आता UPI अॅक्टिव करताना आता ATM कार्डची आवश्यकता भासणार नाही. UPI मध्ये आमुलाग्र बदल.

Infomative Money Technology

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

फिनटेक प्लॅटफॉर्म PhonePe ने ग्राहकांना एक नवीन सुविधा दिली आहे. आता आधार कार्ड द्वारे देखील या प्लॅटफॉर्मवर UPI सेवा सक्रिय करता येईल. पूर्वी ग्राहकांना UPI सेटअपसाठी डेबिट कार्ड तपशील द्यावा लागत होता. या तपशीलांनंतरच, ग्राहक UPI पिन सेट करू शकत असे. डेबिट कार्ड सक्तीचे असल्याने ज्या लोकांकडे डेबिट कार्ड नाही ते UPI वापरू शकत नाहीत.

आधार आधारित UPI ऑनबोर्डिंग सेवा सुरू करणारे PhonePe हे पहिले UPI थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) अॅप ​​आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. यामुळे अधिकाधिक लोक डिजिटल पेमेंटचा लाभ घेऊ शकतील. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल आणि तुमचा UPI आधार कार्डद्वारे फोनपे वर सेट करू इच्छित असाल, तर पुढील माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.

तुमच्या मोबाइल मध्ये PhonePe हे अॅप उघडा, त्यामध्ये प्रोफाईल पेज वर जा. तिथे तुम्हाला पेमेंट इंस्ट्रमेंट्स हा ऑप्शन दिसेल, तो निवडावा. पुढे ‘अॅड बँक अकाऊंट’ हा ऑप्शन निवडावा. तुमची बँक निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेत रजिस्टर असलेल्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP तिथे लिहा.

पुढे PhonePe तुमचे बँक खाते UPI सोबत लिंक करेल. पुढे UPI चे अॅक्टीव्हेशन करण्याची आवश्यकता आसते, जिथे तुम्हाला आता 2 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन डेबिट कार्ड द्वारे अॅक्टीव्हेशन आणि दूसरा पर्याय आधार कार्डद्वारे अॅक्टीव्हेशन. ज्या लोकांकडे डेबिट कार्ड नाही अश्या लोकांनी आधार कार्ड हा पर्याय निवडावा. आधार कार्डचे शेवटचे 6 अंक तुम्हाला तिथे लिहावे लागतील.

आधार कार्डचे शेवटचे 6 अंक लिहून सबमीट केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला लिहून सबमीट करावे लागेल. शेवटची स्टेप म्हणजे तुम्हाला तुमचा UPI पिन सेट करावा लागेल. अश्या पद्धतीने तुम्ही आता आधार कार्ड वापरुन देखील UPI सुरू करू शकता. ATM कार्ड मिळण्याची वाट आता पहावी लागणार नाही.

2016 मध्ये UPI लाँच झाल्यामुळे डिजिटल पेमेंटच्या जगात क्रांती झाली. UPI ने थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली. पूर्वी डिजिटल वॉलेटचा ट्रेंड होता. वॉलेटमध्ये केवायसी सारखा त्रास होतो, तर यूपीआयमध्ये असे काहीही करावे लागत नाही. RBI भारतात RTGS आणि NEFT पेमेंट सिस्टम चालवते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) IMPS, RuPay, UPI सारख्या प्रणाली चालवते. सरकारने 1 जानेवारी 2020 पासून UPI ​​व्यवहारांसाठी शून्य-शुल्क फ्रेमवर्क अनिवार्य केले आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *