मित्रानो राज्याच्या शेतकऱ्यांना वीजबिलबाबत दिलासा देणारे योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेले असून या योजनेमधून आता शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिली जाणारी जाणारी वीज आता मोफत दिली जाणार आहे. या शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजनेमार्फत मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना असेच करण्यात आलेले आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊया.
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विज पुरवठ्याची वीज बिलाचा हे शेतकरी किती HP चा कृषी पंप वापरतो यावर ती आतापर्यंत आकारले जात होते. मात्र, आपल्याला बहुतांश भागात उन्हाळ्यात शेतकऱ्यांची कृषी पंप पाणी नसल्याच्या कारणाने बंद दिसून येतात. तरीसुद्धा त्यांना वीजबिल आकारले जाते. या कारणामुळे आपल्याला अनेक कृषी पंप विजबील थकबाकी शेतकरी दिसून येते.
मित्रांनो या समस्येवर उपाय म्हणून आता साडेसात एचपी पर्यंतच्या कृषी पंपांना वीज बिलातून सुटका करण्यात आलेली असून आता या कृषिपंपांना मोफत वीज दिलं जाणार आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे थकीत विजबिल माफ करण्यात आलेली नसून तर इथून पुढचे वीजबिल येणार आहे ते या ठिकाणी मोफत करण्यात आलेले आहे.
मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे एकापेक्षा जास्त कृषी पंप विज जोडणी घेतलेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये तिच्या वीज जोडण्या असतील त्यापैकी साडेसात एचपी व त्याखाली नवीन जोडण्याकरिता वीजबिल आकारले जाणार नाही. तर योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे का? तर यांचे उत्तर आहे नाही.
तर कृषिपंपाची वीज जोडणी घेतानाच जोडणी कृषिपंपाची आहे याची माहिती विद्युत विभागाकडे नमूद असते. यामुळे कोणती वीज जोडणी कृषी पंपाची आहे ? आणि किती आहे? याची माहिती शासनाकडून या आधीच उपलब्ध आहे यामुळे शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता नसून साडेसात एचपी पऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज शासनाकडून त्यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार मोफत केल्या जाणार आहे.
या अर्थसंकल्पामध्ये मागेल त्याला कृषी पंप या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती इंटरनेट तुम्हाला मिळून जाईल..