मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
जेंव्हा शेताच्या बांधावरून किंवा छोट्याश्या कारणावरून दोघा-तिघांमध्ये किंवा छोट्याश्या गटामद्धे हाणामारी होतानाचे दृश भारतात काही नवीन नाही. हे छोटे मोठे भांडण सहसा पोलिस स्टेशन पर्यंत जात नाहीत, वयस्कर व्यक्तींच्या मध्यस्तीने हे वाद सहसा सोडवले जातात. परंतु अपवादात्मक परिस्थिति मध्ये हे भांडण पोलिस स्टेशन पर्यंत जातात आणि सुरू होतो प्रवास कठीण अश्या न्यायपालिकेचा.
आजच्या या लेखात आपण अश्याच छोट्या-मोठ्या हाणामारी मध्ये आरोपी असलेल्या लोकांवर कोणती कलमं लावली जातात? हे कलमं नेमकं काय सांगतात? यांना किती शिक्षा असते? यामध्ये जामीन मिळू शकते का? अश्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
सर्वप्रथम आपणास हे माहीत असणे आवश्यक आहे की, मारामारी असो किंवा इतर कोणत्याही प्रकरकरचा गुन्हा असो जो एखाद्या व्यक्तीला इजा करतो त्या गुन्ह्याची व्याख्या आणि त्या गुन्हासाठी दिली जाणारी शिक्षा ही Indian Penal Code म्हणजेच भारतीय दंड संहिता, १८६० यामध्ये नमूद केलेली आहे. याच कायद्याच्या विविध कलमानुसार एखाद्या आरोपीला त्याच्या कृत्यासाठी शिक्षा दिली जाते. चला तर मग पाहूया रोजच्या जीवनात छोट्या-मोठ्या वादांमुळे होणार्या घटनांची IPC मध्ये दिलेली व्याख्या आणि त्यासाठीची शिक्षा.
इंडियन पिनल कोड, 1860 मधील सेक्शन 299 ते 377 हे Offences Affecting The Human Body ( एखाद्या मानवी शरीराला इजा करणारे गुन्हे ) या संबंधी आहेत. यामधील सेक्शन 323 हे फौजदारी प्रकरणांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्या कलमा पैकी एक आहे. IPC 323 हे कलम एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक दुखापत पोहचवल्याबद्दल शिक्षा देणारे कलम आहे. किरकोळ मारहाण, धक्का-बुक्की, ई. गोष्टींसाठी हे कलम वापरले जाते. गुन्हा सिद्ध झाल्यास यामध्ये 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते. IPC 323 मध्ये ज्या प्रकारच्या दुखापतीसाठी शिक्षा देण्यात आलेली आहे, त्याची व्याख्या IPC च्या कलम 319 मध्ये देण्यात आलेली आहे.
पुढील महत्वाचे कलम म्हणजे IPC 324. एखाद्या धोकादायक हत्याराने जाणीवपूर्वक दुखापत घडवून आणल्यास हे कलम लावण्यात येते. याची कायदेशीर व्याखा खूप क्लिष्ट आहे, परंतु सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ”एखाद्या घातक हत्याराने हल्ला केल्यानंतर किरकोळ दुखापत झालेली असेल तर तो गुन्हा या कलमाखाली शिक्षेस पात्र ठरतो”. या गुन्हासाठी 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. IPC 323 आणि IPC 324 हे दोन्ही कलम जामीनपात्र आहेत. म्हणजेच आरोपींना या गुन्हासाठी सहजासहजी जामीन मिळू शकते.
IPC 323 आणि IPC 324 या दोन कलमा बद्दल बोलायचे झाले तर हे दोन्ही अगदीच सामान्य कलम आहेत. यासाठी जास्त शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नाही. बरेच वेळा पोलिस यासंबधीची तक्रार लिहून घेण्यास नकार देतात. अगोदर दवाखान्यात जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेऊन या असे सांगण्यात येते. हे प्रकरणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर चालवले जातात, म्हणजेच आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कोर्टात हे प्रकरण चालते. हे गुन्हे जामीनपात्र असल्याने सहजासहजी जामीन देखील भेटते.
आजच्या या लेखात आपण फौजदारी प्रकरणातील सर्वात जास्त वापरल्या जाणार्या 2 सेक्शन बद्दल माहिती जाणून घेतली. ही माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आपणास आपल्या वेबसाईटवर फौजदारी प्रकरणातील अधिक माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये त्यासंबंधी नक्की प्रश्न विचारा.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.