नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
मराठा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडणारा प्रश्न म्हणजे बखर म्हणजे काय ? कारण आपल्यापैकी कोणालाही मराठ्यांचा इतिहासाबद्दल एखादी गोष्ट खरी करायची असे किंवा सिद्ध करायचे असेल की मग लगेच तिथे कोणत्या ना कोणत्या बखरीचा संदर्भ दिला जातो. पण मुळात या बखरी आहेत तरी काय चला जाणून घेऊया..
दरम्यान, बखर ही आशियातील विशेष करून मराठी साहित्याची ऐतिहासिक साहित्यातील एक प्रकार लेखन आहे. ज्यामध्ये लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयी लेखन ह्या बखरीमध्ये आपल्याला वाचावयास मिळते. बखर या शब्दाची उत्पत्ती खबरपासून झालेली आहे. खबर म्हणजेच वृत्तांत होय. मराठ्यांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्याच्या अर्थाने रूढ झाला आहे.
अशी माहिती अर्थाने ऐतिहासिक व्यक्ती व घटना यांच्याविषयी असेल. अनेक वेळा चरित्र नायकांच्या हुकुमावरून बखरकारा कडून बखर लिहून घेतल्या जात असेल. तथापि बखरकार एका विशिष्ट पक्षाचे असल्याने त्यांचा इतिहास पक्षपतीपणे लिहिला जात असे. स्वयकीयांची स्तुती व परकीयांची निंदा असे. तरीही राजकीय स्वरुपाच्या इतिहास लेखनाची परंपराच्या दृष्टीने त्यांचे महत्व आहे.
शालीवाहन बखर ही सर्वांत जुनी बखर आहे. इ. स. 1818 पर्यंत सुमारे अडीचशे बखरी लिहिल्या गेल्या. सभासद बखर ही शिवाजी महाराजांवरील सर्वात जुनी व शिवकालात लिहिली गेलेली बखर आहे. हिचा कर्ता कृष्णाजी अनंत सभासद हा असून त्याने शिवाजी महाराजांचा पराक्रम स्वतः पाहिलेला व ऐकिलेला आहे. राजाराम महाराजांच्या आज्ञेने ही बखर लिहिण्यात आली.
मराठी इतिहासाच्या अभ्यासूच्या दुर्देवाने सभासदाने ही बखर फार संक्षिप्त अशी लिहिली आहे. तरीही महाराजाच्या काळातील ही बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्व आहे. बखरीत महाराजांची राज्यकारभार व्यवस्था, लप्कर अवस्था, किल्ले, खजिना, सरदार इत्यादी अनेक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे
कृष्णाजी अनंत हिरेपारखी तथा ‘सभासद’ विरचित सभासद बखरीतील एक पान. डावीकडे, मूळ मोडी लिपीतील प्रत व उजवीकडे, त्याचे देवनागरी लिप्यंतर केले. बखरी या साधारणतः दुय्यम साधने समजली जात असली तरी, ‘सभासद’ हा शिवछत्रपतींचा दरबारी असून समकालीन व प्रत्यक्षदर्शी होता. आणि याच कारणामुळे या बखरीला एक वेगळे महत्व आहे जे इतर उत्तरकालीन बखारींना नाही.
याचबरोबर, बखरलेखनाचे सर्वसाधारण तीन कालखंड पडतात. शिवपूर्व कालखंड, शिवकाल व पेशवेकाल, शिवपूर्वकालात बखर ही आख्यायिका म्हणून वावरते. शिवकालात ही बखर चरित्रकथा म्हणून अवतरते. पेशवेकालात तिला स्वतःचे स्वयंपूर्ण विकसीत स्थान मिळते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.