तुम्हाला देण्यात आलेला चेक बाऊन्स झाल्यावर काय करावे? पैसे परत कसे मिळवावे?

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

चेक द्वारे केला गेलेला व्यवहार हा अधिक सुरक्षित मानला जातो. कारण चेक बाऊन्सच्या प्रकरणाला कायदेशीर स्वरूप देण्यात आलेले आहे. आजच्या या लेखात आपण चेक बाऊन्सच्या प्रकरणाची स्टेप-बाय-स्टेप माहिती जाणून घेऊ, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि शेअर करा.

मित्रांनो, तुम्ही बरेच वेळा पाहिले असेल की मित्रा-मित्रांमध्ये, पाहुण्यांमद्धे गरजेच्या वेळी उसने पैसे दिले जातात. पैसे दिल्यानंतर ते परत मिळवण्यासाठी मात्र खूप झगडावे लागते. पैसे वेळेवर परत मिळत नाहीत, प्रत्येक वेळी काहीही कारण सांगून टाळले जाते. अश्या वेळी पैसे देणार्‍याकडे वाट पाहण्याशिवाय किंवा दिलेले पैसे विसरून जाण्याशिवाय दूसरा कोणताही कायदेशीर मार्ग नसतो.

मात्र, समजा उसने पैसे देताना पैसे देणार्‍य व्यक्तीने पैसे घेणार्‍या व्यक्तीकडून सेक्युरिटी म्हणून बँक चेक घेतलेला असेल तर? अश्या वेळेला पैसे देणार्‍य व्यक्तीकडे पैसे परत मिळवण्यासाठी कायदेशीर पर्याय असतो, तो पर्याय म्हणजे Negotiable Instrumental Act चे कलम 138. या अंतर्गत फौजदारी केस दाखल करून कायदेशीर रित्या पैसे परत मिळवणे शक्य होते.

पैसे देणार्‍य व्यक्तीकडे पैसे घेणार्‍या व्यक्तीने त्या ठराविक रकमेचा चेक दिलेला असतो, तो चेक बँक मध्ये जमा करून पैसे मिळवता येतात. परंतु पैसे घेणार्‍या व्यक्तीला याची कल्पना असते म्हणून तो आपल्या बँक खात्यात पुरेसे पैसे ठेवतच नाही. अश्या वेळी बँकेत जमा केलेला चेक ‘Insufficient Account Balance’ असे कारण सांगून मेमो सह परत येतो.

हा चेक मेमो सह परत आल्यानंतर 30 दिवसांच्या आतमध्ये चेक देणार्‍या व्यक्तीस कायदेशीर नोटिस पाठवणे आवश्यक असते. या नोटिस मध्ये पैसे देताना पासूनचा सर्व घटनाक्रम नमूद करणे फायदेशीर ठरते. अश्या प्रकारची परिपूर्ण कायदेशीर नोटिस रजिस्टर्ड पोस्टने पाठवणे आवश्यक असते.

ही नोटिस चेक देणार्‍य व्यक्तिला ज्या दिवशी प्राप्त होते, त्या दिवसापासून पुढील 30 दिवस आपणास नोटिसच्या उत्तराची वाट पाहणे बंधनकारक आहे. या 30 दिवसांमध्ये नोटिसचे उत्तर मिळू शकते किंवा चेक देणारी व्यक्ती पैसे परत करू शकते. नोटिसचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, किंवा नोटिस न मिळाल्यास किंवा पैसे परत न मिळाल्यास पुढील 30 दिवसांच्या आतमध्ये कोर्टात NI Act च्या Section 138 अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे.

इथे प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक कालावधी नमूद केलेला आहे, तो खूप महत्वाचा असतो. ठराविक कालावधीमध्ये कोर्टात तक्रार दाखल न केल्यास कोर्ट तक्रार अर्ज फेटाळून लावू शकते. अनावधानाने तक्रार दाखल करण्यासाठी विलंब झालेला असेल तर तक्रारीसोबत विलंब माफी अर्ज देखील दाखल करणे आवश्यक असते. यामध्ये उशीर होण्यासाठीचे कारण नमूद करणे आवश्यक असते. हा विलंब माफी अर्ज स्वीकारवा किंवा नाही हे कोर्टाच्या मनावर असते.

चेक बाऊन्सच्या प्रकरणात तक्रार अर्जसोबत एकशपथपत्र देखील दाखल करावे लागते. सोबतच महत्वाचे कागदपत्र जसे चेक रिटर्न मेमो, लीगल नोटीस प्राप्त झाल्याची पोस्ट ऑफिस कडून मिळालेली प्रत हे देखील जोडावे लागतात. यानंतर कोर्टाद्वारे समोरील व्यक्तिला कोर्टापुढे हजार राहण्यासंबंधी समन्स काढले जाते.

या फौजदारी प्रकरणामद्धे आरोप सिद्ध झाल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अश्या शिक्षेची तरतूद आहे. इथे दंडाची रक्कम ही चेक वर असलेल्या रकमेच्या दुपटीपर्यंत असू शकते.

आपण वरील लेखामद्धे मध्ये चेक बाऊन्स झाल्यानंतर काय करावे जेणेकरून आपणास आपली रक्कम मिळेल, अथवा समोरच्या व्यक्तिला तुरुंगवास भोगावा लागेल. परंतु एका गोष्टीसाठी चेक बाऊन्स होऊन देखील चेक देणार्‍य व्यक्तिला शिक्षा होत नाही. हो तुम्ही बरोबर वाचले. ती गोष्ट म्हणजे देणगी अथवा बक्षीस म्हणून दिलेले चेक. देणगी अथवा बक्षीस म्हणून दिलेला चेक बाऊन्स झाल्यास तो गुन्हा ठरत नाही.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *