भारतातील सर्वात लहान 5 राज्य कोणती? जाणून घ्या!!

Infomative News

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहिती असेल की, आपला भारत देश क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा सातवा देश आहे. भारतातील एकूण राज्यांचा केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर भारतात राजकीय दृष्ट्या 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. बऱ्याच जणांना भारतातील सर्वात मोठ्या राज्य बद्दल माहिती असेल, परंतु सर्वात लहान राज्य फार कमी लोकांना माहिती आहे. कारण की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गोंधळामुळे यांचा अंदाज लावणे फार कठीण होऊन जाते, अशातच आज आपण क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य कोणती आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..

◆ मिझोरम : भारतातील सर्व राज्यांचे यादीमध्ये मिझोरम या राज्यांच्या पाचवा क्रमांक लागतो. मिझोरम राज्याची एकूण क्षेत्रफळ 21081 चौरस किलोमीटर आहे. जे देशाच्या एकूण भूभागाच्या 0.64 टक्के भूभाग व्यापते. ईशान्य भारतातील एक राज्य आहे. तसेच ऐझॉल मिझोरमची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे देखील आहे.

◆ नागालँड : सर्वात लहान राज्यांच्या यादीमध्ये नागालँड राज्याचा चौथा क्रमांक लागतो. नागालँड राज्याची एकूण क्षेत्रफळ 16,579 चौरस किलोमीटर इतकी आहे, जे देशांच्या एकूण भूभागाच्या फक्त 0.50 टक्के इतका भूभाग व्यापते. नागालँड हेदेखील ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे. कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी व दिमापूर हे सर्वात मोठे शहर आहे.

◆ त्रिपुरा : भारतातील सर्वात लहान राज्यांच्या यादीमध्ये त्रिपुरा या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. त्रिपुरा या राज्याची एकूण क्षेत्रफळ 10, 486 चौरस किलोमीटर इतकं आहे. जे देशाच्या एकूण भूभागाच्या फक्त 0.31 टक्के भूभाग व्यापते. त्रिपुरा हेदेखील ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे. त्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणून आगरताळा पाहिले जाते.

◆ सिक्कीम : भारतातील सर्वात लहान राज्यांचे यादीमध्ये सिक्कीम या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. सिक्कीम या राज्याची एकूण क्षेत्रफळ 7096 चौरस किलोमीटर इतके आहे. जे देशाच्या एकूण भूभागाच्या फक्त 0.21 टक्के भूभाग व्यापते. सिक्कीम हे देखील ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे. जे पूर्व हिमालयमध्ये स्थित आहे. त्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणून गंगटोककडे पाहिले जाते.

◆ गोवा : भारतातील सर्वात लहान राज्यांच्या यादीमध्ये गोवा राज्याचा पहिला क्रमांक लागतो. गोवा राज्याचे क्षेत्रफळ 3,702 चौरस किलोमीटर इतकी आहे. जे देशाच्या एकूण भूभागाच्या फक्त 0.11 टक्के भूभाग व्यापते. गोवा हे अरबी समुद्राच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले राज्य आहे. गोव्याची राजधानी पणजी आहे आणि वास्को-द-गामा हे या राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.

तर मित्रांनो आज आपण क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान 5 राज्य कोणती? याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *