जगातील सर्वात महागडी 10 फळे कोणते?जाणून घ्या!!

Infomative News

मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये सर्वसाधारणपणे घरात वापरले जाणारे फळांची सर्वात जास्त किंमत 200 ते 400 रुपये प्रति किलोपर्यंत असते. ज्यामध्ये सफरचंद, आंबा, द्राक्षे, खरबूज, पेरु अशा अनेक फळांचा समावेश होतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? जगातील काही देशांमध्ये अशी अनेक फळं आहेत इतकी महाग असतात की त्यांना विकत घेणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात नाही, अशातच आज आपण जगात सर्वात महागडी 10 फळे कोणती आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..

◆ बुद्धा नाशपाती : जगातील सर्वात महाग भागांमध्ये बुद्धा नाशपाती या फळाचा दहावा क्रमांक लागतो. हे फळ आपल्याला चीन या देशांमध्ये पाहायला मिळते. बुद्धाच्या चेहऱ्याच्या आकाराची बुद्धा नाशपती हे फळ बुद्धाचा चेहरा असलेल्या प्लास्टिकच्या साच्यात ठेवले जाते. या एका फळाची किंमत बाजारामध्ये जवळपास 700 रुपयांपर्यंत असते.

◆ सेकाई इची सफरचंद : जगातील सर्वात महाग फळांमध्ये सेकाई इची सफरचंद या फळाचा नववा क्रमांक लागतो. सेकाई इची सफरचंद हे फळ आपल्याला फक्त जपान या देशांमध्ये पाहायला मिळते. ते आकाराने खूप मोठी असते. या एका सफरचंदाची वजन जवळपास नऊशे ग्रॅमपर्यंत असते. सेकाई इची सफरचंद या जातीच्या एका सफरचंदाची किंमत बाजारामध्ये सुमारे 2 हजार रुपयांपर्यंत असते.

◆ डेकोपोन मोसंबी : जगातील सर्वात महागमध्ये डेकोपोन मोसंबी या फळाची आठवा क्रमांक लागतो. या फळाची लागवड सर्वात आधी 1972 मध्ये जपान या देशांमध्ये करण्यात आली होती. कालांतराने संपूर्ण जगभरातच पसरली. बाजारामध्ये एक किलो डेकोपोन मोसंबीची किंमत सुमारे 6 हजार रुपयांपर्यंत असते.

◆ सेम्बिकिया स्ट्रॉबेरी : जगातील सर्वात महाग फळांमध्ये सेम्बिकिया स्ट्रॉबेरी या फळाचा सातवा क्रमांक लागतो. हेदेखील आपल्याला फक्त जपान या देशांमध्ये पाहायला मिळते. या फळांची पॅकिंग एका बॉक्समध्ये पाहायला मिळते. एका वेबसाईटवर एका बॉक्समध्ये 12 सेम्बिकिया स्ट्रॉबेरी असल्याचे सांगितले जाते त्याची किंमत सुमारे 7,110 रुपयांपर्यंत आहे.

◆चौरस टरबूज : जगातील सर्वात महाग फळांमध्ये चौरस टरबूज या फळाचा सहावा क्रमांक लागतो. हेदेखील फळ आपल्याला फक्त जपानी देशामध्ये पाहायला मिळते. चौरस आकाराचे दिसणारे हे फळ एका चौकोनी बॉक्समध्ये उगवले जाते. जे दिसायला खूपच आकर्षक वाटते. या चौरस आकाराच्या टरबुजांची किंमत ही सुमारे 200 यू एस डॉलर म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये सुमारे 16 हजारपर्यंत असते.

◆ मियाझाकी आंबा : जगातील सर्वात महाग त्यामध्ये मियाझाकी आंबा या फळाचा पाचवा क्रमांक लागतो. हेदेखील आपल्याला फक्त जपानी देशामध्ये पाहायला मिळते. हे आंबे गोड स्वभाव आणि मजेदार चेस्टसाठी ओळखले जातात. हे जगभरात खूप दुर्मिळ स्वरूपात आहेत, त्यामुळे त्यांच्या किमतीत मोठा भाव असतो. जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी आंब्याच्या एका किलोची किंमत 2 ते 3 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

◆डेंसुके टरबूज : जगातील सर्वात महाग फळांमध्ये डेंसुके तरबूजचा चौथा क्रमांक लागतो. एक दुर्मिळ जातीची टरबूज आहे, ज्याचा रंग हा काळ असतो आणि हे टरबूज फक्त जपान देशांमध्ये पिकवले जाते, ज्याची वजन सुमारे अकरा किलो असते. रिपब्लिक डॉट कॉम या वेबसाईटवर 2008 मध्ये 5,100 यू एस डॉलर म्हणजे सुमारे 5 लाख रुपयांना विकले गेले होते.

◆ रुबी रोमन द्राक्ष : जगातील सर्वात महाग फळांमध्ये रुबी रोमन द्राक्ष या फळाचा तिसरा क्रमांक लागतो. साधारणता सामान्य द्राक्ष साधारणपणे 200 ते 300 रुपये किलोपर्यंत असते, परंतु रुबी रोमानिया द्राक्षची किंमत इतकी जास्त आहे की, त्याला सामान्य माणूस खरेदी करू शकणार नाही. 2008 मध्ये साधारणतः 700 ग्रॅम रुबी रोमन द्राक्ष 8,400 डॉलर म्हणजेच 7 लाख रुपयांना विकली गेली होते. हे द्राक्ष मोठ्या प्रमाणात जपान या देशांमध्ये पिकवली जाते.

◆ आलिंगन अननस : जगातील सर्वात महाग फळांमध्ये आलिंगन अननस या फळाचा दुसरा क्रमांक लागतो. आलिंगन अननस तयार होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो आणि आम्हाला बाजारात विकले जात नाही तरी लोक त्याला गिफ्ट म्हणून देण्यासाठी खरेदी करत असतात. एका वेबसाईटच्या एका आलिंगन अननस किंमत सुमारे तीन ते बारा पर्यंत असते आणि हे अननस पिकवण्यासाठी 1 ते 2 लाख रुपये इतका खर्च येतो.

◆ युग्रेकीन खरबूज : जगातील सर्वात महाग फळांमध्ये खरबूजचा पहिला क्रमांक लागतो. या फळाची लागवड जपानमधील होक्काइडो या एका छोट्या शहरातील येथे ग्रीन हाऊसमध्ये केली जाते. जी एक प्रजाती म्हणून ओळखली जाते. या फळांची किंमत सुमारे 10 ते 24 लाख रुपयांपर्यंत असते.

तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वांत महाग फळे कोणती आहे? याबद्दल माहिती जाणून घेतली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *