नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
बनावट दस्तावेज तयार करुन फसवणूक केली असेल, तर त्या व्यक्तीविरुद्ध कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो व त्याला काय शिक्षा होऊ शकते. तसेच आज आपण कलम 465,467,468, 471, 420 भा.द.वी नुसार फिर्याद कशी द्यावी, हे बघणार आहोत.
1. कलम 465 :- बनावटीकरणा बद्दल शिक्षा: बनावटीकरण म्हणजे खोट दस्तावेज तयार करणे जसे की खरेदीखत खोटी मृत्युपत्र खोटे विक्रीकरणामा इत्यादी अशा प्रकारचे खोटे दस्तावेज तयार करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षापर्यंत वाढू शकणाऱ्या करावासाचे शिक्षा व शक्ती किंवा दंड लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात..
2.कलम 467 :- मुल्यवान रोखा, मृत्यूपत्र इत्यादीचे बनावटीकरण: जो दस्तावेज म्हणजे मूल्यवान रोखा किंवा इच्छापत्र त्याला आपण मृत्यूपत्र म्हणू शकतो किंवा मुलगा दत्तक घेण्याविषयीची एखादी प्राधिकरणपत्र किंवा एखादा मूल्यवान रोखा हा किंवा हस्तांतरित करण्याचे अगर मुद्देमाल त्यावरील व्याज किंवा लाभांश घेण्याचा कोणतीही रक्कम जंगम मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा स्वीकारण्याचा किंवा सुपुर्द करण्याचा दस्तावेज कोणत्याही व्यक्तीला देत असल्याचे दिसते,
अशा एखाद्या दस्तावेज किंवा जो दस्तावेज म्हणजे पैसे मिळण्याची व्यक्तीला दिलेली पावती किंवा दस्तऐवजी पैसे चुकते झाल्याची पोचपावती देणारे निस्तार पत्र किंवा कोणतीही संगम मानमत्ता किंवा मूल्यवान रोखा सुपूर्द करण्यात आल्याबद्दल निस्तार पत्र किंवा पावती असल्याचे दिसते असा कोणताही दस्तावेज जो कोणी बनावट तयार केली, त्याला आजीवन करावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दहा वर्षापर्यंत वाढू शकणाऱ्या करावाच शिक्षा होऊ शकते किंवा त्यांना लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
3. कलम 468 :- फसवणूक करण्याच्या हेतुने बनावटीकरण: कलम 468 नुसार जो कोणी फसवणुकीच्या हेतूने खोटी कागदपत्रे तयार करतो किंवा दस्तावेज किंवा इलेक्ट्रॉनिक रिकॉर्ड खोटी आहे. तरीही फसवणुकीच्या उद्देशाने त्याचा वापर करतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस 7 वर्षापर्यंत वाढू शकणाऱ्या करावासाची शिक्षा होऊ शकते किंवा त्यांना दंड लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
4. कलम 471 :- बनावट दस्तावेज खरा म्हणून वापरने: कलम 471 नुसार दस्तावेज बनावट असल्याचे स्वतःला माहित आहे किंवा तशी समजण्याचे कारण आहे असा कोणताही दस्तावेज जो कोणी कपटीपणाने किंवा अप्रमाणितपणे खरा आहे, म्हणून वापरली त्याला कलम 465 नुसार 2 वर्षे वाढु शकणाऱ्या करावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात..
5.कलम 420 :- फसवणूक केल्याबद्दल शिक्षा: जो कोणी एखाद्या व्यक्तीची फसवणूक करतो किंवा कोणतेही व्यक्तीला खोटं आमीष दाखवून त्यांच्याकडे पैसे किंवा मालमत्ता हडप करतो किंवा नष्ट करतो किंवा ती मालमत्ता नष्ट करतो किंवा खोटे बोलून खोट्या सह्या करून आर्थिक किंवा मानसिक दबाव निर्माण करून मालमत्ता बळकावतो असे करणाऱ्या व्यक्तीस सात वर्ष वाढू शकणाऱ्या कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
जो कोणी एखाद्या व्यक्तीची फसवणूक करतो किंवा कोणतेही व्यक्तीला खोटं आमीष दाखवून त्यांच्याकडे पैसे किंवा मालमत्ता हडप करतो किंवा नष्ट करतो किंवा ती मालमत्ता नष्ट करतो किंवा खोटे बोलून खोट्या सह्या करून आर्थिक किंवा मानसिक दबाव निर्माण करून मालमत्ता बळकावतो असे करणाऱ्या व्यक्तीस सात वर्ष वाढू शकणाऱ्या कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
फिर्याद कशी द्यावी
प्रति,
मा.पोलीस निरीक्षक साहेब शहर पोलीस स्टेशन
फिर्यादी :- अ, ब, क सराईत नगर नांदेड
आरोपी :- ड, ब, क रा वसमत
मी वरील फिर्यादी खालील प्रमाणे तक्रार दाखल करतो की, मी वरील ठिकाणचा राहणार असून नांदेड पासून थोडे अंतरावर वसमत परिसरात येथे माझी एक एकर वडिलोपार्जित शेती असून ती माझ्या नावावर आहे. आरोपीने काही दिवसापूर्वी माझ्याकडे वरील शेती खरेदी करायची आहे म्हणून प्रस्ताव मांडला होता. परंतु तेव्हा मी त्याला नकार दिला होता त्यामुळे आमच्यात कोणताही व्यवहार झाला नाही. परंतु माझ्या मालकीची फ्लॅट विकण्याचा सौदा आरोपी व माझ्यात मध्ये झाला होता.
आज सकाळी मी तलाठी कार्यालयात वरील जमिनीचा उतारा काढण्यासाठी गेलो असता मला धक्का बसला. सदरची शेत जमीन आरोपी यांच्या नावावर करण्यात आली होती. याबद्दल मी अधिक माहिती घेतली असता. मला कळाले की, आमच्या दोघांमध्ये दोन महिन्यापूर्वी खरेदीखत झाल्याचे दाखवत आहे. त्यामुळे माझे नाव कमी करून आरोपीचे नाव लावण्यात आले आहे. याबद्दल मी खरेदी विक्री नोंदणीच्या निबंधकांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता मला अढळुन आले की, दोन महिन्यापूर्वी आरोपीने माझ्या नावाची खोटी सही करून खरेदी करून नोंदवून घेतले आहे.
या खरेदीखताची प्रत पाहता त्यावरील माझी सही नसून ती बनावट आहे. दुसऱ्या व्यक्तीला मी आहे असे भासवून यापूर्वी त्यांच्यात व माझ्या झालेला व्यवहाराचा खोटे खरेदीखतावरून त्यात अशी सही केली असावी. त्यामुळे त्यांनी खोटे दस्तावेज तयार करून ते खरे असल्याचे भासवले व त्याची नोंद सरकारी दरबारात करून माझी फसवणूक केली आहे. यासाठी निबंधकांच्या कार्यातील कर्मचाऱ्याशी संगनमत करून हे खरेदी खत केले असावी त्याशिवाय ही नोंद होणे शक्य नाही.
तरी आरोपीने बनावट सही केल्याबद्दल व फसवणूक केल्याबद्दल व माझी शेती त्यांच्या नावावर केल्याबद्दल कायदेशीर फिर्याद देत आहे. याबद्दलची कायदेशीर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती..
फिर्यादी
अ, ब, क
रा सराईत नगर नांदेड
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.