नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा..
मंडळी फूटबॉल वर्ल्डकप सुरू झाला आहे, फूटबॉल प्रेमींसाठी हा वर्ल्डकप म्हणजे दिवाळीच. भारतात कमी-अधिक लोकप्रिय असलेल्या या खेळाचे युरोप-अमेरिकेत प्रचंड चाहते आहेत. 90 मिनटात संपणार्या या खेळाची लोकप्रियता अशी आहे की जगभरातील नंबर एकचा खेळ म्हणून फूटबॉल प्रसिद्ध आहे. आजच्या या लेखात आपण याच जगातील नंबर एकच्या खेळाबद्दल काही रंजक माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचाच.
फुटबॉल या शब्दातच त्याचा अर्थ स्पष्ट होतो. या खेळात चेंडू पायाने ढकलून प्रतिस्पर्धी संघाच्या नेट मध्ये टाकला जातो. त्यामुळे त्याला फुटबॉल हे नाव पडले. त्याच्या इतिहासाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. FIFA च्या मते, फुटबॉल हे सुजू या चिनी खेळाचे विकसित रूप आहे. चीन मधील सुजू या खेळाला हयान राजवंशाच्या काळात चांगलीच लोकप्रियता प्राप्त झाली होती.
दुसरीकडे, जपानच्या असुका राजवंशाच्या काळात खेळला जाणारा ‘केमरी’ हा खेळ देखील आजच्या काळातील ‘फुटबॉल’ समजला जातो. पूर्वीच्या काळी जपानी लोक एखाद्या सन-उत्सवाच्या वेळी एकत्र येऊन केमरी हा खेळ खेळत असे.
1409 मध्ये जेव्हा हा खेळ ब्रिटनमध्ये पोहोचला तेव्हा प्रिन्स हेन्री IV याने त्याला फुटबॉल असे नाव दिले. जेव्हा तिथल्या लोकांना तो आवडू लागला तेव्हा 1526 मध्ये राजा हेन्रीने या खेळासाठी खास प्रकारचे बूट बनवले. जेणेकरून फुटबॉल खेळाडूंना सहज खेळता येईल. ब्रिटेनमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या या खेळाला काही काळासाठी ‘बंदी’चा सामना देखील करावा लागला होता. कारण होते, फूटबॉल खेळताना खेळाडूंचा झालेला मृत्यू.
तज्ञांच्या मते, 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 17 व्या शतकाच्या सुरूवातीस फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला गेला. यादरम्यान गोल करण्याचे नियमही बनवण्यात आले. त्यानंतर 8 ते 12 गोलांचा सामना व्हायचा.
हळूहळू 20 व्या शतकापर्यंत हा खेळ जगभरात खूप लोकप्रिय होऊ लागला. तेव्हा फुटबॉलसाठी आंतरराष्ट्रीय संस्थेची गरज भासू लागली. त्यानंतर इंग्लिश फुटबॉल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली फ्रान्स, डेन्मार्क, स्पेन, नेदरलँड, स्वीडन, बेल्जियम आणि स्वित्झर्लंड या युरोपीय देशांसोबत बैठक झाली. पुढे 21 मे 1904 रोजी FIFA म्हणजेच, फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ फूटबॉल असोशीएशनची सुरुवात झाली.
सुरवातील इंग्लंड आणि इतर यूरोपियन देशांचा दबदबा असलेल्या या खेळात हळू-हळू इतर देशांनी देखील आपली ताकद दाखवून दिली. आज भारतात जसे क्रिकेट आणि क्रेकेटर्सला दैवत्व प्राप्त झाले आहे तसेच दैवत्व जगभरात फूटबॉल आणि फूटबॉल प्लेयर्सला प्राप्त आहे. अश्या या जगातील नंबर एकच्या खेळामद्धे भारतीय संघ कधी आपले कौशल्य दाखवेल याचीच सर्वा भारतीयांना आतुरता आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.