म्हणून भारतात लग्नसोहळ्यावर इतका खर्च केला जातो!!

Infomative

अंबानीच्या लग्नाचा भपकेबाजपणा आणि किती खर्च झाला? याविषयी चर्चा सध्या सगळीकडे सुरुवात केली जात आहे. त्याच्या खर्चाचे वेगवेगळे आकडे सांगितले जातात. पण त्यांच्या लग्नाच्या बद्दल बोलताना भारतात लग्नमध्ये किती खर्च होतो? इमानदार लग्नाचा कसा ट्रेंड आलाय? याची देखील चर्चा होते. भारतामध्ये एखाद्या कुटुंबात शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च लग्नात होतो, असे एक रिसर्च सांगतो. किती मोठी आहे भारताची ही वेडिंग इंडस्ट्री? आणि मुळात लग्नात इतका खर्च का केला जातो? समजून घेऊया..

एका इन्वेस्टमेंट बँकिंग कंपनीने भारतातल्या लग्नाचा आणि या वेडिंग इंडस्ट्रीचा एक सखोल अभ्यास करून रेपोर्टर तयार केला आहे. यानुसार दरवर्षी जगामध्ये भारतात सर्वाधिक म्हणजे 1 कोटी ते 80 लाख लग्न होतात, कारण भारतामध्ये तरुण लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि त्यांच्या पैकी 34 टक्के लोकसंख्या ही लग्नाच्या वयाची आहे. भारतापाठोपाठ चीनमध्ये दरवर्षी 70 ते 80 लाख लग्न होतात तर अमेरिकेत वर्षाला 20 ते 25 लाख लग्न होतात. लग्नाची ही संख्या भारतात सर्वाधिक असली तरी लग्नामुळे होणारी एकूण उलाढाल इंडस्ट्री चीनमधली मोठी आहे.

ती जवळपास 70 हजार कोटी अमेरिकन डॉलरची आहे.लग्नामुळे दरवर्षी भारतात होणारी उलाढाल आहे 13 हजार कोटी अमेरिकन डॉलरची. अमेरिकेच्या 7000 कोटी डॉलर्सच्या वेडिंग इंडस्ट्रीच्या तुलनेत भारतातील उलाढाल जवळपास दुप्पट आहे. भारतात लग्नाच्या इंडस्ट्रीपेक्षा जास्त खर्च होणारी एकच इंडस्ट्री आहे ती म्हणजे अन्नपदार्थ आणि किराणा भाजीपाला. यावर ती भारतीय दरवर्षी 68 हजार 100 कोटी डॉलर्सचा खर्च करतात.

भारतातील लग्नामध्ये सर्वाधिक खर्च होतो दागिन्यांवर. कारण लग्न कोणत्या पद्धतीने झालं? तरी त्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांना पूर्वापार महत्त्व आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण दागिने पैकी 50 ते 55 टक्के दागिने खरेदी लग्नाची संबंधित असते तर कपडे पैकी 10 टक्के खरेदी ही लग्नाची संबंधित असते. भारतात लग्नविधीमध्ये वैविध्य आहे आणि पद्धती वेगवेगळ्या त्याचे विधी कार्यक्रम सोहळा हे वेगवेगळे असतात. पण या सगळ्यामध्ये देशा एक गोष्ट कॉमन आहे.

उत्पन्न गटानुसार लग्नावर होणारा खर्च जरी वेगळा असला तरी प्रत्येक गट आपल्या उत्पन्नाचा म्हणजे इन्कमच्या तुलनेत 3 पटींनी अधिक खर्च लग्नावर करतो. त्यामुळेच भारतात ज्या वेळी एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न वाढतं त्यावेळी लग्नांमध्ये होणारा खर्च देखील वाढण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा उत्पन्नातला वाढीपेक्षा कितीतरी अधिक पटीने खर्च वाढतो.

भारताच्या वेडिंग इंडस्ट्रीच्या अभ्यासानुसार 2023 मध्ये भारतामध्ये लग्नाचा किमान खर्च होता सरासरी 3 लाख रुपये तसेच कनिष्ठ मध्यमवर्ग म्हणजे स्लोअर मिडल क्लास लग्नावर 6 लाख रुपयांचा खर्च करतो तर मध्यम वर्गातल्या लग्नाचा सरासरी 10 ते 25 लाखांचा दरम्यान असतो त्यावरचा वर्ग एका लग्नावर की सरासरी 50 लाख रुपये खर्च करतो. उच्च क्लास लग्ना वरती एक कोटी रुपये खर्च करतो.

भारतामध्ये एखाद्या मुलीच्या किंवा मुलाच्या केजीपासून पीजे म्हणजे पदव्युत्तर शिक्षणापर्यंत येणाऱ्या एकूण खर्चाच्या दुप्पट खर्च लग्नावर केला जातो. कारण भारतीय संस्कृतीमध्ये लग्नसोहळ्याला असणारे महत्त्व होय. एखाद्या व्यक्तीने मुलाचे किंवा मुलीचे लग्न कसं लावून दिलं? यावर त्यांनी त्याची समाजातली पत ठरत असते. मुलीला किती दागिने घातले? आज देखील चर्चेचा विषय असतो.

सामाजिक दबाव सोबतच अशा सोहळ्यासाठी कारणीभूत ठरतो तो ईर्ष्या होय. तर दुसऱ्यांनी काय केलं ते पाहून तसंच किंवा त्यापेक्षा भव्य करावसं वाटन आणि यातूनच मग अनेक दिवसांचे कार्यक्रम आलिशान सजावट, सोहळा याकडे कल वाढतो. यामुळेच 2023 मध्ये वेडिंग सीजनमध्ये लग्नासाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या आधीच्या वर्षापेक्षा 20 टक्क्यांनी वाढली होती.

असं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडस असंही म्हटलं होतं आणि खाजगी सावकारांकडून घेण्यात येणाऱ्या खर्चाचा समावेश नाहीये.
लग्न सोहळा अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना चालना मिळते. हे जरी खरं असलं तरी कुटुंबाचा आर्थिक गणित बिघडत. हे मात्र नक्की..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *