PM किसान योजना : या 3 कारणांमुळे बंद होऊ शकतो तुमचा शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता. आजच तपासून घ्या.

Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

राज्य सरकारे आपापल्या राज्यांसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना चालवतात. दुसरीकडे, केंद्र सरकार देखील वेगवेगळ्या विभागांसाठी योजना चालवते, ज्याचा उद्देश प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला मदत करणे हा आहे. या लेखामद्धे गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेबद्दल काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. 

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. त्याच वेळी, 11 व्या हप्त्यानंतर आता प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की 12 वा हप्ता कधी येणार आहे? परंतु त्याआधी तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळतील की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण काही कारणांमुळे काही शेतकऱ्यांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. 

हप्त्याचे पैसे अडकण्याची कारणे तर जाणून घेऊच, पण त्याआधी सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बाराव्या हप्त्याचे पैसे कधी येऊ शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 12 व्या हप्त्याचे पैसे नवरात्रीच्या दिवसात येऊ शकतात. मात्र, अधिकृत घोषणेची सर्वांना प्रतीक्षा आहे. चला तर मग आता जाणून घेऊया कि हप्ता अडकण्याची कारणे.

1) जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर तुमचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. या योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याचे सरकारने आधीच स्पष्ट केले होते. अन्यथा तुमचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या e-kyc सेंटरला भेट देऊन आपली e-kyc करून घेणे खूप महत्वाचे आहे.

2) असे अनेक शेतकरी आहेत जे अपात्र असूनही चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. सरकार अशा लोकांना नोटिसा बजावून वसुली करत आहे, त्याचवेळी अशा लोकांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कोणत्याही गैर मार्गांचा वापर करून आपण या योजनेसाठी पात्र झालेले असाल तर आपला हफ्ता कायमचा बंद होऊ शकतो.

3) जर तुम्ही या योजनेशी निगडीत असाल तर तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये कोणतीही चूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. नाव देवनागरी लिपीत नसून इंग्रजीत लिहिलेले असावे किंवा किंवा कोणतेही कागदपत्र दिले नसतील तर इ. त्यामुळे अशा परिस्थितीतही हप्त्याचे पैसे अडकू शकतात. तेंव्हा kyc सेंटरला भेट देऊन योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *