बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. आणीबाणीच्या काळावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तीच फर्स्ट लुक समोर आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयश तळपदेसुद्धा आहे. आणि आता श्रेयसचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रचंड उत्सुकतेत आहेत. प्रेक्षकांना चित्रपटाच्या कलाकारांना या दिग्गज राजकारण्यांच्या भूमिकेत पाहण्याची मोठी प्रतीक्षा होती. हळूहळू ही प्रतीक्षा संपत आहे. कंगना रणौत, अनुपम खैरनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदेचा फर्स्ट लुक समोर आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिचा बहुप्रतीक्षीत सिनेमा इमर्जन्सीचा लूक पोस्टर सध्या धुमाकूळ घालतोय. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील कंगना रनौतचा दमदार लूक सर्वांनाच भावला. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या लूकचीही जोरदार चर्चा झाली. आता चित्रपटातील आणखी एका भूमिकेवरील पडदा हटवण्यात आला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता तेही समोर आले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे दिसणार आहे. बुधवारी श्रेयसचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस आपला फर्स्ट लुक शेअर करत अटलजींच्या सुंदर ओळी लिहल्या आहेत. तसेच अभिनेत्याने लिहलंय, ”अभिमानास्पद आणि आनंदी वाटत आहे की मला इतक्या मोठ्या, दूरदृष्टी असणाऱ्या, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींची भूमिका जगण्याची संधी मिळाली. आणि खासकरुन कंगना रणौतचे आभार की तिला माझ्यामध्ये हे मोठं व्यक्तिमत्व साकारण्याची धमक दिसली. ती देशातील एक बहुगुणी अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक उत्तम अभिनेत्री दिग्दर्शक आहे
कंगनाने वर्षाच्या सुरुवातीलाचं या चित्रपटाची घोषणा केली होती. तसेच कंगनाने म्हटलं होतं, की हा चित्रपट बायोपिक नसणार आहे. तर हा चित्रपट महत्वाच्या राजकीय घटनेवर आधारित असणार आहे. या चित्रपटामुळे आजच्या पिढीला देशाच्या घडून गेलेल्या आणि पुढच्या राजकीय घटना समजण्यास मदत होणार असल्याचंही तिनं म्हटलं आहे.
तर अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदेची कास्टिंग लोकांना खूप आवडली आहे. सुपर्ब, वाह, काय निवड आहे? बेस्ट चॉइस अशा कमेंट करत आहेत. ‘इमर्जन्सीसाठी सर्वात चांगला कलाकार आहे,’ अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. तर अटलबिहारी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे धम्माल उडवून देईल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया अन्य एका यूजरने दिली. तर श्रेयसला कास्ट केल्यामुळे कंगनाचंही कौतुक होत आहे.