शेअर बाजाराचे जादूगार वॉरन बफेट

Infomative Investments

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

जगातले सर्वात मोठे आणि सर्वात यशस्वी इन्वेस्टर म्हणून संपूर्ण जगात ज्या व्यक्तीकडे आदराने पाहिलं जातं, शेअर बाजाराच्या पुढच्या वाटचालीबद्दल किंवा गुंतवणुकीबद्दल ज्या व्यक्तीच्या एका छोट्याशा विधानाची दखल जगभरात घेतली जाते ती व्यक्ती म्हणजे शेअर बाजाराचे जादूगार वॉरंट बफेट. 35 वर्षांचा होई पर्यंत मी एक तर लक्षाधिश येईल नाहीतर एखाद्या उंच बिल्डिंग वरून खाली उडी मारेल, असं असं अगदी लहानपणीच म्हणणाऱ्या वॉरन बफेट यांना स्वतःच्या क्षमतेबद्दल किती आत्मविश्वास होता हे दिसून येते.

शून्यापासून सुरुवात करत वयाच्या 32 व्या वर्षी त्यांनी एक मिलियन डॉलर्स कमावून तर दाखवलेच शिवाय आज जवळपास 96 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या प्रचंड संपत्तीचे ते मालक आहेत. फोर्ब्स च्या अब्जाधिशांच्या देशांच्या यादीत सलग तेरा वर्ष पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या बिल गेट्स यांना 2008 साली पहिल्यांदा मागे टाकत वॉरन बफेट जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले होते.

आजही ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. वॉरन बफेट यांनी हे साध्य तरी कसं केलं असेल? 2020 साली वयाची 90 वर्षे पूर्ण केलेल्या वॉरन बफेट यांच्या याच यशस्वी प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांनाच खूप काही शिकता येईल यात शंका नाही.

द ग्रेट डिप्रेशन या नावाने इतिहासात नोंदवली गेलेली सर्वात भयानक जागतिक मंदी 1929 साली अमेरिकेत सुरू झाली आणि आणि पुढे जगभर पसरली. ऑक्टोबर 1929 मध्ये अमेरिकन शेअर बाजार जोरदार कोसळला. ही विसाव्या शतकातली सर्वात मोठी मंदी होती. नेमक त्या मंदीतच 30 ऑगस्ट 1930 रोजी अमेरिकेतल्या ओमाहा शहरात वॉरन बफेट यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हॉवर्ड बफेट हे ही एक स्टॉक ब्रोकर आणि इन्वेस्टर होते.

पण ते पुढे एक पॉलिटिशियन झाले. त्यांच्या आई लीला एक गृहिणी होत्या. 1930 साली या ग्रेट डिप्रेशन मुळे वॉरन बफेट लहान असतानाच कुटुंबाची आर्थिक घडी पूर्णतः विस्कळीत झाली. होती नव्हती ती सगळी सेविंग पण संपली. घरात खायला ही पुरेस अन्न असेना. केवळ पैसे नाहीत म्हणून कुटुंबाचे असे हाल होत आहेत हे वॉरन बफेट त्यांना सहन होत नव्हतं.

वॉरन बफेट यांचे शिक्षण सुरू झालं रोज हील एलिमेंटरी स्कूल मधून. वडिलांनी पॉलिटिक्स जॉईन केल्यामुळे कुटुंबाला वॉशिंग्टन डीसी शहरात शिफ्ट व्हावे लागले. पुढचं शिक्षण त्यांनी वोड्रो विलसन हायस्कूल मधून 1947 साली पूर्ण केले. वयाच्या सातव्या वर्षीच त्यांनी बिझनेस करायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी स्वतःची अशी एक छोटीशी लायब्ररी बनवली होती.

त्यात स्टॉक ब्रोकिंग, शेअर मार्केट शी संबंधित चांगल्या चांगल्या पुस्तकांचा भरणा होता. वॉरन बफेट यांनी वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ती सगळी पुस्तक वाचून काढली. त्यामुळे लहानपणी त्यांना शेअर मार्केट कसं काम करतं हे माहीत झालं. गुंतवणूक करणे त्यांना आवडायला लागलं. या सगळ्या गोष्टीत त्यांच्या वडिलांचे त्यांना फार मोलाचा मार्गदर्शन लाभले.

सात वर्षांचे असताना त्यांनी एक पुस्तक वाचलं ज्याचं नाव होतं 1000 वेज टू मेक 1000 डॉलर्स. निरनिराळी छोटे-मोठे बिजनेस करून पैसे कसे कमवायचे याचे हजार मार्ग त्यात दिले होते. त्याच पुस्तकांन वॉरन बफेट यांचं आयुष्य बदलून टाकलं. ते पुस्तक वाचून त्यांना पैसे कमवण्याची आवड निर्माण झाली. पैसे कमवायचे ते सेव करायचे ते पुन्हा कशात तरी रीइन्व्हेस्ट करून आणखी पैसे कमवायचे हा जणू छंदच त्यांना लागला.

वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी घरोघरी जाऊन चिंगम विकले, कोकाकोला च्या बाटल्या, न्यूज पेपर्स विकले. त्यांनी त्यांच्या आजोबांच्या किराणा दुकानातही काम केलं. हायस्कूलमध्ये शिकत असतानाही त्यांनीही अशी न्युज पेपर वगैरे विकायची काम चालूच ठेवली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी त्यांचा पहिला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला.

वडील चांगले स्टॉक ब्रोकर असल्यामुळे वॉरन बफेट यांनाही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यात खूप इंटरेस्ट देऊ लागला होता. ते दहा वर्षांचे असताना त्यांना न्यू यॉर्क शहरात जाऊन न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज ला भेट देण्याचा योग आला. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षीच त्यांनी सिटीज सर्विस या कंपनीचे तीन शेअर्स खरेदी केले.

38 डॉलर्सला घेतलेला तो स्टॉक थोड्याच दिवसात 27 डॉलर्सपर्यंत खाली घसरला. ते घाबरले आणि स्टॉप प्राइस वर यायची वाट पाहू लागले. काही दिवसांनी तो स्टॉक पुन्हा ४० डॉलर्स होताच वॉरन बफेट यांनी तिन्ही शेअर्स घाईघाईने विकून टाकले. त्यांनी थोडसं प्रॉफिट कमावलं पण काही दिवसांनी तोच स्टॉक 200 डॉलर्स वर गेला.

वॉरन बफेट यांना आयुष्यातला पहिला धडा मिळाला तो म्हणजे शेअर बाजारात यश मिळवायचे असेल तर एक गुण आपल्यात हवाच हवा आणि तो म्हणजे संयम. 1945 साली म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांने दोघांनी मिळून एक सेकंड हॅन्ड पिन बॉल मशीन 25 डॉलर्सला खरेदी केली आणि ती एका न्हाव्याच्या दुकानात लावली.

दुकानात वेटिंग वर असलेली गिऱ्हाईक न्हाव्या कडे आपला नंबर येईपर्यंत त्या मशीनवर गेम खेळून टाइमपास करू लागली. या दोघांनी प्रत्येक गेम चे काही पैसे फिक्स केले होते आणि त्यातला काही हिस्सा त्या न्हाव्याला ही द्यायचे ठरलं होतं. त्यांची ही पिन बॉल मशीनची ट्रिक इतकी यशस्वी झाली की त्यांनी अशा आणखी बऱ्याच मशीन्स विकत घेतल्या आणि ओमाहा शहरातल्या आणखी काही न्हाव्याच्या दुकानात लावल्या आणि चांगलाच पैसा कमावला.

त्यानंतर त्यांनी त्यांचा हा बिजनेस बाराशे डॉलर्सला विकून टाकला. त्याचबरोबर रोज वॉशिंग्टन पोस्ट हा अमेरिकेतला आघाडीचा न्यूज पेपर विकून ते महिन्यासाठी 150 डॉलर्स कमवायला लागले होते. असं करत करत त्यांनी कॉलेज पूर्ण होईपर्यंत 9800 अमेरिकन डॉलर जमवले ज्याची किंमत आजच्या घडीला एक लाख पाच हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 77 लाख रुपये. इतके पैसे हातात खेळत असल्यामुळे हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढल्या उच्च शिक्षणासाठी कॉलेजला ऍडमिशन घेण्याची गरज वाटली नाही. त्यांनी कॉलेजला ऍडमिशन घ्यायला नकार दिला आणि बिजनेस करण्याचा निर्णय घेतला पण वडिलांनी त्यांना तिथेच रोखले आणि त्यांच्यावर दबाव टाकून कॉलेजात ऍडमिशन घेऊन पुढचे शिक्षण पूर्ण करायला सांगितले.

वयाच्या 19 वे वर्षी युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रासका मधून त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन केलं. पुढे मास्टर्स डिग्री साठी त्यांनी हार्वर्ड बिजनेस स्कूल मध्ये अप्लाय केलं. त्यांचा तिथे इंटरव्यू झाला आणि त्यात त्यांना फेल करत त्यांचे ऍडमिशन नाकारण्यात आले. वॉरन बफेट म्हणतात की त्यावेळी मला त्या गोष्टीचा दुःख झालं पण आता मला असं निश्चितपणे वाटतं की तीच माझ्या आयुष्यातली सर्वात चांगली घटना होती.

याचं कारण काही वर्षांपूर्वी त्यांनी एक पुस्तक वाचलं होतं ज्याचं नाव होतं द इंटेलिजंट इन्वेस्टर. या पुस्तकाने वॉरन बफेट यांना सर्वात जास्त प्रभावित केल होत. त्याचे लेखक बेंजामिन ग्रहम हे कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये शिकवत असल्याचं त्यांना कळलं आणि केवळ त्याच कारणाने त्यांनी तिथे ऍडमिशन घेतलं.

1951 साली कोलंबिया बिजनेस स्कूल ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून वॉरन बफेट यांनी मास्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स केले. वॉरन बफेट म्हणतात ते माझ्या आयुष्यातले सर्वात बेस्ट दिवस होते. कारण बेंजामिन ग्राहम यांच्याकडून व्हॅल्यू इन्वेस्टिंग बद्दल मी खूप काही शिकलो जे मला कुठेच शिकायला मिळालं नसतं. गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना त्याचाच फायदा मला पुढे झाला.

1952 साली वयाच्या 22 व्या वर्षी वॉरन बफेट यांनी सुजन थॉमसन यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आणि दोन मुलं झाली. 1954 ते 1956 हे दोन वर्षे त्यांनी बेंजामिन ग्राहम यांच्या सोबत 12 हजार डॉलर्स वार्षिक पगारावर काम केले. या अनुभवाचा त्यांना पुढे प्रचंड फायदा झाला. 1956 साली बेंजामिन रिटायर झाले आणि त्यांनी त्यांची कंपनी ही बंद केली.

त्याच वर्षी वॉरन बफेट यांनी वयाच्या 26 व्या वर्षी सात जणांची एक पार्टनरशिप कंपनी काढली, नाव होतं बफेट पार्टनरशिप लिमिटेड. 1962 साली या पार्टनरशिपने 7 मिलियन अमेरिकन डॉलर्स कमावले होते ज्यात वॉरन बफेट यांचे 1 मिलियन डॉलर्स होते. म्हणजेच ठरवल्याप्रमाणे वयाच्या 35 व्या नाही तर 32 व्या वर्षीच वॉरन बफेट एक मिलियनाईर म्हणजे लक्षाधिश झाले होते.

