खरेदीखत व साठेखत फरक समजून घ्या – प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहार…

Agriculture Infomative News

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

अनेक वेळा जमीन किंवा प्लॉट खरेदी करतानाही साठेखत आधी व नंतर खरेदी खत करत असतो मात्र बऱ्याच जणांना साठेखत आणि खरेदीखत यातील फरक माहीत नसतो. आज आपण साठेखत आणि खरेदीखत यातील फरक समजून घेणार आहोत. एखाद्या प्रॉपर्टीचे म्हणजे जमीन, घर किंवा प्लॉटचे हस्तांतरण खरेदी-विक्री प्रक्रियेद्वारे होत असेल अशावेळी साठेखत आणि खरेदीखत याचा संबंध येतो.

खरेदी-विक्री व्यवहार करतानी व्यवहार कशा प्रकारे केले जाणार आहे याचा लिखित स्वरूपातील करार आधी केले जाणार असतो आपण साठेखत असे म्हणतो. साठेखताला इंग्रजीमध्ये एग्रीमेंट फॉर सेल म्हणजे विक्रीकरिता करार असेसुद्धा म्हणतात. ट्रान्सफर ऑफ प्रॉपटी ऍक्टमध्ये कलम 54 नुसार असेल विक्रीचा अर्थ, मिळकतीमधील मालकीहक्क, ठरलेल्या मोबदल्याच्या बदल्यात हस्तांतरित करणे होय.

खरेदी खताची नोंदणी केल्यानंतर मिळकतीच्या मालकी हक्क हस्तांतरित होतो. बऱ्याच वेळा एखादी प्रॉपर्टी खरेदी विक्री करण्याकरिता काही कालावधी लागू शकतो, अशा वेळी साठेखत केले जाते. त्यामुळे मालकी हक्काच्या हस्तांतरण होत नाही. मालकी हक्काचे हस्तांतरण खरेदीखतामुळे होते. त्याला आपण सेल डीड तसेच रजिस्ट्री किंवा नोंदणी असे सुद्धा म्हणतो.

खरेदीखत करण्यापूर्वी साठेखत करण्यापूर्वी साठेखात मालमत्तेचे वर्णन आणि मालमत्तेचा मिळणारा मोबदला कसा आणि किती कालावधीमध्ये देणार, त्यानंतर प्रत्यक्ष मालमत्तेचा कधी देणार, कागदपत्राची पुर्तता तसेच विविध परवानगीची आवश्यकता असल्यास त्या परवानग्याची पूर्तता कोण आणि कधी करणार, तसेच खरेदी खत कधी करणार याबाबतचा करार केलेला असतो.

तसेच यासाठी साठेखतातील कराराचा भंग झाल्यास विक्री करणारा व खरेदी करणारा यांचे अधिकार कोणते असतील अशा महत्त्वाच्या अटी आणि शर्तींचा उल्लेख केलेला असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर एखादी प्रॉपर्टी विकण्यापूर्वी विक्रीबाबतच्या अटी व शर्ती तसेच खरेदीखत करून देण्याबाबत जो करार असतो त्याला साठेखत म्हणतो..

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *