आपल्या भारत देशामध्ये कित्येक सुंदर आणि आकर्षक असे किल्ले आहेत. भारतात असणाऱ्या प्रत्येक किल्ल्यामागे एक इतिहास दडलेला आहे. हे किल्ले दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच धोकादायक देखील आहेत. भारतातील अशा किल्ल्यांना भेट देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे, अशातच आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात खतरनाक किल्ले कोणते? याची माहिती देणार आहोत..
◆ गोलकोंडा किल्ला : गोलकोंडा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला तेलंगाना या राज्यातील हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. हैदराबाद मधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाते. गोलकोंडा किल्ला दिवसाची इतका सुंदर आणि आकर्षक दिसतो, तितकाच जास्त धोकादायक आणि खतरनाक संध्याकाळी असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की, या किल्ल्यामध्ये राज्याची प्रिय प्रेमिका राहत होते. ज्यावेळी ही प्रेमिका मरण पावली ते या किल्ल्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस एका स्त्रीच्या नाचण्याचे दृश्य दिसते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यावर जाण्यासाठी सक्त मनाई असते.
◆ नाहरगड किल्ला : राजस्थान या राज्यातील पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर या ठिकाणी नाहरगड हा किल्ला आहे. हा किल्ला आपल्या रहस्यमय ठिकाणसाठी ओळखला जातो. महाराजा सवाई जयसिंग यांनी इसवीसन 1734 मध्ये हा किल्ला बांधला. राजस्थानमधील हा असा एकमेव किल्ला आहे, जिथे कधीही हल्ला झालेला नाही. महाराजा सवाई जयसिंग यांच्या मृत्युनंतर आज देखील त्यांचा आत्मा या किल्ल्यामध्ये वावरत आहे, असे येथील स्थानिकांचे मान्यता आहे. एक वेळेस तरी या किल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा अगदी रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला होता. तेव्हापासून या किल्ल्यामध्ये संध्याकाळच्या वेळी सक्त मनाई आहे.
◆ हरिहर किल्ला : महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित असलेला हरिहर हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे. हरीहर या किल्ल्याला हर्षगड किल्ला म्हणुनही ओळखले जाते. हरिहर किल्ल्यावर चढाई करत असताना आपल्याला उभी चढाई करावी लागते, त्यामुळे ट्रेक करत असताना त्या ठिकाणी केलेली एक चूक आपल्याला मृत्यूच्या दारात घेऊन जाते. हरिहर हा किल्ला धोकादायक असून ही भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.
◆फिरोजशहा कोटला किल्ला : फिरोजशहा कोटला हा किल्ला भारताची राजधानी या ठिकाणी स्थित आहे. हा किल्ला दिवसा फिरण्यासाठी जितका सुंदर आणि आकर्षक आहे, तितकाच धोकादायक संध्याकाळी मानला जातो. असे म्हटले जाते की, संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी जीन आढळून येतात हे संध्याकाळच्या वेळेस लहान मुली आणि मुलींचा शिकार करतात. सध्या किल्ल्याचे अवशेष बर्यापैकी उद्ध्वस्त झालेले आहेत, तरीदेखील संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी लोक जाण्यासाठी घाबरत असतात.
◆ शनिवार वाडा : शनिवार वाडा हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे. शनिवार वाडा हे ठिकाण महाराष्ट्रची राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे शहरात आहे. या किल्ल्यामध्ये नारायणराव यांना त्याच्या चुलतीने 18 व्या वर्षी मारले होते. तेव्हापासून या किल्ल्यात त्यांची आत्मा रहात आहे. असे मानले जाते की, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे देखील म्हटले जाते की, संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यातून वाचावा, वाचवा असे भयंकर आवाज ऐकू येतात.
◆प्रबळगड किल्ला : प्रबळगड किल्ला हा किल्ला हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. भारतातील एक खतरनाक किल्ला म्हणून ओळखला जातो. पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची साधारणतः 700 मीटर इतकी आहे. प्रबळगड किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याचे कठीण आहे की, त्या ठिकाणी सर्वसाधारण ट्रेकर्स जाऊ शकत नाहीत. या किल्ल्याच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ट्रेकर्सना मोठी कसरत घ्यावी लागते. काही ठिकाणी ट्रेकिंग इतकी अवघड आहे की, त्या ठिकाणी केलेली किंचित हजारो फूट खोल दरीत घेऊन जाते. त्यामुळेच या किल्ल्याची ट्रेकिंग करणे खूप अवघड समजले जाते.
◆ ग्वाल्हेर किल्ला : ग्वाल्हेर किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. तो अतिशय बचावात्मक पद्धतीने बांधलेला आहे. हा किल्ला मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर या शहराच्या एका टेकडीवर वसलेला आहे. पाहण्यासाठी जितका सुंदर आहे तितकाच तो रहस्यमय देखील आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की, या किल्ल्याला फक्त एका दिवसामध्ये जीनने बनवलेले आहे. त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये बऱ्याच गुफा देखील आहेत. ज्यामध्ये आज मोठा खजिना दडलेला आहे,असे सांगितले जाते. मात्र या खजिन्याचे रक्षण आज देखील जीन करत असतात असे मानले जाते, म्हणूनच रात्र झाल्यानंतर या किल्ल्यावर कोणीही प्रवेश करत नाही.
◆ गडकुंदार किल्ला: गडकुंदार किल्ला भारतातील अनेक रहस्यमय किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावर चंदेल, बुंदेल, खंगार यासारख्या शासकांनी राज्य केलेले आहे. गडकुंदार किल्ला पूर्वी महाल या नावाने ओळखला जात असे. किल्ल्याची बनावट अशी आहे की, हा किल्ला 4 ते 5 किलोमीटर अंतरावरून सहज दिसतो पण जवळ येतात गायब होतो. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की, बऱ्याच वर्षापूर्वी याच ठिकाणी जवळच्या गावात वरात आली होती ती पूर्ण वरच्या किल्ल्यावरून गायब झाली होती. ज्याचा आजपर्यंत कोणालाच पत्ता लागला नाही, असे देखील म्हटले जाते की, या किल्ल्यावर जो कोणी संध्याकाळी जातो तो परत कधीच येत नाही. त्यामुळे या ठिकाणी संध्याकाळी जाण्यासाठी सक्त मनाई असते.
◆ भानगड किल्ला : राजस्थान मधील अलवर जिल्ह्याच्या आरवली पायथ्याशी आहे. भारतातील एक रहस्यमय किल्ला म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की, भानगड किल्ल्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस भूत आणि आत्म्याचा वास आहे, त्यामुळे भारत सरकारने संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यावर जाण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस वेगवेगळे आवाज येत असतात. त्यामुळे या ठिकाणी संध्याकाळी जाणे टाळले जाते.
◆ कलावंतीण दुर्ग किल्ला : चढाई करण्यासाठी देशातील सर्वात धोकादायक किल्ला म्हणून कलावंतीन दुर्ग किल्याला ओळखले जाते. हा किल्ला दिसायला जितकी सुंदर आणि आकर्षक आहे तितकाच धोकादायक मानला जातो. या किल्ल्याची चढाईच्या दोनही बाजूला खोल दरी आहे. कलावंतीन दुर्ग या किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना ट्रेकर्सनी केलेली एक चूक त्याला मृत्यूच्या दारात घेऊन जाते. जर या किल्ल्यावरून एखाद्या ट्रॅकरचा पाय निसटला तर तो साधारणतः 300 फूट दरीत जाऊन कोसळतो. यानंतर त्याचे जिवंत राहणे जवळ जवळ अशक्य आहे.
तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात खतरनाक 10 किल्ल्यांची माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला यादी भारतात कोणत्या खतरनाक किल्ल्यांची माहिती होती? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..