आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार विना अट पीक कर्ज, पाहा सविस्तर माहिती..

Agriculture Infomative Money

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज घेताना बँकांकडून अनेक नियम दाखवली जातात आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज पासून वंचित राहावे लागते. या बाबींचा विचार करून आता पीक कर्ज शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्याबाबत काही बदलही करण्यात येत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना सहजरीत्या पीक कर्ज मिळणार आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक यांच्यामार्फत पत्रक काढण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपण सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांचे हे पत्र तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करता येईल. हे पत्र 30 डिसेंबर, 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. या पत्राचा विषय आहे अल्पमुदत पीक कर्ज वाटपसाठी सिबिल अहवाल, सिबिल स्कोर याचा संदर्भ न घेणे सूचना बँकांना निर्गमित करणेबाबत.

कारण राष्ट्रीयकृत बँकाकडून आपल्या कोणतेही कर्ज घ्यायचे असेल त्यावेळेस बँकेकडून सिबिल स्कोर चेक केला जातो. त्यामुळे जर सिबिल स्कोर हा चांगला असेल तेव्हाच संबंध कर्जही मंजूर केल्या जाते. मात्र आता या ठिकाणी पीक कर्जाबाबत काही बदलही करण्यात येत आहे. यामध्ये विधी मंडळाकडील प्राप्त संदर्भानुसार शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, राज्यातील काही बँका विशेषतः व्यापारी राष्ट्रीयीकृत बँका शेतकर्‍यांना अल्पमुदत कर्ज मंजूर वितरण करताना सिबिल अहवाल म्हणजे सिबिल स्कोर विचारात घेतात.

तसेच सिबिल स्कोर हा 600 ते 700 पर्यंत असल्याशिवाय पीक कर्ज वितरीत करत नाही. त्यामुळे बँकांच्या या भूमिकेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी तर विधिमंडळ सदस्य यांनी याबाबत उपाययोजना करण्याची विनंती शासनास केली आहे.

आपणास माहिती आहे की, विविध पिकांच्या उत्पादनासाठी उत्पादनासाठी आणि पिकांच्या जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची तथा कर्जाची गरज असते. या भांडवली गुंतवणुकीतून शेतकरी शेती उत्पादन करीत असून यामधून त्यांना रोजगार तसेच चरितार्थाचे साधन उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांना भांडवल उपलब्धसाठी बँक अवलंबून राहावे लागते. आपणास माहिती आहे की, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करताना सिबिल अहवाल तथा सिबिल स्कोर विचारात न घेता मंजूर व वितरण करतात.

तथापि राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने कर्जपुरवठा करू शकत नाही, मग अशा परिस्थितीत या बँकांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी व्यापारी तसेच राष्ट्रीय बँकांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे या बँकांनी जत पीक कर्जासाठी सिबिल सिबिल स्कोर चेक बंधन कायम ठेवल्यास राज्यातील अनेक शेतकरी पीक कर्जापासून कायमचे वंचित राहतील पर्यायाने बँक क्षेत्रापासून दूर जातील ही बाब राष्ट्रीय धोरणाशी विसंगत होईल.

तसेच रिझर्व बँकेकडून प्राधान्यक्रम क्षेत्रात कर्ज पुरवठा करण्याबाबतची सुचना घेता बँकांनी एकूण कर्ज पुरवठ्याच्या भारतीय रिझर्व बँकेने विहित केलेले प्रमाणात अल्पमुदत पीक कर्जपुरवठा शेतकऱ्यांना करणे बंधनकारक आहे. तथापि व्यापारी राष्ट्रीयकृत बँकेत सिबिल स्कोर विचारात घेण्याची भूमिका पाहता शेतकरी सावकाराच्या विकर संस्थात्मक कर्जपुरवठाकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांना पुरवठा सुलभरीत्या होण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व बँकेने विहित केलेल्या मार्गदर्शनपर निर्देशानुसार बँकांनी पीक कर्जपुरवठा करणे अपेक्षित आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांकमध्ये पुरवठा करताना सिबिल स्कोर विचारात घेण्याचे बंधन घातलेले नाही, तरी काही व्यापारी राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्या कर्ज धोरणामध्ये पीक कर्ज पुरवठा करताना या घेणेबाबत सूचना निर्गमित केले आहे.

यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया व अन्य बँकांचा समावेश आहे. तसेच रिझर्व बँकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करणे अपेक्षित असल्याने त्यांनी देशामध्ये सिबिल सिबिल स्कोर घेण्याची निर्बंध नसल्याने या बाबी विचारात घेऊन संबंधित व्यापारी राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांचे कर्ज धोरणामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

यांमुळे आगामी काळामध्ये आपण पिक कर्ज घेण्याकरिता राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकामध्ये गेलो असता त्या ठिकाणी आता सिबील स्कोरची आपल्याकडे मागणी केली जाणार नाही किंवा संबंधितच सिबिल स्कोर चेक केल्या जाणार नाही. सिबिल स्कोरच्या आधारावर ती संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज दिल्या जाणार नाही, सिबिल स्कोरची आवश्यकता कर्ज देताना या ठिकाणी आता असणार नाही. जर तुम्हाला सिबिल स्कोर च्या अनुषंगाने तुमचं पिक कर्ज नाकारत असेल अशावेळी तुम्ही या पत्राचा संदर्भ घेऊ शकता..

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *