मित्रांनो पुण्यातील आगाखान पॅलेस हे त्याचे स्थापत्य वैभवासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वसाठी प्रसिद्ध असलेले लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. जे महाराष्ट्र बरोबर अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते. त्याला भेट देण्यासाठी सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची मोठी गर्दी आपल्या पॅलेसमध्ये पाहायला मिळते, अशातच आज आपण पुण्यातील आगाखान पॅलेस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत..
आगाखान पॅलेस ही पुणे शहरातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू मानली जाते. जी पुण्यात कल्याणीनगर या परिसरामध्ये स्थित आहे. जी पुणे शहरातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. इसवी सन 1892 ते 1897 दरम्यान सुलतान महंमद शाह यांनी या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले होते. आगाखान पॅलेस इमारतीचे संपूर्ण बांधकाम इटालियन बनावटीच्या आहे. ज्याला पाहिल्या नंतर मन अगदी भरून जाते.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लढ्यात महत्त्वाची भूमिका होती. कारण 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केल्यानंतर लगेचच त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांना अटक केली होती आणि 10 ऑगस्ट रोजी तुरुंगात टाकण्यासाठी पुण्यातील या राजवाड्यात आणले होते. त्याचबरोबर कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई, सरोजिनी नायडू, प्यारेलाल नायर आणि डॉक्टर सुशीला नायर यांनीही याच पॅरिसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
या काळात महादेवभाई देसाई आणि कस्तुरबा गांधी यांनी यावर आपला अखेरचा श्वास घेतला. आगाखान पॅलेस ही इतिहासिक वास्तु साधारणता 19एकर इतक्या मोठ्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेली आहे. त्याला बांधून पूर्ण करण्यासाठी एकूण पाच वर्षाचा कालावधी लागला. यामध्ये सुमारे 1000 कामगार लागले होते. हा भव्य राजवाडा बांधण्यासाठी एकूण 12 लाख खर्च करण्यात आला होता. ज्यामध्ये 5 मोठे हॉल, इटालियन शैलीतील कमानी आणि एक विस्तृत कॅरिडॉर आपल्याला मिळतो.
या पॅलेसमध्ये सुंदर संग्रहालय देखील आहे. जिथे पर्यटकांना गांधी यांची छायाचित्रे आणि त्यांच्या वैयक्तिक गोष्टी पाहता येतात. त्यामुळे आज आगाखान पॅलेस गांधीजी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचे स्मारक म्हणून काम करते. या ठिकाणी आपल्याला छायाचित्रे, चित्रे, कपडे, भांडी आणि चप्पल यासारख्या वैयक्तिक वस्तू आणि त्यांच्या सचिवाच्या मृत्युबद्दल त्यांनी दिलेली पत्रे यांचा समावेश आहे. दररोज या पॅलेसमध्ये सकाळी गांधींच्या समाधीवर प्रार्थना सत्र आयोजित केले जाते. यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. विशेष म्हणजे 2 ऑक्टोंबर रोजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त अनेक पटीने येथील लोक उपस्थित असतात.
त्याचबरोबर गांधी मेमोरियल सोसायटी तर्फे या पॅलेसमध्ये अनेक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, 30 जानेवारी म्हणजेच हुतात्मा दिन, 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोंबर म्हणजेच गांधी जयंती आणि कस्तुरबा गांधी यांची पुण्यतिथी जो मात्र दिन म्हणून साजरा केला जातो. इत्यादी दिवस या ठिकाणी साजरे केले जातात.
आगाखान पॅलेसपासून काही अंतरावर आपल्याला मोठे गार्डन, मराठा इतिहास संग्रहालय, राष्ट्रीय युद्ध स्मारक, इम्प्रेस गार्डन, पाताळेश्वर मंदिर, शनिवार वाडा, महात्मा फुले संग्रहालय आणि श्री ओम्कारेश्वर मंदिर अशा प्रसिद्ध ठिकाणांना भेट देता येईल. तसेच यांच्या सर्वात जवळच स्टेशन पोलीस स्टेशन आहे तर जवळचे बस स्थानक पुणे सेंट्रल आहे. हा पहिले सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत खुला असतो. त्याला पाहण्याकरिता भारतीय व्यक्तींकडून 20 रुपये तिकीट आकारले जाते, तर फॉरेनर पासून 250 प्रतिव्यक्ती इतके तिकीट आकारले जाते.
तर मित्रांनो आज आपण आगाखान पॅलेस बद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही पुण्यातील आगाखान पॅलेसला कधी भेट दिली आहे का? आणि तिथे तुम्हाला काय सर्वात जास्त आवडले? ते आम्हाला नक्की कळवा..