1957 साली वॉरन बफेट यांनी ओमहा शहरात पाच बेडरूमच घर 31500 डॉलर्स ला विकत घेतल. आजही ते त्याच घरात राहतात. त्यांच साधेपन यातूनच दिसत. बफेट पार्टनरशिप मधून येणारे पैसे त्यांनी बर्कशायर हाथवे या टेक्स्टाईल कंपनीत इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आणि 1965 मध्ये त्यांनी कंपनीचे पूर्ण नियंत्रणच आपल्या हातात घेतल.

बर्कशायर हाथवे या टेक्स्टाईल कंपनीच त्यांनी मार्केटमध्ये मोठ-मोठे इन्वेस्टमेंट करणाऱ्या एका होल्डिंग कंपनी पूर्णतः रूपांतर केल. त्यावेळी त्यांचे वय होतं 35 वर्ष. अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी इन्वेस्टमेंट करून मोठ्या प्रमाणात नफा कमवला. सत्तरच्या दशकात त्यांनी वॉशिंग्टन पोस्ट कंपनी आणि अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी या मेडिया इंडस्ट्रीतल्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या इन्व्हेस्टमेंट केल्या. त्यांनी स्वतःही विचार केला नव्हता इतका जास्त नफा त्यांना या दोन कंपन्यातून झाला.

1988 साली त्यांनी द कोकाकोला कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. ती करता करता कोकाकोला कंपनीमध्ये त्यांची हिस्सेदारी 60 टक्के झाली. त्याची किंमत होती तब्बल 1.02 बिलियन डॉलर्स. ही त्यांनी केलेली एक अत्यंत किफायतशीर गुंतवणूक ठरली आणि आजही द कोकाकोला कंपनीचे शेअर्स वॉरन बफेट यांनी होल्ड करून ठेवलेत.

आज जवळपास 96 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या प्रचंड संपत्तीचे मालक असलेल्या वॉरन बफेट यांनी आपले 90% पेक्षाही जास्त संपत्ती वयाच्या पन्नाशी नंतर कमावले आहे. त्यांची एकूण संपत्ती कैक देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहे. जगात अशी कोणतीही वस्तू नाही जीवन बफेट विकत घेऊ शकत नाहीत.

असं असलं तरी आजही ते त्याच घरात राहतात जे त्यांनी 1957 साली विकत घेतलं होतं. त्यांनी त्यांच ऑफिसही आजपर्यंत बदललं नाही. टेबल खुर्च्या सगळं होतं तसंच आहे. त्यांच्याकडे कोणतीही महागडी कार नाही आहे ती कार ते स्वतः चालवतात. त्यांचं खाण पिन राहणीमान अगदीच साधं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही आज त्या वस्तू विकत घेत असाल ज्यांची तुम्हाला गरज नाही तर भविष्यात तुम्हाला त्या वस्तू विकाव्या लागतील ज्यांची तुम्हाला खरोखरच गरज असेल.

2007 साली टाईम मॅक्झिन च्या हंड्रेड मोस्ट इन्फ्लुएशन पीपल इन द वर्ल्ड मध्ये वॉरंट बफेट यांचं नाव होतं. अमेरिकेचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार असलेला प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम या पुरस्काराने 2011 साली अमेरिकेचे तात्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले गेले. वॉरन बफेट जगातल्या सर्वात दानशूर व्यक्तींपैकी एक आहेत.

बिल अँड मलेंडा गेट्स फाउंडेशन बरोबरच आणखी काही समाजसेवी संस्थांना त्यांनी 3.6 बिलियन डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती दान तर केलीच शिवाय मृत्यूनंतर आपली 99% संपत्ती लोककल्याणासाठी दान करण्यात यावी हेही त्यांनी जाहीर केले. आपल्या मुलांच्या नावावर त्यांना व्यवस्थित पुरेल इतकीच संपत्ती ठेवायचे त्यांनी ठरवले कारण इतका पैसा असताना मेहनत करायची गरज काय असा अविचार त्यांच्या डोक्यात येऊ नये म्हणून.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *