109 वर्षांचा सांस्कृतिक आणि वैभवशाली इतिहास केशवराव भोसले नाट्यगृह!!

Uncategorized

 

कोल्हापूर जिल्ह्यातील सांस्कृतिक वैभव अशी ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहला गुरुवारी रात्री भीषण आग लागली आणि या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं. 109 वर्षांचा सांस्कृतिक आणि वैभवशाली इतिहास नाट्यगृह एका रात्रीत उध्वस्त झाले. कोल्हापुरात नाट्यकला रुजवण्यासाठी स्वतः राजश्री शाहू महाराजांनी नाट्यगृह उभारलं होतं. त्यासाठी रोम मधल्या नाट्यगृहाचा बांधणीचा अभ्यास केला होता. यांच्या बांधकाम देखील एका खास वैशिष्ट्यं करण्यात आलं होतं. जेव्हा कोल्हापुरात वीज आली नव्हतो तेव्हा फक्त गॅस बत्तीच्या दिव्यांच्या उजेडात आणि माईक शिवाय प्रेक्षकांना नाटक आणि नाट्यसंगीताचा आस्वाद घेता येईल अशा नाट्यगृहाची रचना होती. असे नाट्यगृह एका रात्री उध्वस्त झाले.

नाट्यगृह सोबतच महाराजांनी कुस्तीसाठी उभारलेले भव्य खासबाग मैदान देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान या दोन्ही वास्तू एकमेकाला लागून असल्यामुळे त्या दोन्ही वस्तूंचा मोठे नुकसान झाले. नाट्यगृह आला आग लागल्यानंतर खासबाग मैदान कुस्तीपर्यत पोहचली. भारतातील कुस्तीच लोड्स म्हणून या मैदानाची ओळख आहे. महाराष्ट्रात अनेक नामवंत मल्ल यास मैदानातून घडले. शाहू महाराजांनी त्या काळी लाखो रुपये खर्च करून हे मैदान उभारलं होतं. युरोपियन मैदानांना देखील लाजवेल अस हे मैदान होत. अलीकडच्या काही वर्षात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत होते. यामध्ये आगीमुळे खासबाग मैदानाच्या उरलंसुरलं वैभव देखील जळून खाक झाले.

या मैदानाच्या पुनर्निर्मितीसाठी सरकारने निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे याचे पुन्हा हे वैभव करण्याचा प्रयत्न होईल. पण शाहू महाराजांना जमलं होतं ते आताच्या सरकारला जमणार का? हे पाहावे लागेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *