नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
कोणत्याही जमिनीचा विशेषतः मोकळ्या जमिनीचा पुरेपूर वापर किंवा फायदा मिळायचा असेल तर त्याच्या करता त्या जमिनीची मालकी आणि ताबा या दोन्ही गोष्टी निर्विवाद असणे हे अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे बहुतांश जमिनी संदर्भात, विशेषतः शेत जमिनी किंवा ज्या मोकळ्या जमिनी आहेत त्यांच्या संदर्भात मालकीचे, हद्दीचे आणि ताब्याचे विविध प्रकारचे वाद आहेत.
हे वाद निराकरण करण्याचे दोन प्रकार असू शकतात.
१. एक तर समजवताने करार करून त्याची नोंदणी करणे किंवा २. दुसरा म्हणजे त्या संदर्भात कार्यालय न्यायालयीन कार्यवाही करणे.
आता न्यायालयीन कार्यवाही करायची म्हटली तर त्याच्याकरता चिक्कार वेळ, पैसा आणि श्रम खर्ची पडतात. त्याचप्रमाणे जर आपसात समझोत्याने करार करायचा म्हटलं तर त्याच्या करता सुद्धा त्या जमिनीच्या मूल्यांकना नुसार भरमसाठ मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी भरायला लागते. आणि हे करणं शक्य नसेल तर ते वाद तसेच प्रलंबित राहतात. तसेच पुढे पुढे येत राहतात.
हे लक्षात घेऊन आणि याच्यावर तोडगा काढण्याकरता म्हणून राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने दिनांक “13 डिसेंबर 2022″ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ” सलोखा योजना ” जाहीर केली आहे. या योजनेनुसार ज्या जमिनी संदर्भात एकाचा ताबा दुसऱ्याची मालकीय अशा स्वरूपाचे वाद असतील आणि त्या व्यक्तींना आपल्यातले वाद समझोत्याने मिटवायचे असतील,
नोंदणीकृत करार करायचे असतील तर असे करार नाममात्र मुद्रांक आणि नोंदणी फी आकारून नोंदणी करता येणार आहे. ज्या जमिनीत संदर्भात असे वाद आहेत त्यांच्याकरता ही योजना निश्चितपणे फायद्याचे ठरेल. या योजनेचा विस्तृत तपशील अजून प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. जेव्हा याचा विस्तृत तपशील प्रसिद्ध होईल तेव्हा त्याची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.