वीज कनेक्शन असणाऱ्या सर्वांसाठी MSEB संबधी उपयुक्त माहिती. घरातील लाईटबील जास्त का येते इ. सर्व गोष्टी

Infomative News

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

मंडळी आपल्याला अनेक वेळा असे होते की आपण घरात जास्त वीज वापरत नाही. तरी देखील आपल्याला भरमसाठ विजेचे बिल येते. या वाढत्या विजबिलासाठी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. आता तुमचे वीजबिल जास्त येऊ नये म्हणून तुम्ही खालील गोष्टी फॉलो करू शकता.

1) ज्या व्यक्तीने मीटरचे रीडिंग घेतले आहे. त्याचे नाव आयडी प्रूफ तारीख आणि त्याचे सही घेणे.
2) तेच रीडिंग पुन्हा 30 दिवसांनी घेतले जात आहे का याची माहिती ठेवणे.
3) हे तो व्यक्ती 30 दिवसानंतर रीडिंग घेण्यास आला तर त्याची तक्रार विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे करणे.

4) सोसायटी असल्यास बिल्डिंगच्या वॉचमन कडून या गोष्टी करून घेणे. 100 रिडींग पर्यंत 3.76 रुपये प्रति युनिट आहे. परंतु रिडींग 30 दिवसा नंतर घेतल्या मुळे रिडींग 100 च्या वर रिडींग गेल्यास हेच दर दुप्पट म्हणजेच 7.21 रुपये प्रति युनिट आहे. 300 च्या वर रिडींग गेल्यास दर तिप्पट 9.95 रुपये प्रति युनिट आहे. 500 च्या वर रिडींग गेल्यास चौपट 11.31 रुपये प्रति युनिट आहे.

त्यामुळे आपल्याला येणारे जादा बिल हे वरील कारणामुळे येत असते. विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमुळे जर तुम्हाला जास्त बिल भरावे लागत असेल तर त्याची तक्रार तुम्ही वेळीच केली पाहिजे.

जवळपास 99 टक्के ग्राहकांना ही माहिती नाही. त्यामुळे वीज मंडळाच्या धोरण विषयी अनेकांना माहिती देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 2003 च्या वीज कायद्यानुसार सेक्शन 57 नुसार तुमचे वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यानंतर 30 दिवसात मिळते. जर ते 30 दिवसात मिळाले नाही तर प्रत्येक आठवड्यात त्याला 100 रुपये भरपाई द्यावी लागते.

जर तुमचे ट्रान्सफॉर्मर बिघडले असेल तर कंपनीने ते 48 तासात सुरू करावे. तसे न केल्यास तक्रार करणाऱ्या ग्राहकास प्रती तास 50 रुपये मिळतात. वीज कायदा 55 सेक्शन नुसार प्रत्येक ग्राहकास त्याचा मीटर लावण्याचा अधिकार आहे.

सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे – ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती लागू

वीज पोल ते मीटर प्रयांत काही खर्च केल्यास ग्राहकाला तो खर्च परत मिळतो. तो खर्च कंपनीने करायचा असतो. वीज ग्राहक अटी आणि शर्ती क्रमांक 21 नुसार खर्च केल्यास पावतीच्या आधारे तुम्हाला तो खर्च परत मिळू शकतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *