावाची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत.मात्र त्या आधी सातारा आणि कोल्हापूर गादीचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणीनी पन्हाळगडावर आपल्या मुलाला गादीवर बसवलं आणि राज्यकारभार पाहू लागले. त्यावेळी राणी येसूबाई आणि शिवपुत्र शाहू औरंगजेबाच्या कैदेत होते.
औरंगजेबाचा मृत्यूनंतर त्यांची सुटका झाली आणि थोरले शाहू स्वराज्यात परतले. त्यावेळी ताराराणी सत्ता जाऊन कोल्हापूर आणि सातारा या दोन गाड्या तयार झाल्या. त्यामध्ये सातारा गादीवर असलेलं छत्रपती उदयनराजे हे शिवरायांचे 12 वे वंशज आहेत. छत्रपती प्रतापसिंह राजे यांचे चिरंजीव. तर शिवेंद्रसिंहराजे हे प्रतापसिंह राजे याचे बंधू अभयसिंहराजे भोसले यांचे चिरंजीव.
दुसऱ्या बाजूला कोल्हापूर शाहू छत्रपती आणि त्यांचे थोरले चिरंजीव म्हणजे युवराज संभाजी छत्रपती आणि धाकटे चिरंजीव म्हणजे युवराज मालोजीराजे छत्रपती. दोन्ही छत्रपतीच्या गाद्या. असे सांगण्यात येत की, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा त्यांचं नावही बदललं.
कारण ते आता चक्रवर्ती सम्राट झाले होते. राज्याभिषेकानंतरच्या कागदपत्रांमध्ये शिवरायांचा उल्लेख राजा शिवछत्रपती राजा असा केला जाऊ लागला. राजा ही पदवी झाली शिवराय हे नाव झालं आणि छत्रपती हे आडनाव झाले. पुढे ही परंपरा कायम राहिली.
राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक घटनेनंतर छत्रपती घराण्यातील व्यक्तींचा उल्लेख करताना भोसले आडनावाचा उल्लेख कुठेही केला गेला नाही. अनेक इतिहासकारांच्या मते, छत्रपती कुळातील सर्वोच्च वंश म्हणजे छत्रपती. सर्वसामान्य लोकांमध्ये भोसले आडनावाचे अनेकजण असू शकतात. पण छत्रपती हे सर्वश्रेष्ठ राज्याभिषेकानंतर मिळणारी पदवी आहे.
त्यामुळे राज्याभिषेकनंतर शिवरायांनी कागदपत्रात भोसले या नावाचा वापर केलेला नाही. मग कोल्हापुर किंवा सातारा गादी असेल दोन्ही गाद्यानी कधीच भोसले आडनाव लावलं नव्हतं. छत्रपती आडनावाबाबत इतिहासात आणखी एक रंजक माहिती मिळते.
राजर्षी शाहू महाराज यांचे चिरंजीव युवराज राजाराम महाराज यांचा विवाह झाला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या नातीबरोबर. विवाहनिमित्त स्वतः शाहू महाराज आणि इतर नागरिक बडोद्याला गेले होते. इथं त्याना समारंभानिमित्त छापण्यात आलेल्या विशेष निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या.
या पत्रिकेत राजाराम महाराजांचा उल्लेख राजाराम भोसले असा करण्यात आला होता. हे पाहून कोल्हापुरात आलेल्या व्हरड चांगलेच खवळले. त्यांनी थेट शाहू महाराज यांच्याकडे तक्रार दिली. भोसले हे आडनाव घराण्यात कधीच वापरण्यात आलेल नाही. छत्रपती शाहू महाराज यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना समजलं की, महाराजांनी भोसले आडनावाचा त्याग करून बराच काळ झालेला आहे. त्यांना भोसले म्हणणे चुकीच आहे. त्यांचे छत्रपती आडनाव आहे, असं त्यांना संबोधण्यात यावे.
तर छत्रपती सातारा गादीचे वंशज वापरतअसताना सातारा गादीचे वंशज का वापरत नाहीत, असा प्रश्न पडतो.
1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांच राज्य ताब्यात घेतल्यानंतर प्रतापसिंह छत्रपती यांना साताऱ्याच्या गादीवर बसवले. त्याचा उल्लेख छत्रिय कुलावतंस राजा श्री प्रतापसिंह छत्रपति असा येतो. 1839 मध्ये प्रतापसिंह छत्रपतिच्या जागी शहाजीराजे छत्रपती या बंधूना गादीवर बसले. या छत्रपतींच्या मृत्यूनंतर मात्र इंग्रजांनी दत्तक विधान नामंजूर केलं.
तसेच 1849 सातारा संस्थान खालसा करण्यात आलं. त्यानंतर इंग्रजांनी दत्तक विधान नामंजूर केल्यानंतर सातारा गादी खालसा केली आणि कागदपत्रांमध्ये इंग्रजानी या गादीवर जे कोणी छत्रपती बसतील त्याचा उल्लेख भोसले असा करायला सुरुवात केली. मग ते प्रतापसिंह राजे किंवा उदयनराजे भोसले असतील. यामुळे सातारा गादीला आडनाव लावण्याची प्रथा सुरु झाले.
1849 संस्थान खालसा होण्याच्या आधी सातारा गादीवर छत्रपती हेच आडनाव वापरला जात होत. मात्र, दुसऱ्या बाजूला कोल्हापूर संस्थान कधीच खालसा झालं नाही त्यामुळे आजतागत छत्रपती कागदपत्रांमध्ये करण्यात आलेला नाही. शाहू महाराजांचा उल्लेख शाहू छत्रपती, राजाराम महाराजांचा राजाराम छत्रपती आणि राजे राजाराम छत्रपती असाच आढळून येतो.
तसेच उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रराजे आपल्या नावाच्या आधी छत्रपती उपाधी लावतात तर त्याचं कारण सांगितलं जातं ते छत्रपती मराठ्यांच्या पराक्रमातील सर्वोच्च पराक्रमाचा प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळाचे वारसदार असल्याचे ती निशाणी आहे. छत्रपती घराणे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची निशाणी अजूनही मोठ्या अभिमानाने आपल्या नावाची लावतात.
युवराज संभाजीराजे छत्रपती एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते माझं नाव आजही पाहिलं तर संभाजी शाहू छत्रपती असंच आहे. भोसले हे कुळ नाव असलं तरीही शिवराय छत्रपती झाले तेव्हापासून पिढ्यानपिढ्या सगळ्यांना छत्रपती वापरले गेले. रेकॉर्डमध्ये छत्रपती हाच उल्लेख आढळतो.