जमिनीच्या मालकी हक्कात बदल कोण कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो? आपली जमीन कोणी तरी हडपणार तर नाही?

Agriculture Infomative News

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

बऱ्याच वेळा आपल्या जमिनीवर अनेकजण मालकी हक्क दाखवतात. त्यावेळी तुम्हाला नेहमीच भीती वाटते की, आपली जमीन कोणी धोक्याचे घेईल का? नातेवाईक भाऊबंद फसवून आपली संपत्ती घेणार तर नाही ना? त्यावरून आपल्या नात्यात कटुता निर्माण होते आणि भांडण होतात. जमिनीमध्ये आपले नाते संबंध बिघडतात.

अनेक व्यक्ती नोकरीसाठी मूळ गाव सोडून शहरात स्थायिक होतात. त्यांची वडिलोपार्जित संपत्ती गावाकडे असते. त्यामुळे त्या जमिनीवर लक्ष ठेवणारी हक्काची आणि विश्वासू व्यक्ती नसते. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होऊ शकते की, कोणी फसवून आपली जमीन घेणार तर नाही ना? किंवा इतर कोणी जमीन त्यांच्या नावावर तर करून घेणार नाही ना? तुम्हाला देखील अशी भीती वाटत असेल तर, हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.कारण यातून तुमचे गैरसमज दूर होणार आहे आणि तुम्हाला योग्य ती माहिती मिळणार आहे.जमिनीच्या मालकी हक्कांत तीन गोष्टीमुळे बदल होऊ शकतो.

1.नोंदणीकृत दस्ताने

2.वारस तरतुदी द्वारे

3.न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने

1) नोंदणीकृत दस्ताने:
ज्यावेळी जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होतो त्यावेळी मालकी हक्क दुसऱ्याला देण्यासाठी खरेदी खत तयार करणे आवश्यक असते. हे खरेदी खत नोंदणीकृत असावे. अशाप्रकारे मालकी हक्कात बदल होऊ शकतो. तसेच एखाद्या ठराविक समजाला एखाद्या व्यक्तीला जमीन संपत्ती बक्षीस म्हणून मिळाली तर अशा नोंदणीकृत बक्षीस पत्रद्वारे देखील मानसी हक्कात बदल करता येऊ शकतो. भारतीय नोंदणी कायदा कलम 17 नुसार शंभर रुपये पेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचा व्यवहार हा नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

2)वारस तरतुदीद्वारे
जमिनीच्या तसेच संपत्तीच्या मालकी हक्काबाबत बदल होऊ शकतो तर या संदर्भातील तरतुदी या हिंदू वारसा हक्क कायदा 1956 मध्ये नमूद केलेले आहे. 2005 मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यात काही सुधारणा करण्यात आले आहेत आणि या सुधारणा जस स्त्रियांना ही पुरुषांप्रमाणे जमीन वारसा हक्काने समान वाटप मिळते.

जर घरातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीच्या नावे जर संपूर्ण जमीन असेल, तर तिच्या मागे वारस हक्कांची नोंदणी करणे आवश्यक आहे. मयत झालेल्या व्यक्तिला मिळालेली संपत्ती जर वडलोपार्जित असेल तर वारस नोंद हे हिंदू वारसा कायदा 1956 अन्वये होईल. जर एखाद्या व्यक्तीने संपत्ती स्व कष्टाने कमावली असेल आणि वृत्तीच्या आधी जर त्या व्यक्तीने मृत्युपत्र तयार करून ठेवले असेल, तर मृत्युपत्रात ज्या व्यक्तीच्या नावाचा समावेश आहे त्या व्यक्तीच्या नावे ती संपूर्ण संपत्ती जाते.

3.न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने जमिनीच्या किंवा संपत्तीच्या मालकी हक्कात बदल हा कश्या पद्धतीने घडतो तर जमिनीसंदर्भात जर वाद असेल आणि त्याबाबत न्यायालयामध्ये मध्ये जर दावा चालू असेल तर त्या बाबतचा निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या किंवा मग सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने जमिनीच्या मालकी हक्क स्थापित केला जातो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *