जाणून घ्या !! Pm कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी पध्दत..

Agriculture Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

शेतकऱ्यांना शेतीला दिवसा पाणी देता यावा यासाठी केंद्र सरकारने पीएम कुसुम सोलार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देतो. आताही हे सौर पंप 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी कार्यक्षमतेचे असतात. या योजनेअंतर्गत पात्र ठरला तर ओपन कॅटेगरीमध्ये 90 टक्के अनुदान दिले जातात आणि तसेच अर्जदार Sc किंवा NT मधील असल्यास तर 95 टक्के अनुदान दिलं जातं.

यामध्ये जर 3 hp चा पंप हवा असेल तर त्याची किंमत 1 लाख 93,803 रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदाराला यासाठी 19,380 रुपये भरावे लागतात. तर एससी, एसटी कॅटेगरी अर्जदाराला 9 हजार 690 रुपये भाव राहतात. 5 hp चा पंप हवा असेल तर त्यांची किंमत 2 लाख 69,746 ओपन कॅटेगरी अर्जदाराला 26,975 आणि एसटी कॅटेगरी अर्जदाराला 13,487 भरावे लागतात.

7.5 एचपी पंप आहे त्याची किंमत 3 लाख 74,402 आहे. जर अर्जदार हा सर्वसाधारण मधील असल्यास आणि पात्र असेल तर त्याला यासाठी 37, 440 रुपये लागतात. एससी, एसटी कॅटेगरी अर्जदाराला 18,700 भरावे लागतात. तसेच जर शेतकऱ्याकडे अडीच एकरपर्यंत जमीन असल्यास त्याला 3 hp चा पंप दिला जातो.

अडीच ते पाच एकर जमीन असेल तर 5 hp पंप आणि पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना 7.5 hp चा पंप दिला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे वीज कनेक्शन उपलब्ध नाहीत असे शेतकरी यासाठी अर्ज दाखल करू शकतात. तसेच त्यांच्याकडून शेततळी, विहिरी, बोअरवेल नदी किंवा नाळे त्याच्या शेजारी शास्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्ज करू शकतात.

याशिवाय अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत लाभ न मिळालेल्या शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये सगळ्यात महत्वाचा कागद म्हणजे सातबारा उतारा लागतो. कर तुमच्या सातबारा उतारा एकापेक्षा अधिक यांचे नाव असेल तर अशा वेळी 200 रूपयाचा बॉंड पेपरवर इतर लोकांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे.

त्या व्यतिरिक्त आधार कार्ड, जातीचा दाखला आणि पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागणार आहे. या योजना अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahaurja.com या वेबसाईटवर गेल्यावर त्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणची वेबसाइट ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे कृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी ऊर्जा अर्ज नोंदणी हा पर्याय दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना दिसेल ती सविस्तर वाचायची आहे आणि मग बंद करायचे आहे. उजवीकडे सेलेक्ट लांग्वेज क्लिक करून तुम्ही तिचा मराठी भाषा निवडू शकता.

त्यानंतर पी एम किसान योजना लाभार्थी नोंदणी अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. याठिकाणी सुरुवातीला सध्या तुम्ही डिझेल पंप वापरत आहात का या प्रश्नाचे उत्तर द्यायचा आहे होय असेल तर म्हणायचा आहे आणि नाही असेल तर नाही उत्तर निवडायचे आहे.

त्यानंतर अर्जदार वैयक्तिक व जमीन विषयक माहिती भरायची आहे. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. पुढे जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे. मोबाईल क्रमांक आणि जात वर्गवारी निवडायचे आहे. पुढे मग तुम्हाला पंपाचा तपशील, तुमच्या जिल्ह्यात तुम्ही निवडलेल्या प्रवर्गासाठी किती कोटा उपलब्ध आहे ते दाखवले जाईल.

याचा तुम्हाला लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया या पर्यायावर क्लिक करायचा आहे. पुढे तुम्हाला एक ट्रांजेक्शन आयडी आणि नोंदणी फी शंभर रुपये सांगितले जाईल. पुढे आल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्याचे वेगवेगळे पर्याय दिसतील. हीच सुरुवातीला तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर माहिती टाकायचे आहे आणि मग करायचा आहे पेमेंट झाल्याचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

या नंतर तुमच्या मोबाईलवर युजरनेम आणि पासवर्ड पाठवला जाईल आणि तुमची नोंदणी पूर्ण होईल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ही या योजनेस प्राथमिक नोंदणी आहे त्यानंतर कोटा उपलब्ध झाल्यावर अर्जदाराला तसं मेसेज द्वारे कळविण्यात येईल. त्यानंतर अर्जदाराची संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणं, लाभार्थी स्वीकारणार कंपनी निवड आणि सौर पंप वाटप करणे प्रक्रिया पूर्ण होईल. या योजनेअंतर्गत सध्या राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये सौर पंपासाठीचा कोटा उपलब्ध असल्याचं महाऊर्जाच्या वेबसाईटवर दिसून येत.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *