तुम्ही रस्त्यांच्या कडेला वेगवेगळ्या रंगांचे हे दगड पाहिले असतीलच! पण या वेगवेगळ्या रंगांचा नेमका अर्थ काय आहे?

Infomative News

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

तुम्ही रस्त्याच्या कडेला ‘मैलाचा दगड’ पाहिला असेल, ज्यावर एखाद्या ठिकाणाचे अंतर आणि त्या ठिकाणाचे नाव लिहिलेले असते. या दगडांना वरच्या बाजूला पिवळा, हिरवा, काळा किंवा केशरी रंग असतो, तर सर्व दगडांची खालची बाजू पांढर्‍या रंगाने रंगलेली असते. पण तुम्हाला माहित आहे का की हे मैलाचे दगड वेगवेगळ्या रंगाचे का असतात? 

चला तर मग आजच्या इन्फो इन मराठीच्या महितीशीर लेखामद्धे यामागचे कारण जाणून घेऊ. प्रत्येक रंगाची आपली एक ओळख आणि विशेषता असते, त्याबद्दल आपण या लेखात सविस्तर जाणून घेऊ. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.

तुम्ही एखाद्या रस्त्याने प्रवास करत असताना रोडच्या शेजारी तुम्हाला असा पिवळ्या आणि पांढर्‍या रंगाचा दगड दिसला असेलच. या मैलाच्या दगडावर त्या जागेपासून एखाद्या शहराचे अंतर किती आहे हे लिहलेले असते, आपण ते पाहतो आणि आपला प्रवास पुढे सुरू ठेवतो. आपण हा दगड पिवळ्या रंगाने का रंगवीला असेल याबाबत जास्त विचार करत नाही. परंतु, काही तासांनी आपल्याला रस्त्याच्या कडेला वेगळ्या रंगाचा एखादा मैलाचा दगड दिसल्यानंतर हा प्रश्न नक्कीच मनात येतो.

तर, हा पिवळा आणि पांढर्‍या रंगाचा मैलाचा दगड आपल्याला हे सांगतो की आपण ज्या रस्त्याने प्रवास करीत आहोत तो एक ‘ राष्ट्रीय महामार्ग’ आहे. कोल्हापूर-पुणे, सोलापूर-पुणे आणि इतर जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्याच्या कडेला तुम्हाला हमखास पिवळ्या आणि पांढर्‍या रंगाचे दगड दिसतील ज्यावर पुढे येणार्‍या शहराचे अंतर लिहलेले असते. हे हायवे फक्त एका राज्यापूरते मर्यादित नसून अनेक राज्यांमधून जातात.

राष्ट्रीय महामार्ग (NH) हे भारतातील प्रमुख महामार्ग आहेत जे सर्व शहरे आणि राज्यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करतात. NH ची देखभाल भारत सरकार (म्हणजे NHAI) करते. राष्ट्रीय महामार्ग 70,000 किमी पेक्षा जास्त लांब आहेत आणि हे महामार्ग उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम कॉरिडॉर (NS-EW कॉरिडॉर) आणि गोल्डन चतुर्भुज (GQ) देखील तयार करतात.

जेव्हा तुम्हाला रस्त्यावर हिरवा मैलाचा दगड दिसला, तेव्हा समजून घ्या की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून चालत नसून राज्य महामार्ग किंवा स्टेट हायवे वरून प्रवास करत आहात. भारतात, जेव्हा राज्याद्वारे रस्ते बांधले जातात, तेव्हा हिरव्या-पांढर्‍या रंगांचे मैलाचे दगड स्थापित केले जातात आणि राज्य सरकार या रस्त्यांची संपूर्ण देखभाल करते. राज्य महामार्गांची लांबी सुमारे 150,000 किमी आहे. एखाद्या राज्यामधील दोन किंवा अधिक मोठ्या शहरांना जोडण्यासाठी हे हायवे बनविले जातात. राज्य महामार्ग हे एका राज्यापूर्ते मर्यादित असतात, ते राज्याच्या बाहेर जात नाहीत.

मोठमोठ्या शहरांच्या गुळगुळीत रस्त्यांपासून काहीसे दूर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या मैलाच्या दगडाचा रंग बदललेला तुम्हाला दिसेल. भारतातील ग्रामीण भागांना एखाद्या शहराशी किंवा महामार्गाशी जोडणार्‍या रोडच्या कडेला तुम्हाला केशरी रंगाचा मैलाचा दगड दिसेल. केशरी रंगाचा मैलाचा दगड हा ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ अंतर्गत बनवल्या जाणार्‍या रस्त्यांसाठी वापरला जातो.

जेव्हा तुम्हाला रस्त्यावर काळ्या, निळ्या किंवा पांढर्‍या पट्ट्यांसह मैलाचा दगड दिसला, तेव्हा समजून घ्या की तुम्ही मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात आला आहात. तसेच तो रस्ता येणाऱ्या जिल्ह्याच्या ताब्यात येतो. याच शहरातील प्रशासनाकडून या रस्त्याची काळजी घेतली जाते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *