“मै कैलास का रहणे वाला, मेरा नाम है शंकर” शंकर महाराज अलीकडच्या काळात होऊन गेले दैवी पुरुष. त्यांना दैवी पुरुषाची उपमा त्यांचे भक्त देतात. या भक्तांच्या यादीत आचार्य अत्रे असल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्र सोबत संपूर्ण भारतामध्ये महाराजांचे भक्त पसरले आहेत. पण जेव्हा जेव्हा शंकर महाराजांचे नाव येतं तेव्हा पहिला मुद्दा चर्चेत येतो तो म्हणजे महाराजांना सिगारेट चालतं.
इतर ठिकाणी भक्तांकडून उदबत्ती पेटवल्या जातात तश्या महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगरेट पेटवल्या जातात. मग अनेकांना प्रश्न पडतो हे कसं काय चालू शकत? तर याबद्दल भक्त सांगतात की, महाराज म्हणाले होते दोन मित्र भटकून येतो. धुरांच्या हवेत तरंगत विश्वभर संसार करत असतात. आज जाणून घेऊयात शंकर महाराजांनी 5 गोष्ट.
पहिली गोष्ट म्हणजे महाराज मूळचे कुठले? नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ विचारू नये असं म्हणतात. महाराजांचा पण काहीसा तसाच आहे. महाराज मूळचे कुठले? हे कोणालाच नेमकं कोणालाच माहिती नाही. पण महाराजांबद्दल एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे महाराज म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या अंतापूरचे.
तिथे चिमणाजी गृहस्थ रहायचे त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. तेव्हा स्वप्नामध्ये शंकरांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की, रानात जा तिथं बाळ मिळेल. मग रानात गेल्यावर लहान मुलगा सापडला. त्यांनी या मुलाला आपल्या मुलासारखं वाढवले. सांभाळ करणाऱ्या मातापित्याला त्यांन आशीर्वाद दिला पुत्रप्राप्ती भव आणि निघून गेला.
त्यामुळे स्वतःच्या आईवडिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देणारे शंकर महाराज अशी कथा शंकर महाराजांबद्दल सांगितली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांचे वय. भक्तांकडून केलं दुसरा दावा म्हणजे महाराजच वय 162 वर होत. पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक असणार्या भालचंद्र देव यांनी महाराजांना विचारलं होतं.
महाराज तुमचं वय काय म्हणाले? तेव्हा महाराज म्हणाले होते की, मी पेशव्यांबरोबर जेवणाच्या पंगती बसलो होतो. तेव्हा महाराजांच वय 150 वर्षं होत. महाराजांनी समाधी घेतली त्यावेळी महाराजांचे वय 162 वर्षे असल्याचा अंदाज लावला जातो. याबाबत दावा करत असताना असंही सांगितलं जातं की, पुण्याचे डॉक्टर धनेश्वर यांनी महाराजांच्या वयाबाबत मेडिकल टेस्ट केली होती. तेव्हा महाराजांचे वय 150 च्या दरम्यान असल्याचा अंदाज त्यांनी बांधला होता.
तसेच महाराजांना रशियनपासून सर्वच भाषा येत होत्या. तेव्हा भक्तमंडळी दर्शनाला येईल. तेव्हा महाराज प्रत्येका सोबत भक्ताच्या मातृभाषेतूनच बोलायचे. एक रशियन जोडप महाराजांबाबत ऐकून त्यांच्या दर्शनाला आल होतो तेव्हा महाराजांनी त्यांच्या सोबत रशियन भाषेत संवाद साधला होता असं सांगितलं जातं.
भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या भाषा महाराजांना येत होत्या व त्या त्या व्यक्तीसोबत ते त्याच्याच भाषेत संवाद साधायचे असेही भक्तांकडून सांगितलं जातं. महाराजांचा आवडता आकडा 13 होय. महाराजांचा जन्म 13 तारखेला झाल्याचे सांगतात. याबद्दल कथा सांगण्यात येते ते म्हणजे महाराजांच्या समाधी नंतर 54 वर्षांनी माधवनाथ बाबा पावागडचा डोंगर उतरत असताना त्यांना महाराजांचे दर्शन झालं.
महाराजांनी 10 हॉटेलमध्ये चहा पिला आणि प्रत्येक ठिकाणी 13 रुपये इतका वेळ झाल, महाराजांनी प्रत्येक वेळी शंभर रुपयाची नोट दिली पण पैसे परत घेतले नाहीत, असे सांगतात. इतकच काय तर प्र. के. अत्रे यांचा जन्म आणि तारीख 13 असल्याचा संबंधही महाराजांची जोडला जातो. तसेच हैदराबाद संस्थानच्या अखेर होणार ही महाराजांनी सांगितल्याची.
हैदराबाद संस्थान निजाम हे महाराजांचा भक्त. पण त्यानंतर आलेल्या निजाम मात्र महाराजांचा भक्त नव्हता. महाराजांना संस्थानातून हाकलून लावले. हैदराबादच्या मोशी नदीला पूर आला. महाराजांना राग आलेला त्यामुळे निजामाने त्यांना पालकीतून बोलवून घेतले. महाराज म्हणाले तुझं संस्थान संपणार आणि पुढे झाले तसेच.
या गोष्टी होत्या भक्तांकडून सांगितल्या जाणाऱ्या कल्पित असणाऱ्या या गोष्टींवर विश्वास ठेवणं हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा मार्ग. अशा बऱ्याच गोष्टी ऐकीवात जोडलेले असतात. मात्र सत्य आहे ते म्हणजे महाराजांच्या प्रतिमेसमोर सगळेजण सिगरेट पेटवत असतात..