नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
काही दिवसांपूर्वी फूटबॉल वर्ल्डकप 2022 ची सांगता झाली. अतिशय रोमहर्षक झालेल्या वर्ल्डकप फायनल मॅच मध्ये दोन्ही संघांनी पुरेपूर जोर लावला होता. शेवटी मेस्सीच्या अर्जेंटीना संघाने फ्रांसला हरवून वर्ल्डकपवर आपले नाव कोरले, आणि सोशल मीडियावर फूटबॉल संबंधी पोस्ट्स/मीमचा पाऊस सुरू झाला. अनेक पोस्ट्स आणि कमेंटमध्ये मेस्सीला GOAT म्हणून संबोधले जात होते.
असे नाही की भारतात फूटबॉलचे नाहीत, परंतु त्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. असे असताना देखील भारतातील बहुतांश लोकांना मेस्सी कोण आहे हे नक्कीच माहीत आहे. परंतु, माझ्या सारखे असे अनेक लोक सोशल मीडियावर GOAT हा शब्द पाहून डोकं खाजवताना दिसून आले.
तर आजच्या लेखात आपण GOAT चा नेमका अर्थ काय? मेस्सीला GOAT म्हणून का संबोधले जात आहे? GOAT या शब्दाची सुरुवात केंव्हा झाली याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
सर्वप्रथम, GOAT चा अर्थ जाणून घेऊया. या शब्दाचा फूलफॉर्म Greatest Of All Time असा आहे आणि त्याचा अर्थ ‘एखाद्या क्षेत्रातील महान’ असा होतो. मग तो खेळ असो किंवा मनोरंजन क्षेत्र. मेस्सी हा फुटबॉलचा सर्वोत्तम खेळाडू असून त्याने आपल्या संघाला विश्वचषक जिंकून दिला आहे, त्यामुळे त्याला फुटबॉलचा देव म्हटले जात आहे.
सोशल मीडियावर, जेव्हा लोक अशा व्यक्तिमत्त्वाच्या संपर्कात येतात जे त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असतात, तेव्हा ते बकरीचे इमोजी पाठवून किंवा GOAT लिहून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतात.
याची सुरुवात महान अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली यांनी केली होती. मॅच जिंकल्यावर तो स्वत:साठी I Am The Greatest असा शब्द वापरायचा. यातून प्रेरित होऊन त्यांची पत्नी लोनी अली यांनी GOAT नावाची कंपनी सुरू केली आणि ती मोहम्मद अली यांच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यास सुरुवात केली.
2000 पर्यंत हा शब्द फक्त बॉक्सर मुहम्मद अली पुरता मर्यादित होता, पण त्याच वर्षी एल एल कूल जे या रॅपरने गाणे बनवले. त्याने त्याच्या अल्बमला GOAT असे नाव दिले. ते इतके प्रसिद्ध झाले की लोक सामान्य भाषेत त्याचा वापर करू लागले.
यानंतर 2018 मध्ये हा शब्द पुन्हा चर्चेत आला. यावेळीही खेळाडूसाठी हा शब्द वापरला जाऊ लागला. तो दुसरा कोणी नसून अमेरिकेचा महान फुटबॉलपटू टॉम ब्रॅडी आहे. लोक त्यालाही गोट म्हणायचे.
मेरियम-वेबस्टरने या वर्षी आपल्या शब्दकोशात हा शब्द समाविष्ट केला. अशा प्रकारे, हा शब्द सामान्य लोकांमध्ये तयार झाला आणि विशेषतः सोशल मीडिया चॅटमध्ये त्यांच्या संभाषणाचा भाग बनला. मायकेल जॉर्डन, रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स आणि भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनाही लोकांनी GOAT म्हटले आहे कारण ते आपापल्या क्षेत्रात मास्टर होते किंवा आहेत.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.