सामान्य ज्ञान : क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? पहा टॉप 10 देश.

Infomative

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

जगातील सर्वात मोठा देश कोणता? असा प्रश्न जर तुम्हाला विचारण्यात आला तर त्याचे उत्तर देणे तुम्हाला काहीसे कठीण जाईल, कारण जगातील सर्वात मोठा देश कोणता हे सांगण्यासाठी बरेच मुद्दे विचारात धरावे लागतात. जसे की, लोकसंख्या, क्षेत्रफळ, अर्थव्यवस्था, इत्यादी.

लोकसंख्या , अर्थव्यवस्था याबद्दल आपण नंतर एखाद्या लेखात सविस्तर माहिती घेऊ. आजच्या लेखात आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता, तसेच क्षेत्रफळाने मोठे असलेले जगातील टॉप 10 देश कोणते हे देखील थोडक्यात जाणून घेऊ. हा लेख तुमचे सामान्य ज्ञान वाढवणारा लेख आहे, त्यामुळे शेवटपर्यंत वाचा आणि माहिती आवडल्यास शेअर करा.

जर तुम्ही भारतात राहत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठ्या देशांच्या टॉप 10 यादीमध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे. जगातील एकूण देशांची संख्या 196 आहे. जगातील 10 सर्वात मोठ्या देशांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जवळजवळ अर्धा भाग व्यापला आहे आणि उर्वरित भाग जगातील उर्वरित 186 देश वापरतात.

रशिया हा जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश आहे. रशिया 17,098,242 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे जो आशिया आणि युरोप या दोन खंडांमध्ये पसरलेला आहे. जर रशियाची भारताशी तुलना केली तर रशिया भारतापेक्षा 5 पट मोठा आहे. रशिया हा क्षेत्रफळाच्या बाबतील जगातील सर्वात मोठा देश असल्याने लोकसंख्येच्या बाबतीत हा देश सातव्या क्रमांकावर आहे. रशियाचा बहुतेक भाग नेहमी बर्फाने झाकलेला असतो. रशिया तंत्रज्ञानात तितका पुढे नाही पण शस्त्रास्त्रे बनवण्यात रशिया खूप पुढे आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने कॅनडा हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ 9,985,000 चौरस किलोमीटर आहे आणि या देशाची लोकसंख्या 37,742,154 कोटी आहे. कॅनडा हा पश्चिम गोलार्धातील सर्वात मोठा देश आहे. कॅनडा हा आर्क्टिक आणि युनायटेड स्टेट्स दरम्यान स्थित आहे. जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स दरम्यान स्थित आहे.

या लिस्ट मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे कॅनडाच्या शेजारील देश अमेरिका. अमेरिकेचे क्षेत्रफळ 9,826,675 चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्येच्या आधारावर देखील हा देश जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हा देश कोणत्या क्रमांकावर असेल? याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा.

जगातील सर्वात मोठ्या देशांच्या यादीत चीन चौथ्या क्रमांकावर आहे. चीन देशाचे एकूण क्षेत्रफळ ९,५९६,९६१ चौरस किलोमीटर आहे. तसेच लोकसंख्येने हा जगातील सर्वात मोठा देश आहे. तज्ञांच्या मते काही वर्षांनंतर भारत चीनला मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा देश होईल. 

या लिस्ट मध्ये ब्राझील पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रझिलचे एकूण क्षेत्रफळ 8,514,877 चौरस किलोमीटर आहे. आता तुम्हाला जरा नवल वाटत असेल, कॅनडा, ब्रझिल असे देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतापेक्षा मोठे आहेत! भारत का अजून या लिस्ट मध्ये दिसत नाही? हा देखील प्रश्न पडत आहे ना?

कांगारू म्हणून ओळखला जाणारा देश म्हणजेच औस्ट्रेलिया, तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सहावा सर्वात मोठा देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ (ऑस्ट्रेलियाचे क्षेत्रफळ किलोमीटरमध्ये) 7,741,220 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने या देशाची लोकसंख्या खूपच कमी आहे. 2021 च्या आकड्यानुसार ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या फक्त 2.50 कोटी इतकी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मुंबई शहराची लोकसंख्या आणि ऑस्ट्रेलिया देशाची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. 

आला…आपला भारत देश आला. आपला देश भारत या लिस्ट मध्ये सातव्या क्रमांकावर आहे. भारत हा क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील सातव्या क्रमांकाचा आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ  3,287,263 चौरस किलोमीटर आहे.

या लिस्ट मध्ये अर्जेंटिना आठव्या क्रमांकावर आहे. या देशाचे एकूण क्षेत्रफळ  2,780,400 चौरस किलोमीटर आहे. अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेत स्थित आहे. अर्जेंटिनाच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक, केप हॉर्न म्हणून ओळखले जाते, हे जगातील सर्वात वेगवान वाऱ्याचे ठिकाण आहे. अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेत स्थित ब्राझीलचा शेजारी देश आहे.

या लिस्ट मध्ये नवव्या क्रमांकावर येतो कझाकिस्तान. या देशाचे एकूण क्षेत्रफळ 2,724,900 चौरस किलोमीटर आहे. तर, अल्जेरिया दहाव्या क्रमांकावर आहे. अल्जेरियाचे एकूण क्षेत्रफळ 2,381,741 चौरस किलोमीटर आहे. हा देश उत्तर आफ्रिकेत आहे आणि या देशाचा ९० टक्के भाग वाळवंट आहे. अल्जेरिया हा आफ्रिकन खंडातील सर्वात मोठा देश आहे. हा देश पूर्वी फ्रेंच वसाहत होता.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *