‘६ ड’ चा उतारा म्हणजे काय? सविस्तर जाणून घ्या गाव नमूना ‘६ ड’ चे काय महत्व आहे?

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

आपण सर्वांना माहिती असेलच की विविध शेतजमीनीची विविध प्रकारची माहिती ही विविध गाव नमूण्यांमद्धे संकलित केली जाते. जसे की गाव नमूना 7 आणि गाव नमूना 12 हा एकत्रित पणे ‘7/12 उतारा’ म्हणून आपण ओळखतो, यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कांबाबत, इतर अधिकाराबाबत, पिकांबाबत माहिती दिसून येते. त्याच प्रकारे गाव नमूना ६ ड द्वारे कोणती माहिती मिळते, या उतार्‍याचे महत्व काय आहे हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊ.

आपण जेंव्हा शेतजमिनीच्या मालकी बद्दल बोलतो तेंव्हा एक गोष्ट निश्चितपणे सांगता येते की कोणतीही शेतजमीन कायमस्वरूपी एकाच व्यक्तीच्या मालकीची राहू शकत नाही. कालांतराने ती शेतजमीन इतर व्यक्तीच्या मालकीची होते. हे हस्तांतरण वारस हक्काने होऊ शकते, किंवा खरेदी-विक्री कराराने, किंवा इतर प्रकारे होऊ शकते. परंतु हे हस्तांतरण संपूर्ण जमिनीचे झाले तर काहीच अडचण येणार नाही, पण जमिनीचा तुकडा पडल्यास भविष्यात अडचणी वाढू शकतात.

जेंव्हा शेतजमिनीचे हस्तांतरण वारसहक्काने, अथवा वाटणी द्वारे, अथवा इतर प्रकारे होते तेंव्हा त्या जमिनीचे पोटहिस्से पडतात. एका उदाहरणे हे समजून घेऊ. समजा गणेश यांच्या मालकीची १० एकर शेतजमीन आहे. असे मानू की त्यांना रमेश आणि सुरेश हेच २ कायदेशीर वारस आहेत. तेंव्हा कालांतराने ती १० एकर शेतजमीन रमेश आणि सुरेश यांच्या मालकीची होईल. रमेश आणि सुरेश यांनी आपापली जमीन स्वतंत्र वाहण्याचे ठरवले तर त्या १० एकर शेतजमिनीचे ५-५ एकरचे दोन पोटहिस्से होणे गरजेचे आहे.

आपण वरील उदाहरनाद्वारे पाहिले की एका ७/१२ उतार्‍याचे दोन पोटहिस्से तय्यार झाले. जेंव्हा यासंबधी फेरफार घेण्याचे ठरते तेंव्हा आपण त्यासाठीचा अर्ज तलाठी कार्यालयात करतो आणि फेरफार मंजूर करून घेतो. परंतु, कायद्यातील तरतुदी नुसार तलाठी यांनी फेरफार मंजूर करण्यापूर्वी या तयार झालेल्या पोटहिस्से बाबतची माहिती गाव नमूना ६ ड मध्ये नमूद करणे आवश्यक असते.

जेंव्हा एखाद्या शेतजमिनीचा उपविभाग पडतो, किंवा पोट हिस्सा पडतो तेंव्हा त्याबतची माहिती ज्या अभिलेखात नोंद करण्यात येते त्यालाच गाव नमूना ६ ड किंवा ६ ड उतारा म्हणतात. ही नोंद घेताना तलाठी यांनी प्रत्यक्ष त्या शेतजमिनीवर हजर होऊन त्याचा कच्चा नकाशा देखील बनवून घेणे अपेक्षित असते. हा कच्चा नकाशा देखील गाव नमूना ६ ड मध्ये नोंदवून घेणे गरजेचे असते.

कायदेशीर तरतुदी नुसार दर वर्षी नवीन रचना केलेले किंवा एकत्रित केलेले उपविभाग हे ज्या नोंदणी पुस्तिकेत दर्शवलेले असतात त्यांची तपासणी करणे, आणि तहसिलदार कार्यालयामार्फत भूमीअभिलेख कार्यालयाला याची माहिती देणे आवश्यक असते. परंतु वास्तविक पाहताना जिथे जिथे जमिनीचे पोटहिस्से पडतात तिथे या कायदेशीर बाबींचे पालन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शासकीय रेकॉर्ड अपूर्ण राहते.

आता तुम्ही म्हणाल हे सर्व ठीक आहे, परंतु या ६ ड उतार्‍याचा आपल्याला काय फायदा? तर वरती सांगितल्याप्रमाणे जमिनीचे पोटहिस्से पडतात तेंव्हा कच्चा नकाशा बनविणे आवश्यक असतो आणि साव माहिती भूमीअभिलेख कार्यालयास देणे गरजेचे असते. यामुळे भविष्यात जेंव्हा भूमीअभिलेख कार्यालयाद्वारे मोजणी करण्याची आवश्यकता पडते तेंव्हा त्यांना कुठून सुरुवात करावी? कशी सुरुवात करावी? जमिनीचे जुने नकाशे आणि इतर सर्व आवश्यक माहिती प्राप्त असते, त्यामुळे अचूक मोजणी होऊ शकते. परंतु ही माहिती त्यांच्याकडे नसल्यास दिरंगाई आणि चुकीची मोजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारी दफ्तरातील सर्व रेकॉर्ड अप-टू-डेट असेल तर याचा फायदा फक्त त्या दफ्तरासच नाही तर शासनाला, नागरिकांना देखील होतो. अचूकता वाढते. एखाद्या कामाला लागणार्‍या वेळेचे प्रमाण देखील कमी होते, त्यामुळेच सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून रेकॉर्ड मेंटेन ठेवणे आवश्यक असते. आपण देखील आपल्या शेतजमिनीचा पोटहिस्सा पडणारा फेरफार नोंदवन्यासाठी तलाठी कार्यालयात जाल तेंव्हा गाव नमूना ६ ड मध्ये नोंद घेण्याबाबत विचारणा नक्की करा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *