गृह कर्ज म्हणजे होम लोन लवकरात लवकर फेडणं योग्य की कर्जाच्या पूर्ण कालावधीपर्यंत थांबून परतफेड करणे योग्य. होमलोन फेडताना टॅक्स सगळीकडेच कमी करून दिला जातो. मग या करबचतीसाठी कर्ज अनेक वर्षे फेडत राहणे योग्य आहे का? चला जाणून घेऊया
तज्ञांच्या मते तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी होम लोन मिळालेलं असलं तरी हा कालावधी पूर्ण होण्याआधी त्याची परतफेड करणं हे नक्कीच फायदा देणारं आणि योग्य ठरते. काही CA च्या मते, होमलोन लवकर फेडल्याने एक तर कर्जाच्या व्याजापोटी जाव्या लागणाऱ्या मोठ्या रकमेची बचत होते, कर्जातून आपण मुक्त होतो आणि गुंतवणुकीसाठी हातात पैसा राहतो. याचबरोबर, आर्थिक आघाडीवर मनःशांती राहते ते वेगळच. मग हे होम लोन लवकरात-लवकर फेडायचे कसं? तर त्यासाठी काही पर्याय आहेत.
यामध्ये दर महिन्याच्या होमलोनच्या हप्त्यामध्ये दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ करा अशा प्रकारे 25 वर्षांच्या काळासाठी घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड तुम्हाला 10 वर्ष आणि 2 महिन्यात करता येईल. जर होमलोनच्या हप्त्यात दर महिन्यामध्ये 10 टक्क्यांची वाढ करणे शक्य नसेल तर 5 टक्क्यांची वाढ करत जा. असं केलं तर 25 वर्षांसाठी घेतलेला होम लोन तुम्ही फक्त 13 वर्ष 3 महिन्यांमध्ये फेडू शकता. ज्या लोकांना हेही शक्य नाही त्यांनी दरवर्षी एक अधिकचा हप्ता भरावा म्हणजे वर्षाच्या 12 ऐवजी 13 हप्ते भरता येईल.
असं केलं तर संपूर्ण गृहकर्जाची परतफेड 25 वर्षांच्या ऐवजी फक्त 19 वर्ष आणि 3 महिन्यात करता येईल. 2012 मध्ये RBI ने जाहीर केलेल्या आदेशानुसार जर गृहकर्जाची परतफेड नियोजित कालावधीच्या आधीच करण्यात आली तर त्यासाठी दंड आकारला जाऊ नये. पण तुम्ही स्थिर किंवा निश्चित व्याजदरावर इंट्रेस्टेड होम लोन घेतले असेल तर कर्जाचा कालावधीआधी त्याची परतफेड केली तर त्यावर ती दंड अजूनही आकारला जात आहे.
पण जर हे होम लोन बदलत्या व्याजदराने घेतलं असेल तर कर्जाचा कालावधीऐवजी त्याची पूर्ण परत वेळ केल्यावर ती दंड आकारला जात नाही, म्हणूनच होमलोन घेताना ते फ्लोटिंग व्याजदरात घेणं चांगलं मानलं जातं.